गती व गतीचे प्रकार | गतीमुळे वस्तूचे होणारे स्थलांतर – संपुर्ण माहिती

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

गती व गतीचे प्रकार | गतीमुळे वस्तूचे होणारे स्थलांतर – संपुर्ण माहिती >> आपल्या दैनंदिन जीवनात तसेच शैक्षणिक अभ्यासात ‘गती‘ ला मोलाचे स्थान आहे. भौतिकशास्त्रात तर गती विषयी अधिक माहिती सांगितलेली असुन ‘गती आणि गतीचे प्रकार’ तसेच गतीचे स्वरूप यासांरख्या ब-याच गोष्टींचा समावेश विधार्थ्यांच्या ज्ञानसंपादनासाठी करण्यात आला आहे. गती ही अनेक भौतिक प्रणाली, कार्य, वस्तु यांना लागु होते. गती ही आपल्या दैनंदिन जीवनात देखील महत्वाची आहेच. या लेखामध्ये आपण याच ‘गती व गतीचे प्रकार‘ बाबत संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

गती व गतीचे प्रकार (Motion and types of motion in marathi) – संपुर्ण माहिती

लेखाच्या सुरवातीला आपण गती म्हणजे नेमके काय? त्याची व्याख्या तसेच माहिती जाणून घेणार आहोत त्यानंतर गतीचे विविध प्रकार बघूयात. चला तर मग जाणून घेऊयात गती व गतीचे प्रकार.

गती म्हणजे काय?

वस्तुच्या स्थानात होणारा बदल म्हणजेच त्याची ‘गती‘ होय. गती म्हणजे कोणत्याही वस्तुच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय. गती ही भौतिकशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना आहे. गतीला इंग्लीश मध्ये स्पीड (speed) किंवा मोशन (motion) असेही म्हणतात. गतीच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास, जर एखादी वस्तु ठरावीक जागेपासुन वेळेनुसार जागा बदलत असेल तर त्या वस्तुला गती आहे असे म्हणतात. तसेच ‘जर एखादी वस्तु आपल्या जागेपासुन हलत नसेल किंवा स्वतःची जागा वेळेनुसार बदलत नसेल, तर ती वस्तु स्थिर आहे असे म्हणतात. गती ही विविध भौतिक प्रणालीला लागु होते. गतीमुळे एखाद्या चल किंवा अचल वस्तुच्या स्थितीत होणारा बदल किती प्रमाणात होतो किंवा होतच नाही याचा अंदाज घेता येतो.

गतीला कार्यान्वित होण्यासाठी बलाची आवश्यकता असते. म्हणजेच एखाद्या स्थिर वस्तुला गती देण्यासाठी किंवा ती वस्तु गतिमान होण्यासाठी त्या वस्तुला बल लावले जाते. बल लावले असता ती वस्तु आपली जागा सोडते म्हणजेच तिला गती प्राप्त होते.

आपल्या रोजच्या व्यवहारात आपण पाहतो की, जलद, मंद, स्थिर या गतीशी संबंधित ब-याच शब्दांचा आपण वापर करतो. फास्ट / जलद किंवा मंद किंवा कमी वेळात, जास्त वेळात,लवकर हे सर्व गतीच्या प्रकारात किंवा गतीचे, गतिमान तेचे वर्णनच असते. पंरतु गतीचे काही विशिष्ट प्रकार असतात. आणि ते सर्व प्रकार त्या वस्तुच्या गती / गतीमाना वरून पडत असतात.

गतीचे प्रकार व त्यांची विस्तृत माहिती / गतीचे प्रकार किती व कोणते ?

दैंनदिन जीवनात आपण बर्‍याच गतिमान वस्तु किंवा गती असलेले घटक पाहत असतो. जसे फिरणारा पंखा, चालणारी मोटर गाडी, मुंगीचे चालणे, नळांतुन पडणारे पाणी, झोक्याचे झुलने, पक्ष्याचे उडणे, घडयाळा मध्ये पळणारे काटे, आकाश पाळण्याचे फिरणाची गती आणि दिशा, फुलपाखरांचे फुलांवर उडणे, आकाशातील विमानाची गती, सायकल यांसारख्या असंख्य गतिमान वस्तु किंवा गोष्टी आपण पाहतो.

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

यांवरून थोडक्यात गतींचे प्रकार विचारल्यास आपण जलद, मंद असेच सांगू शकतो. पंरतु गतीचा व्यापक स्वरूपात अभ्यास केल्यानंतर अगदी वेगळे प्रकार आपणास पाहावयास आणि शिकावयास मिळतात. तर यापुढील लेखात आपण पाहणार आहोत ‘गतीचे प्रकार‘. गतीचे खालील महत्त्वाचे पाच प्रकार आहेत.

१) रेषीय गती (Linear Motion)

२) आंदोलित गती (Agitated Motion)

३) नियतकालिक गती (Periodic Motion)

) यादृच्छिक गती (Random Motion)

५) वर्तुळाकार गती (Circular Motion)

रेषीय गतीचे दोन उपप्रकार पडतात.

अ) एकसमान रेषीय गती (Uniform Linear Motion)

ब) असमान रेषीय गती (Non – Uniform Linear Motion)

आता आपण वरील गतीच्या विविध प्रकारांची विस्तृत माहिती बघूयात.

