घटस्थापना कशी करावी / घटस्थापना माहिती / नवरात्री घटस्थापना माहिती (navratri ghatsthapana information in marathi) >> नवरात्र उत्सवाची सुरूवात प्रतिपदा तिथीला घटस्थापने पासुन होते व यादिवशी घटस्थापना, कलशस्थापना केली जाते. पंरतु ही घटस्थापना /कलश स्थापना शास्त्रानुसार विधिनुसार होणे गरजेचे आहे. त्यामध्ये एक ही चुक होता कामा नये जर असे झाल्यास आपले नऊ दिवसाचे वृत हे निशफळ हेाणार आहे.
त्यामुळेच या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत घटस्थापना कशी करावी या बाबत संपुर्ण माहिती. चला तर मग जाणून घेऊयात घटस्थापना कशी करायची.
घटस्थापना कशी करावी / घटस्थापना माहिती / नवरात्री घटस्थापना माहिती (navratri ghatsthapana information in marathi)
घटस्थापना कशी करावी या बाबतची संपुर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. सुरवातीला आपण घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात त्यानंतर विधिवत घटस्थापना कशी करावी या बाबतची माहिती बघूयात.
घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य
आपल्याला वातीसाठी कापुस लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला देवीचे ओटीचे साहीत्य लागणार आहे. पाने, हळद, कुंकू व घटासाठी दोरा लागणार आहे. त्याच्यानंतर देवीचे सौंदर्य साहित्य देखील काढून ठेवा. पुजेसाठी फळे, घटासमोर व देवासमोर काढण्यासाठी रांगोळी पण लागेल. आणि ७ प्रकारचे धान्य लागणार आहे, त्याच्या मध्ये ७ विविध प्रकारचे आपण कोणतेही धान्य घेवु शकतो. मुग, मसूर, ज्वारी, तांदुळ, हरभरा, बाजारी, गहू असे कोणतेही धान्य घेवु शकता.
याद्वारे आपण वेदिका तयार करणार आहेात, त्याला लावण्यासाठी दिवा लागणार आहे. हा दिवा आपल्याला अंखड नऊ दिवस लावायचा आहे आणि आपण जी मातीची वेदिका तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्याला पाटी लागेल. तसेच पाट, लाल रंगाचे कापड, मातीचे मडके, कलश, तांदूळ, पानाचा विडा व देवीचा फोटो या सर्व गोष्टींची आपल्याला घटस्थापनेसाठी गरज भासणार आहे.
घटस्थापना कशी करावी – नवरात्री घटस्थापना विस्तृत माहिती
सर्व प्रथम घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्याठिकाणी पाट ठेवायचा आहे, पाटाच्या वरती लाल कापड टाकुन त्याच्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढुन मस्त सजवायचे आहे. देवीला लाल वस्त्र हे अतिशय प्रिय असतं त्यामुळे देवीच्या आसनावर लाल रंगाचे कापड टाकायचे आहे.
आता घटासाठी आपण मातीच मडकं घ्यायचे कारण ते शुभ मानले जाते. त्यानंतर देवीचा फोटो किंवा मातीची मुर्ती सुध्दा चालेल. तसेच प्रथम गणपती स्थापना करून घ्यायची आहे. आपण ही स्थापना करत असतांना पानाचा विडा घ्या म्हणजे पानावर स्थापना करायची आहे. त्यानंतर पुजन करून घ्यायचे आहे. हळद, कुंकू लवायचे आहे. ॐ गणेशाय नमः | जय माता दि या मंत्राचा जप करायचा आहे स्थापना करतेवेळी हा जप करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे त्यासाठी आपण कलश घेतला आहे तो कलश कोठेही खाली ठेवायचा नाही तो ठेवण्यासाठी छोटे ताम्हण घेउन ताम्हणामध्ये खाली तांदुळ ठेवायचे आहेत व त्यावरती कलश ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे, व त्या कलशाच्या बाहेरील बाजूने हळदी कुकूंने स्वस्तिक काढुन त्या कलशाचे पुजन करून घ्यायचे आहे.
आता त्याच्यामध्ये पाच विडयाची पाने ठेवायची आहेत, त्यासाठी पाच पानांना हळदी कुंकू लावुन ती कलशामध्ये ठेवायची आहेत. हे सर्व झाल्यानंतर देवाच्या ठिकाणी हा कलश आपण स्थापना करायचा आहे व त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळावर देखील आपण स्वस्तिक काढुन घ्यायचे आहे. स्वस्तिक काढल्यामुळे ते शुभ प्रतिक मानले जाते. त्यानंतर ही झाली आपली कलश स्थापना आता त्याच्यावर फुल ठेवून नमस्कार करायचा आहे.
आता आपण घटस्थापना करून घ्यायची आहे, घटस्थापनेसाठी जी आपण पाटी घेतली होती ती पाटी ठेवायची आहे. त्या पाटीमध्ये एक दोन पेर एवढा उंच मातीचा थर होईल अशी माती टाकायची आहे. वेदीका तयार करायची आहे वेदीका तयार करत असतांना ॐ वेदीकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
आता त्या पाटीमध्ये आपल्याला ७ प्रकारचे धान्य जे धान्य आपण घेतले आहे ते टाकायचे आहे. त्याच्यावर पुन्हा थोडी माती टाकायची आहे, त्यामाती मध्ये पुन्हा सगळं एकत्र करून घ्यायचे आहे त्याच्यावर घटाचं मडक ठेवायचं आहे. आणि त्या मडक्यामध्ये पाच किंवा सात पान ठेवायची आहेत. त्या मडक्याच्या बाजुला धागा बांधुन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला नऊ पानांची नऊ फुलांची माळ तयार करायची आहे. अशी ती नऊ दिवस फुलांची माळ तयार करून बांधायची आहे आणि जी माळ आपण बांधणार आहोत ती माळ आपल्याला घटांमध्ये सोडायची आहे. अशा पध्दतीने नऊ दिवस माळी तयार करायच्या आहेत व घटामध्ये सोडायच्या आहेत आणि घटामध्ये आपल्याला सुपारी व हळकुंड देखील टाकायचं आहे.
त्याच्यानंतर देवीचं ओटीचं साहीत्य समोर ठेवायचे आहे. देवीला सुध्दा हार तयार करून घालायचा आहे, त्यानंतर देवीला फुले, पाच प्रकारची फळे ठेवायची आहेत आणि देवीला नमस्कार करायचा आहे. पानांच्या किंवा फुलांच्या माळी लावायचा आहेत अखंड नऊ दिवस आपल्याला देवीसमोर व घटासमोर दिवा हा तेवत / प्रज्वलित ठेवायचा आहे.
तसेच नऊ दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे आहे आणि व्रत करायचे आहे. आपल्या घरावर कुटूंबावर देवीचा आर्शिवाद असावा म्हणून दैनंदिन आपण नऊ दिवस या घटाची पुजा करायची आहे. हे पुजन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर देवीची आरती करायची आहे. धुप, अगरबत्ती लावायची आहे. आपली इच्छा देवीसमोर वक्त करायची आहे अशा पध्दतीने आपली घटस्थापना पुर्ण होईल.
सारांश – घटस्थापना कशी करावी / नवरात्री घटस्थापना माहिती
नवरात्र उत्सवात घटस्थापना कशी करावी याबाबतची माहिती आपण वरील लेखामध्ये बघितली. प्रदेशा प्रमाणे घटस्थापनेची पद्धत वेगवेगळी असू शकते, तुम्ही वरील लेखामध्ये दिल्या प्रमाणे घटस्थापना करू शकता. घटस्थापनेच्या दिवशी आपण केलेली घटस्थापणा ही दसर्याच्या दिवशी काढली जाते. तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात. आणि हे अंकुर कित्येक जण आपल्या गांधी टोपी मध्ये लाऊन दसर्याला सोने लुटतात. अशा रीतीने नवरात्र उत्सवाची सांगता होते.
आपल्याला घटस्थापना कशी करावी ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा,त्याच सोबत आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील अवश्य कमेंट करा.
यांसारख्या इतर माहिती च्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)