लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन कसे करावे (lakshmi pujan kase karave in marathi)
सण उत्सव शुभेच्छा

लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन – संपुर्ण माहिती

लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन कसे करावे (lakshmi pujan kase karave in marathi) >> दिवाळी म्हंटले की सर्वात महत्वाच दिवस असतो तो लक्ष्मी पूजनाचा, त्यामुळे लक्ष्मी पुजन कसे करावे काय काय करावे आणि कोणती कोणती पुजा करावी हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण तेच सर्व जाणून घेणार आहोत की लक्ष्मी पूजन कसे करावे.

लक्ष्मी म्हणजे केवळ श्रीमंती भरपूर पैसा नव्हे, लक्ष्मीचे आगमन म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृध्दि , यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दिर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे.

लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन कसे करावे (lakshmi pujan kase karave in marathi)
लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन कसे करावे (lakshmi pujan kase karave in marathi)

लक्ष्मी पुजन कसे करावे (lakshmi pujan kase karave in marathi) – दिवाळी लक्ष्मी पूजन कसे करावे मराठी / diwali lakshmi pujan vidhi marathi 

बरेचदा श्री लक्ष्मीपुजन करताना अनवधनाने श्रीविष्णुंचे स्मरण, प्रार्थना करणे राहुन जाते. श्री महालक्ष्मी तत्वांच वैशिष्टय म्हणजे जिथे विष्णुचे स्मरण प्रार्थना होते त्याठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुशिवाय राहत नाही त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णुदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरू नका. नुसते मानसिक स्मरण करावे किंवा ‘‘ ॐ नमो भगवते वासुदेवाय।। हा मंत्रजाप 11 वेळा करावा.

लक्ष्मी पुजन व इतर सजावट

घरातील दाराजवळ दोन्ही बाजुला स्वस्तिक काढावे, तुळशीपासुन घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायींची पावले रांगोळीने काढावीत. तुळशीजवळ दिवा व अगरबत्ती लावुन हळद-कुंकू फुले वाहुन पुजा करावी.

लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन कसे करावे (lakshmi pujan kase karave in marathi)
lakshmi pujan kase karave in marathi

चैरंगाच्या बाजुला रांगोळी काढावी, चैरंगावर प्रथम श्री लक्ष्मीनारायणाचा फोटो मांडुन घ्यावा सोने, चांदी नाणे, बॅंकेची पासबुके, सर्टीफिकेट, नोट यांचीही पुजा करावी, कुलदेवतेचा टाक असेल तर तो पण ठेवावा.जोडपानावर कुलदेवतेची व कुबेराची सुपारी ठेवावी. श्री लक्ष्मी चे नाणे किंवा प्रतिमा ठेवावी. आणि नारळ ठेवून स्वस्तिक काढावे तसेच केरसुणीची पुजा करावी. हे लक्ष्मी पुजन करत असताना घराचे सर्व दरवाचे, खिडक्या उघडे ठेवावेत.

लक्ष्मी पुजनासाठी काही प्रभावी मंत्र / लक्ष्मी पूजन मंत्र / लक्ष्मी पूजन आरती

मंत्रजाप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. जप करताना 108 वेळा जप करावा. जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृध्दि , यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दिर्घायुष्य प्राप्ती व्हावी. अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळीना वाटावा ज्यांना जमत असेल येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत.

ॐ श्री नमः यात

ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नमः

ॐ महालक्ष्मीच विघ्महे, विष्णुपत्नैच धिमही, तन्नो लक्ष्मीप्रचोदयात

ॐ हीम पद्ये स्वाहा

आरती विधी कापराच्या एक किंवा चार वडया प्रज्वलित ठेवून आरती केली जाते. ॐ महालक्ष्मी चरणी नमस्कार करा हात जोडुन प्रणाम नमस्कार करा.

पुष्पांजली विधी व क्षमाप्रार्थना

हातात फुले अथवा फुलांच्या पाकळया घ्या वरील मंत्र बोलुन फुले देवीच्या चरणी समर्पित करा. आणि महालक्ष्मीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करा. प्रदक्षिणा मंत्र मनुष्याने केलेली सर्व पापे परिक्रमा करतेवेळी पावला पावलांवर नष्ट होउन जातात. महालक्ष्मीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करतो.

हे महालक्ष्मी। तु विघ्नावर विजय मिळविणारी आणि ज्ञान संपन्न आहेस, आपल्या चरणी माझा नमस्कार | हे लक्ष्मी तु नेहमी माझ्या कार्यात येणार्‍या विघ्नांचा सर्वनाश कर.

दिपक पुजन व पुजा समर्पण

लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन कसे करावे (lakshmi pujan kase karave in marathi)
दिपक पुजन

दिवा पात्रात तुप टाकुन कापसाची वात लावा, दिवा उजळुन झाल्यावर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मुर्तीच्या उजव्या बाजुला ठेवून दया.

नंतर हातात फुलाच्या पाकळया घेवुन खालील मंत्र  म्हणा.

मंत्र:- ‘‘ हे दीप देवी, आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पुजा चालु असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित हेात राहावे.

अशा पध्दतीने लक्ष्मीपुजन पार पाडावे.

विधी पुजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे. प्रथम साष्टांग प्रणाम करा, त्यानंतर हातात पाणी घेवुन खालील मंत्र बोला व पाणी पात्रात सोडुन द्या.

मंत्र:- या पुजेमुळे सिध्दी बुध्दीसहीत लक्ष्मी संतुष्ट होउ दे या पुजेवर माझा नाही तिचाच अधिकार आहे.

diwali lakshmi pujan kase karave in marathi

सारांश – दिवाळी लक्ष्मी पुजन कसे करावे मराठी संपुर्ण माहिती

आम्ही लक्ष्मी पुजन कसे करावे हे या लेखाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. दिवाळीला लक्ष्मी पुजन करताना विधिवत पुजा कशी करावी, तसेच काही प्रभावी मंत्र, पुष्पांजली विधी, क्षमाप्रार्थना, दिपक पुजन व पुजा समर्पण या बाबतची विस्तृत माहिती या लेखामध्ये आपल्याला दिलेली आहेच. तरी देखील विविध प्रदेशा नुसार लक्ष्मी पुजन करण्याची वेगवेगळी पद्धत असू शकते.

आपल्याला लक्ष्मी पुजन कसे करावे ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसेच आपल्या काही सूचना असल्यास आवश्य सांगा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

2 Replies to “लक्ष्मी पुजन कसे करावे | दिवाळी लक्ष्मी पुजन – संपुर्ण माहिती

  1. Hello! I simply want to give you a big thumbs up for the excellent information you have got here on this post. Ill be returning to your website for more soon.

  2. Hello there! I simply want to offer you a huge thumbs up for your excellent information you have here on this post. I will be coming back to your website for more soon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *