दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ व माहिती

Reselling Wahtsapp marketing software and CRM

दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ माहिती (diwali faral mahiti in marathi) >>दिवाळी हा भारतातील सर्वात मोठया प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे. दिवाळी हा सर्वाचा आवडता असा सण असल्यामुळे दिवाळी या सणाची सर्वजण वाट पाहत असतात. मनाला आनंद आणि उत्साह देणारा असा हा सण आहे. दिवाळी म्हटले की, नवीन कपडे घेणे त्याची आधीपासुनच तयारी करणे. त्याचप्रमाणे नवीन नवीन प्रकारचे फराळ बनवणे ही सर्व तयारी केली जाते.

दिवाळीतला फराळ हा खुप मोठया प्रमाणात केला जातो, आणि संपुर्ण दिवाळी मध्ये अगदी तुळशीच्या लग्ना पर्यन्त त्याचा आस्वाद घेतला जातो. आज आपण याच दिवाळी फराळा बद्दल माहिती बघणार आहोत. दिवाळी फराळ लिस्ट / यादी. फराळाचे विविध पदार्थ व त्यांची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ माहिती (diwali faral mahiti in marathi)

चिवडा

दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ माहिती (diwali faral mahiti in marathi)
चिवडा – दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी (diwali faral mahiti in marathi)

दिवाळीमध्ये सर्वात आवडता आणि चवीला ही छान लागणारा पदार्थ म्हणजे चिवडा, चिवडा हा प्रत्येकाच्या घरी दिवाळीमध्ये आवर्जुन लागणारा आणि तोंडाची चव वाढवणारा असा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. चिवडा हा अनेकप्रकारे आणि वेगवेगळया पध्दतीने बनवला जाऊ शकतो. मुरमु-याचा चिवडा, पातळ पोहयांचा चिवडा, मक्याचा चिवडा, मुरमुरे आणि पोहे मिक्स चिवडा.

अशा एक ना अनेक प्रकारे लोक चिवडा बनवितात. चिवडयामध्ये कडीपत्ता, शेंगदाणे, मिरच्या, तिखट, हळद, आणि काही लोक आवडीनुसार अनेक सामग्री मिक्स करून चिवडा बनवतात. आणि हया सर्व गोष्टी टाकल्याने चिवडा अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतो.

चकली

दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ माहिती (diwali faral mahiti in marathi)
चकली – दिवाळी फराळ यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ माहिती (diwali faral mahiti in marathi)

खातांना कुरकुरीत लागणारी गोल गरगरीत अशी ही चविष्ट चकली. चकली खायला जितकी सुंदर लागते त्याप्रमाणे ती दिसतेही काटेरी सुंदर, चकलीसुध्दा घरातील महिला विविध पध्दतीने बनवतात. चकली ही भाजणीची बनवतात. भाजणीची चकलीमध्ये वेगवेगळया डाळी मिक्स असतात आणि ही भाजणीची चकली अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी लागते.

तसेच ज्वारीच्या पिठाची, तांदळाच्या पिठाची, इंस्टन्ट सुध्दा चकली आपण बनवू शकतो. चकलीचे पीठ भिजवतांना त्यामध्ये तीळ टाकले तर वरून चकली तळल्यावर तीळ दिसतात. आणि ते खुप छान दिसते. चकली ही मंद आचेवर तळल्यास खुप चविष्ट आणि कुरकूरीत लागते. म्हणून फक्त दिवाळीमध्येच नाहीतर घरात अधुनमधुन चकली ही बनवली जातेच.

शंकरपाळी

दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ माहिती (diwali faral mahiti in marathi)
शंकरपाळी – दिवाळी फराळ लिस्ट

शंकरपाळी करायला जेवढी किचकट, तेवढीच खायला अप्रतिम असतात. शंकरपाळी ही गोड पण आपणकरू शकतो आणि खारे सुध्दा करू शकतो. शंकरपाळी दिसायला खुप सुंदर दिसतात आणि चवीला देखील मस्त असतात. कदाचित त्यामुळेच लहान मुलांना शंकरपाळी खुप आवडतात. शंकरपाळी अनेक पद्धतीने केली जाऊ शकते, जसे रव्याचे, मैदयाचे, आणि जुनी माणसे तर बाजरीच्या पिठाचे देखील गोड शंकरपाळे करायची त्यालाच कापण्या असे देखील म्हंटले जाते ते सुध्दा खुप छान लागतात. ही शंकरपाळी सकाळी चहा सोबत खाण्याची मजाच वेगळी आहे, त्यामुळे असा हा लहाना पासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ दिवाळीला प्रत्येक घरात न चुकता बनवला जातो.

लाडू (बेसन लाडू व बुंदीचे लाडू)

बेसन लाडू, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू - दिवाळी फराळाचे पदार्थ माहिती (diwali faral mahiti in marathi)
बेसन लाडू, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू – दिवाळी फराळाचे पदार्थ

लाडु म्हटले की तोंडाला पाणी सुटते आणि बेसनाचे लाडु तर खायला खुपच चवीष्ट लागतात. बेसनाच्या लाडुला चण्याची डाळ म्हणजेच हरभर्‍याच्या डाळीचे पीठ जे असते ना ते मंद आचेवर खरपुस असे भाजावे लागते आणि ते भाजताना तुपामध्ये भाजावे. त्यानंतर पुर्ण लाडु तयार झाल्यावर याची जी चव लागते ना ती मी शब्दांत नाही वर्णन करू शकत खुपच सुंदर आणि चविष्ट असे बेसन लाडु खुपच छान लागतात. म्हणूनच असे हे चविष्ट बेसनाचे लाडु अनेक महिला दिवाळीला आपल्या दिवाळी फराळ लिस्ट / यादी मध्ये हमखास बनवतातच.

तसेच रवा बेसनाचे लाडू देखील खायला खुप मस्त लागतात. रवा आणि बेसन सुंदर आणि लालसर भाजुन घेउन हे लाडु बनवतात किंवा यांखेरीस नुसत्या रव्याचे देखील तुम्ही लाडू बनवू शकता.

आधीच्या काळापासुन बुंदीचे लाडू लोक बनवतात आता तरी गोड पदार्थामध्ये अनेक व्हरायटी आल्या आहेत. पण आधीच्या महिला दिवाळी म्हंटले की बुंदीचे लाडू हे आपल्या दिवाळी फराळ लिस्ट / यादी मध्ये समाविष्ट करून घेतच असत.

करंजी

करंजी
करंजी – दिवाळी फराळ लिस्ट | दिवाळी फराळ यादी (diwali faral mahiti in marathi)

दिवाळी फराळ लिस्ट / यादी मधील गोड पदार्थांमध्ये करंजी ही बर्‍याच जणांना आवडते करंजी दिसते सुध्दा खुप गोड आणि लागते सुध्दा अप्रतिम. करंजी करतांना काही लोक करंजीच्या सारणामध्ये नारळाचा किस, आणि रवा भाजुन टाकतात. आणि इतर सुके मेवे सुध्दा टाकतात याने करंजी खुपच लाजवाब लागते.

तसेच करंजीच्या वरचे आवरण हे रव्याचे किंवा मैदयाचे करतात. याने काय होते की करंजी मधुन मउसुत लागते आणि वरून कुरकुरीत होते. आणि अशा या कुरूम कुरूम लागण्यामुळे करंजी खाण्याचा आनंद देखील चारपटीने वाढतो.

काटेरी शेव

काटेरी शेवदेखील खुप छान लागते ही शेव आपण सो-यामधील असलेल्या वेगवेगळया ज्या डिशा असतात. त्याच्या सहाययाने जाड शेव, बारीक शेव अशा वेगवेगळया प्रकारच्या शेव बनवत असतो.आणि छवि नुसार तिखट शेव बनवली जाते तसेच लहान मुलांसाठी मिठाची अशी शेव केली जाते. शेव ही अगदी मोठ्यांपासून लहानान पर्यंत सर्वांनाच आवडते. त्यामुळेच अशा या काटेरी शेव चा समावेश तुमच्या दिवाळी फराळ लिस्ट / यादी मध्ये करणे गरजेचे आहे.

भाकर वडी

भाकरवडी देखील खायला खुप सुंदर लागते भाकरवडी मध्ये तीखट, गोड, आंबट अशा सगळयांच चवी लागतात. त्यामुळे भाकरवडी अतिशय चवीष्ट लागते.अशी ही भाकरवडी दिवाळीच्या फराळाची नक्कीच शोभा वाढवते.

पापडी

सर्वच लहान मुलांना आवडणारी चनाच्या डाळीच्या पिठापासुन बनवलेली अशी ही पापडी जी की खायला खुपच सुरेख लागते. ही पापडी देखील विविध प्रकारे बनवली जाते गोड तिखट घरातील लोकांच्या आवडी नुसार पापडी केली जाते. या दिवाळीला तुमच्या दिवाळी फराळ लिस्ट / यादी मध्ये पापडी चा समावेश कराच.

खारी बुंदी

खारी बुंदीसुध्दा खुप छान लागते ही खारीबुंदी आपण चिवडयावर टाकुन खाउ शकतो. किंवा नुसती खायला देखील खुप छान लागते. दिवाळी फराळ लिस्ट / यादी मध्ये सर्व प्रकारच्या चवीच्या पदार्थांचा समावेश केला जातो आणि त्यामुळेच खारी बुंदी ही देखील या लिस्ट मध्ये येते. फक्त तिखट आणि गोड खाण्यापेक्षा जराश्या वेगळ्या चवीचा पदार्थ म्हणून तुम्ही खारी बुंदी दिवाळीच्या फराळामध्ये बनवू शकता.

गुलाबजाम

आपल्या कुटुंबातील लहाना पासून ते मोठ्यांपर्यंत जवळ जवळ सगळ्यांच आवडणारा गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम. ते बनवण्यासाठी हल्ली बाजारात आयते पॅकेट मिळते ज्या पासून अगदी कमी वेळात तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. आणि विकत गुलाबजाम आणण्या पेक्षा घरच्या घरी करून खाण्यात काही मजा औरच आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खास प्रसाद म्हणून देखील तुम्ही गुलाबजाम बनवू शकता.

सारांश – दिवाळी फराळाची यादी | दिवाळी फराळाचे पदार्थ व माहिती

वरील लेखामध्ये दिलेल्या दिवाळी फराळ लिस्ट प्रमाणे तुम्ही दिवाळीचे विविध पदार्थ घरी बनवू शकता. यांखेरीस बाकीचे देखील पदार्थ विविध प्रदेशांमध्ये दिवाळी निमित्त बनवले जातात ते देखील तुम्ही या दिवाळी ल बनवून बघू शकता.

आपल्याला ही दिवाळी फराळ लिस्ट / यादी विषयी माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top