Most Qualified Person Of India
शिक्षण

भारतातील सर्वात जास्त शिकलेला नेता,लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे नोंद.

डॉ.श्रीकांत जिचकर भारतातील सर्वात जास्त शिकलेला माणूस आणि नेता >> जाणून घेऊ या IAS, IPS, डॉक्टर, वकील,आमदार,मंत्री,म्हणून काम पाहिलेल्या सुशिक्षित व्यक्ती बद्दल.

आपल्या देशात कित्येक नेत्यांच्या शैक्षणिक डिग्री बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.पण ह्या सगळ्यांच्या मध्ये पण भारताच्या राजकारणात,महाराष्ट्राचा एक नेता असा होता ज्याच्या कडे १-२ नाही तर तब्बल २० डिग्री होत्या.

डॉ.श्रीकांत जिचकर भारतातील ‘सर्वात योग्य व्यक्ती’ (Most Qualified Person Of India) म्हणून ज्यांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. आज सुद्धा ते सर्वात जास्त शिक्षित भारतीय म्हणून ओळखले जातात.

डॉ.श्रीकांत जिचकर (सर्वात जास्त शिकलेला नेता)
डॉ.श्रीकांत जिचकर (सर्वात जास्त शिक्षित नेता)

आपल्यातील कित्येकांचे चांगले शिक्षण झाले असेल किंवा आपण शिकत असाल, पण आपण आपल्या आयुष्यात एखादी डिग्री घेऊन किंवा फारफार तर दोन-तीन डिग्री घेऊन त्या संबंधित क्षेत्रात काम/व्यवसाय करत असतो.परंतु आज आपण आपल्या भारत देश्यातील अश्या व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्या कडे दोन-तीन नाही तर तब्बल २० डिग्री होत्या आणि त्या देखील उत्कृष्ट गुण मिळवून. त्यातील कित्येक डिग्री मध्ये त्यांना गोल्ड मेडल देखील मिळाले होते.

श्रीकांत जिचकर यांच्या बद्दल काही आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी :-

  • श्रीकांत जिचकर यांचा जन्म १४सप्टेंबर १९५४ ला नागपूर मधील काटोल तालुक्यातील.
  • जिचकर ह्यांनी बऱ्याच विषयांमध्ये प्रभुत्व मिळवले होते,शेती सोबतच पत्रकारिता,मेडिकल,वकिली.
  • सर्व प्रथम त्यांनी MBBS ची डिग्री मिळवली होती.त्यानंतर त्यांनी कायदया (LLB) चे शिक्षण चालू केले.
  • कायदयाच्या LLB ची डिग्री घेतल्या नंतर त्यांनी आंतर राष्ट्रीय कायदा म्हणजेच LLM चा अभ्यास केला.त्यानंतर त्यांनी MBA ची आणि नंतर त्यांनी पत्रकारिते मध्ये पत्रकारिते मध्ये Bachelor in Journalism ही पदवी घेतली.
  • १९७३ ते १९९० च्या दरम्यान त्यांनी ४२ युनिव्हर्सिटी च्या परीक्षा दिल्या आणि ज्यादातर परीक्षा मध्ये ते प्रथम श्रेणी ने पास झाले आणि त्यांना गोल्ड मेडल सुद्धा मिळाले होते.
  • वयाच्या २५व्या वर्षी ते IPS परीक्षा पास झाले पण ते रुजूच झाले नाही आणि त्यांनी IAS ची परीक्षा दिली आणि ती देखील उत्तीर्ण झाले.
  • ४महिने IAS न्हणून काम केल्यावर त्यांनी परत राजीनामा दिला व ते राजकारणात आले.
  • सन १९८० मध्ये वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी ते काँग्रेस कडून आमदार (MLA) झाले.
  • पुढील काळात डॉ. श्रीकांत जिचकर हे महाराष्ट्र राज्याचे मंत्री देखील झाले,मंत्री असताना ते १४पेक्षा जास्त विभागांचे काम पाहत होते.या वरून च त्यांच्या अद्भुत विद्ववतेचा प्रत्यय येतो.
  • १९९२-९८ या काळात डॉ.जिचकर हे राज्य सभेचे सदस्य देखील होते.
  • संस्कृत मध्ये देखील त्यांनी D. Litt (साहित्याचे डॉक्टर ) ही पदवी मिळवली होती.
  • त्यांना गीता,वेद पुराण यां सारख्या ग्रंथांचे सखोल ज्ञान होते.
  • डॉ. जिचकर यांचे एवढे शिक्षण झाले आहे म्हंटल्यावर साहजिकच त्यांना वाचनाची खूप आवड होती आणि म्हणूनच त्यांच्या वयक्तिक लायब्ररी मध्ये ५२००० पेक्ष्या जास्त पुस्तके होती.
डॉ.श्रीकांत जिचकर आणि पुर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम
डॉ.श्रीकांत जिचकर आणि पुर्व राष्ट्रपति अब्दुल कलाम
  • डॉ. जिचकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते,ते एक प्रोफेशनल फोटोग्राफर, पेंटर तसेच स्टेज ऍक्टर देखील होते.

डॉ.श्रीकांत जिचकर यांनी १०विषयां मध्ये मास्टर्स(M.A.) ची डिग्री देखील मिळवली आहे.

  1. M.A.(Political Science)
  2. M.A.(Philosophy)
  3. M.A.(History)
  4. M.A.(Psychology)
  5. M.A.(Culture & Archaeology)
  6. M.A.(English Literature)
  7. M.A.(Sanskrit)
  8. M.A.(Public Administration)
  9. M.A.(Sociology)
  10. M.A.(Economics)

डॉ.श्रीकांत जिचकर यांचे नागपुर येथील Fitness Movement मधील भाषण :-

मृत्यू :-

डॉ.श्रीकांत जिचकर
डॉ.श्रीकांत जिचकर यांचा मृत्यू

अश्या या प्रतिभावान व्यक्तीचे वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी निधन झाले. २ जून २००४ रोजी नागपूर च्या जवळ एका रोड अपघातात त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

डॉ. श्रीकांत जिचकर हे विद्वान महाराष्ट्र पुत्र आपल्यात नाहीयेत,पण त्यांच्या ह्या अतुलनीय विद्वतेपासून महाराष्ट्रासह देशातील असंख्य तरुणांना प्रेरणा मिळत राहील.

टीप:- आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

4 Replies to “भारतातील सर्वात जास्त शिकलेला नेता,लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आहे नोंद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *