हार्वर्ड विद्यापीठ देत आहे ९० कोर्स फ्री मध्ये. घरबसल्या करा ऑनलाइन कोर्स तो पण हार्वर्ड विद्यापीठातून.
कोरोना विषाणू धोका आपल्या देश्या बरोबरच सर्व जगभर वाढत आहे.सर्व देश्यांची सरकारे आप आपल्या देशातील लोकांना घरी राहा,बाहेर पडू नका असे आव्हान करत आहे.
याच दरम्यान बऱ्याच कंपन्या वर्क फ्रॉम होम चा अवलंब करताना पाहायला मिळत आहेत. तर बऱ्याच इन्स्टिट्यूट या ऑनलाईन कोर्सेस आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत.
जगातील सर्वोत्तम विद्यापीठा पैकी एक म्हणून ख्याति असलेले हार्वर्ड विद्यापीठ आपल्याला फ्री कोर्सेस देत आहे.आणि विशेष म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाने १-२ नव्हे तर जवळ पास ११ विभागां मधले ९० कोर्सेस फ्री मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.
हार्वर्ड विद्यापीठ च्या फ्री कोर्सेस ची वैशिष्ट्ये
- कोर्स करण्यासाठी तुमच्या मागील काळातल्या कोणत्या ही प्रकारच्या क्वॉलिफिकेशन अथवा नॉलेज ची गरज नाहीये.
- तुमच्या वेळे नुसार तुम्ही कोर्स करू शकता.
- Lockdown नंतर सुद्धा हे कोर्सस असेच फ्री मध्ये चालू राहणार आहेत.
हार्वर्ड विद्यापीठ च्या कोर्सेस ची माहिती

- वरील फोटो मध्ये दर्शवलेल्या या ११ विभागांचे जवळ पास ९० कोर्स फ्री मध्ये आहेत.
- यातील कोणत्या ही विभाग मधला कोर्स तुम्ही करू शकता.
- तुमच्या वेळे नुसार तुम्ही ऑनलाईन हे कोर्स करू शकता.
- विडिओ लेक्चर द्वारे आपले कोर्स होतील.

- आपल्या कडे लॅपटॉप/कॉम्पुटर असावा असे देखील काही नाही,मोबाइल वर सुद्धा हे कोर्स तुम्ही करू शकता.त्या साठी तुम्हाला वरील फोटो मध्ये दिल्या प्रमाणे गूगल प्ले स्टोर ला edx टाइप करून हे app इन्स्टॉल करावे लागेल.
कोर्स सुरू करण्याची माहिती:-
Step 1

- प्रथम तुम्हाला गूगल वर “harvard university” असे टाइप करावे लागेल आणि मग फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्ही free online courses वर क्लिक करा.
किंवा
- डायरेक्ट (https://online-learning.harvard.edu/catalog/free) ह्या लिंक वर क्लिक करून विद्यापीठाच्या वेबसाइट च्या फ्री कोर्स च्या विभागात जा.
Step 2

- अशी विंडो ओपन होईल त्या मध्ये तुम्ही price वर क्लिक करा आणि नंतर free वर टिक करा.
Step 3
- तुमच्या समोर ९० फ्री कोर्स आलेले आहेत.त्यातील तुम्हाला जो पाहिजे तो कोर्स तुम्ही करू शकता.वरील सूची मध्ये दिलेल्या मेनू नुसार तुम्ही कोर्स निवडू शकता.(Subject Area,Start date,Duration,Difficulty)
हार्वर्ड विद्यापीठ चे सर्टिफिकेट:-
- युनिव्हर्सिटी तुमचा कोर्स झाल्यावर तुम्हाला verified certificate देते.परंतु त्या साठी ते तुमच्या कडून १०० ते २०० डॉलर एवढे शुल्क आकारू शकतात.
- आम्ही आपल्याला एवढे पैसे खर्च करून हे सर्टिफिकेट घ्याच म्हणून सांगणार नाही,परंतु तुम्ही Lockdown च्या काळात हे कोर्स करून तुमच्या क्षेत्रातील ज्ञान वाढवू शकता.तसेच काही कोर्सेस हे तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये देखील उपयोगी पडणारे आहेत.
- ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जर सर्टिफिकेट घेतले तर या जगातील सर्वोत्तम असलेल्या युनिव्हर्सिटी च्या सर्टिफिकेट चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.
1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अजित पवार (1) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)