१) रेषीय गती (रेषीय गती व गतीचे प्रकार) (Linear Motion)

गती व गतीचे प्रकार (Motion and types of motion in marathi)
रेषीय गती – गती व गतीचे प्रकार (Motion and types of motion in marathi)

एखादी वस्तु एकाच सरळ रेषेत स्थंलातरीत होत असेल तर त्या गतीला रेषीय गती म्हणजेच Linear Motion असे म्हणतात. रेषीय गती ही एका सरळ रेषेत होतांना दिसते, रस्त्यावरून जाणा-या गाडया, झाडावरून पडणारे फळ, हातातुन एखादा चेंडु खाली सोडला तर तो देखील रेषीय गतीत म्हणजे सरळ रेषेत खाली पडतो. रेषीय गतीचे दोन उपप्रकार पुढील प्रमाणे:-

अ) एकसमान रेषीय गती (Uniform Linear Motion)

ठराविक वेळेत, ठराविक गोष्ट, ठराविक अंतर समान वेळेत पुर्ण करणार्‍या गतीला एकसमान रेषीय गती (Uniform Linear Motion) म्हणतात. म्हणजे एका विशिष्ट कालावधीत एका सरळ रेषेत जाणार्‍या वस्तुने पुर्ण केलेले अंतर जेव्हा सारखेच असते, तेव्हा त्या गतीला ‘रेषीय एकसमान गती‘ म्हणतात.

उदा. संचयन करणार्‍या सैनिकांची चालण्याची गती.

एकसमान रेषीय गती - गती व गतीचे प्रकार (Motion and types of motion in marathi)
एकसमान रेषीय गती – गती व गतीचे प्रकार (Motion and types of motion in marathi)
ब) असमान रेषीय गती (Non-Uniform Linear Motion)

ठराविक वेळेत ठराविक गोष्ट सतत असमान अंतर पुर्ण करत असेल तर त्या गतीस असमान रेषीय गती (Non-Uniform Linear Motion) असे म्हणतात. म्हणजेच वस्तुच्या स्थलांतराची गती एकरेषीय असते पण , एकसमान नसते.

२) आंदोलित गती (Agitated Motion)

एका विशिष्ट अंतरात सतत च्या होणार्‍या क्रियेला आंदोलित गती (Agitated Motion) असे म्हणता येईल. आंदोलनामुळे एखाद्या वस्तूला मिळणार्‍या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. जसा झोका एका टोकाकडुन दुस-या टोकाकडे जातो आणि परत पहिल्या टोकाकडे येतो. त्याला आंदोलन म्हणतात. जसे पंख्याच्या उडण्याच्या गतीला पण आंदोलित गती म्हणतात.

झोका - आंदोलित गती (Agitated Motion)
झोका – आंदोलित गती (Agitated Motion)

३) नियतकालिक गती (Periodic Motion)

ज्या गतीमध्ये ठराविक वस्तु ही ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदुतुन जाते, त्या गतीला नियतकालीक गती (Periodic Motion) असे म्हणतात. नियतकालिक गती ठराविक वेळेत एक फेरी पुर्ण करते.

उदा. पृथ्वीची सुर्याभोवती फिरण्याची गती ही नियतकालिक असते.

नियतकालिक गती - गती व गतीचे प्रकार (Motion and types of motion in marathi)
नियतकालिक गती – गती व गतीचे प्रकार

४) यादृच्छिक गती (Random Motion)

ज्या गतीची दिशा ही सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती (Random Motion) असे म्हणतात. यादृच्छिक गतीला कोणत्याही प्रकारची निश्चित अशी दिशा नसते, तसेच विशिष्ट कालावधी देखील नसतो.

उदा. फुलपाखरांची एका फुलावरून दुस-या फुलावर उडण्याची दिशा निश्चित नसते, त्यामुळे त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

५) वर्तुळाकार गती (Circular Motion)

वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूच्या गतीस वर्तुळाकार गती (Circular Motion) असे म्हणतात. वर्तुळाकार गती नेहमी वर्तुळाकार मार्गातच जाणवते. गाड्यांची चाके वर्तुळाकार गतीतच फिरत असतात, पंख्याची पाती, लहान मुलांचे आकाश पाळणे ही सर्व गतीच्या वर्तुळाकार गती ची उदाहरणे आहेत.

आकाश पाळणे - वर्तुळाकार गती (Motion and types of motion in marathi)
आकाश पाळणे – वर्तुळाकार गती

सारांश – गती व गतीचे प्रकार स्वाध्याय

अशा प्रकारे गती व गतीचे प्रकार हे आपण या लेखात शिकलो. गती ही गतिमान वस्तूलाच प्राप्त झालेली असते. गतिमान वस्तूचे स्थलांतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असते. रेषीय गती त्यात एकसमान आणि असमान रेषीय गती, आंदोलीत गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती आणि यादृच्छिक गती हे गतीचे प्रकार आहेत व त्यांची विविध उदाहरणे देखील आपण जाणून घेतली आहेत.

गती म्हणजे काय ?

गती म्हणजे कोणत्याही वस्तुच्या स्थितीत काळानुसार किंवा बलाचा वापर करून होणारा बदल होय. गती ही भौतिकशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना आहे. गतीला इंग्लीश मध्ये स्पीड (speed) किंवा मोशन (motion) असेही म्हणतात.

तुम्हाला “गती व गतीचे प्रकार” ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपला काही सल्ला असल्यास तो देखील आम्हाला पाठवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top