प्रोटीन युक्त आहार मराठी | प्रथिने युक्त आहारा बाबत संपुर्ण माहिती

प्रोटीन युक्त आहार मराठी (protein yukt ahar information in marathi) >> आपल्या दैनंदिन कामासाठी तसेच आपल्या शरीराच्या सुयोग्य आणि सदृढ वाढीसाठी आपण नियमित आणि वेळेवर सुयोग्य असा आहार घेत असतो, त्यामुळे आपल्याला पुरेशी उर्जा आणि शरीराला आवश्यक घटक मिळत असतात. केवळ आहार घेतल्याने आपल्याला काम करण्यासाठी उर्जा आणि शरीराला आवश्यक घटक मिळत असतात.

केवळ कोणत्याही प्रकारचा आहार घेतल्याने आपल्याला काम करण्यासाठी ऊर्जा म्हणजे ताकद किंवा शक्ती मिळेलच असे नाही, त्यासोबतच शरीराच्या उत्तम वाढीसाठी आणि अंतर्गत सदृढतेसाठी प्रोटीन म्हणजे प्रथिने, कर्बोदके, मेद, जीवनसत्त्वे, आणि खनिजे(Minerals) यांची आवश्यकता असते. वरील पाच घटकांपैकी सर्वात जास्त आणि अतिशय महत्त्वाचा असा घटक हा प्रोटीन आहे. आपल्या शरीरात मुबलक प्रमाणात प्रोटीन असणे खुप गरजेचे आहे, असे नॅशनल हेल्थ ऑर्गनायझर(National Health Oraganizer) यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी आपण नियमित जो आहार घेतो तो प्रोटीनयुक्त असावा याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

या लेखामध्ये आपण प्रोटीन युक्त आहार म्हणजे काय? तसेच तुम्ही आता घेत असलेल्या आहारात कोणते बदल आवश्यक आहेत ते जाणून घेऊयात. चला तर मग जाणून घेऊयात प्रोटीन युक्त आहार विषयी माहिती.

प्रोटीन युक्त आहार मराठी(Protein yukt ahar information in marathi)

आपल्या शरीराची उभारणी, सदृढता ही सर्वात जास्त आपल्या आहारावर अवलंबुन आहे. त्यामुळे सकस, सात्विक आणि परिपुर्ण सर्व घटकद्रव्यांचा समावेश रोजच्या आहारातुन होयला हवा, असा अटटाहास असावा. सकस, सात्विक आणि प्रोटीन युक्त आहार बरोबरच निरोगी आरोग्यासाठी खालील गोष्टी कराव्या.

  • आजारंपासुन स्वतःचे रक्षण करणे
  • नियमित व्यायाम करणे
  • आवश्यक तेवढी झोप घेणे
  • परिसराची आणि शरीराची स्वच्छता ठेवणे

वरील सर्व गोष्टींचे पालन करून आपण आपले बाहय संरक्षण करू शकतो, परंतु शरीराचे अंतर्गत संरक्षण आणि शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ते आपल्याला आहारातुनच घ्यावे लागतात.

आपल्या आहारातुन आपल्याला जे घटक मिळतात त्याचे दोन गटांत वर्गीकरण केले जाते.

१. उर्जा देणारे अन्न [Energy Giving Food]

२. शरीर बनविणारे अन्न [Body Building Food]

३. खनिजे युक्त अन्न :- जे आपल्याला फळांमधुन, पालेभाज्यांतुन मिळतात आणि मिनरल्स देतात. त्याला प्रोडक्टीव फुड (Productive Food)म्हणतात.

वरील विश्लेषणातुन आपल्या लक्षात आले असेलच की, म्हणजे प्रथिने हे आपल्याला केवळ आणि केवळ आहारातुनच मिळु शकतात. त्यासाठी आपला आहार घेत असतात तेव्हा तो प्रोटीनयुक्त आहे की नाही? किंवा प्रोटीनयुक्त कसा होईल याचा अवश्य विचार करावा. त्यासाठी आमचा आजचा हा लेख नक्कीच उपयुक्त ठरेल.

प्रोटीन आहाराचे महत्व आणि आहाराचे प्रकार

प्रोटीन म्हणजे प्रथिने, प्रोटीनची गरज आपल्याला आपल्या शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असते. लहान वयाच्या मुलांसाठी म्हणजे 6 ते 20 वर्षापर्यंतच्या मुलांना तर मुबलक प्रमाणात त्यांच्या आहारातुन प्रोटीन मिळणे हे अतिशय गरजेचे आहे. मुलांच्या परिपुर्ण शारीरिक विकास आणि वाढीसाठी त्यांच्या आहाराचे नियोजन करून पुरेपुर प्रमाणात प्रोटीन दिले गेले पाहिजेत.

मुलांच्या शारीरीक वाढीस प्रोटीन मदत करतात. त्यामुळेच प्रोटीन ला (Growth Food) असे देखील म्हणटले जाते. शरीरातील अनेक अवयवांच्या शारीरीक वाढीची कार्य प्रोटीनच पुर्ण करत असते. आपण जो नियमित आहार घेतो, त्या प्रत्येक पदार्थामध्ये प्रोटीन असतेच असे नाही. प्रत्येक पदार्थात प्रोटीनच प्रमाण कमी अधिक प्रमाणात असते, आहाराचे सामान्यतः दोन भागात वर्गीकरण केले जाते.

1. वनस्पतीक म्हणजे  Veg (शाकाहारी)

2. प्राणिक म्हणजे Nonveg (मांसाहारी)

  जे लोक शाकाहारी आहेत, म्हणजे मांस-अंडी खात नाहीत त्यांना वनस्पतीक आहारातुन देखील पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळु शकते. चला तर बघुया या दोन्ही भागातील कोणकोणत्या पदार्थात आपल्याला प्रोटीन मिळु शकेल. वनस्पतीक म्हणजे शाकाहारी पदार्थातील सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य म्हणजे मुग, मटकी, राजमा तसेच सोयाबीन, शेंगदाणे आणि काजु इत्यादी वनस्पतीक म्हणजेच शाकाहारी आहारातील पदार्थामधून आपल्याला भरपुर प्रमाणात ‘प्रोटीन‘ मिळते.

शाकाहार - प्रोटीन युक्त आहार मराठी(Protein yukt ahar information in marathi)
प्रोटीन युक्त आहार मराठी(Protein yukt ahar information in marathi) – शाकाहार

त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात वरील सर्व घटकांपैकी जास्तीत जास्त घटक समाविष्ट असतील असा विचार करून आपण आपल्या आहाराचे नियोजन केले पाहिजे. फक्त मांसाहार घेतल्यानेच प्रोटीन मिळते असे नाही, शाकाहारी आहार घेणार्‍या लोकांना देखील या प्रकारच्या आहारातून प्रोटीन मिळेल.

मांसाहार - प्रोटीन युक्त आहार मराठी(Protein yukt ahar information in marathi)
प्रोटीन युक्त आहार मराठी(Protein yukt ahar information in marathi) – मांसाहार

जे लोक मांसाहारी आहेत, त्यांना त्यांच्या ‘प्राणिज आहांरतुन‘ अगदी जास्त प्रमाणात प्रोटीन मिळु शकते. त्या पदार्थामध्ये अंडे, मांस, मासे, चिकन- मटन यांचा समावेश होतो. अशाप्रकारे शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या लोकांना आपल्या आहारातुन योग्य प्रमाणात प्रोटीनच्या मात्रेचा समावेश करता येईल.

सकर, सात्विक, परिपुर्ण, पौष्टिक आहारा बरोबरच तो आहार प्रोटीनयुक्त असावा, यावर सर्वांनी अगदी आवश्यक समजुन भर ध्यावा. कारण प्रोटीन हे आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहे, प्रोटीन मधुन आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळत असते. आपण आहारातुन घेतलेले प्रोटीन शरीरात इतर प्रोटीन्संची निर्मिती करत असतात. जसे  Albumin, Globulin, Pro – thrombia इत्यादी. यासोबत आपल्या शरीराची वाढ करणे, हे सर्वात महत्त्वाचे कार्य प्रोटीन करतात. लहान मुलांच्या आहारात तर, याचा आवर्जुन समावेश करावा.

सारांश – प्रोटीन युक्त आहार मराठी (Protein yukt ahar information in marathi)

वरील लेख वाचुन प्रोटीन युक्त आहार आपले आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी कशाप्रकारे महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात आलेच असेल. शाकाहांरी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या आहारात आपण कोणते पदार्थ समाविष्ट केले तर आपला आहार प्रोटीन युक्त होईल हे देखील वरील लेखातुन तुम्हाला स्पष्ट झालेच असेल. या मध्ये दिलेल्या माहिती नुसार प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा ज्यामुळे तुम्हाला तुमचे शरीर निरोगी आणि सदृढ ठेवण्यास नक्कीच मदत मिळेल.

आपल्याला प्रोटीन युक्त आहार संबंधित ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “प्रोटीन युक्त आहार मराठी | प्रथिने युक्त आहारा बाबत संपुर्ण माहिती”

Comments are closed.

Scroll to Top