सेंद्रिय शेती – सेंद्रिय शेती म्हणजे काय | सेंद्रिय शेतीतील जैविक उपाय

Reselling Wahtsapp marketing software and CRM

सेंद्रिय शेती – सेंद्रिय शेती म्हणजे काय | वैशिष्टये | सेंद्रिय शेतीमधील जैविक उपाय (sendriya / organic farming information in marathi)>> सेंद्रीय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्र समजुत घेउन व रसायंनाचा वापर टाळुन केलेली एकात्मिक शेती पध्दती होय.

सेंद्रिय शेती म्हणजे काय? (ऑरगॅनिक शेती म्हणजे काय) >> शेती करतांना कोणत्याही रासायनिक खते अथवा रसायनांचा वापर न करता आपल्या शेती भोवतालचा पाचापाचोळा, कापणी झाल्यानंतर उरलेले शेतातील पिंकाचे अवशेष, कोंबड खत, गोमुत्र इत्यादी नैसर्गिक साधनांचा वापर करून केल्या जाणा-या शेतीला सेंद्रीय शेती असे म्हणतात.

पुर्वीच्या काळी शेती करताना फक्त शेणखताचा प्रामुख्याने वापर केला जात असे, तसेच शेतीसाठी आवश्यक बियाणे ही कोणत्याही प्रकारची प्रक्रीया न केलेली वापरली जात असत. त्यामुळे हल्लीच्या आधुनिक शेतीच्या प्रमाणात पारंपारिक शेतीत पिकाची गुणवत्ता उत्कृष्ट असे, साधारण पणे 1960 पर्यंत जमीन लाकडी नांगराने नांगरली जाई, काही कालावधी नंतर ती लोंखडी नांगराने होऊ लागली. आणि आताच्या काळामध्ये तर टॅक्टर ने शेती केली जावु लागली आहे. तसेच रासायनिक खते व औषधे यांचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. यासगळ्याचा परिणाम म्हणजे जमीन ही निकामी आणि कठीण होऊ लागली आहे.

सेंद्रिय शेती विषयी संपुर्ण माहिती | सेंद्रिय शेती कशी करावी | सेंद्रिय शेती विश्लेषण (sendriya / organic farming information in marathi)
sendriya / organic farming information in marathi

सेंद्रिय शेती विषयी संपुर्ण माहिती | सेंद्रिय शेती कशी करावी | सेंद्रिय शेती विश्लेषण (sendriya / organic farming information in marathi)

सेंद्रिय शेती पदधती नुसार पारंपारिक बी-बियाणे वापरणे जमिनीची होणारी झिज थांबवण्यासाठी शेताचे बांध व्यवस्थित करणे शेण, गोमुत्राचा वापर करणे तसेच लेंडी शिट यांचा जास्त प्रमाणात वापर करणे. या गोष्टी केल्यामुळे शेतातील सार्‍यात पाणी टिकुन राहते, आणि पाणी टिकून राहिल्या मुळे नांगरणीने जमिनीची चांगली मशागत होते. हल्ली गावामध्ये ही गुरे-ढोरे फार कमी प्रमाणात दिसुन येतात. आमच्या लहानपणी लावणीच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये 2 तरी नांगर दिसत, परंतु सध्या हे चित्र दुर्मिळ होवुन राहीले आहे.

सध्या आमच्या गावामध्ये अगदी हातावर मोजण्या एवढ्या घरांमध्येच नांगर आणि गुरे दिसतात. बाकी सर्व घरांमध्ये आता टॅक्टर दिसून येतात. माणसाला हल्लीच्या काळामध्ये झटपट काम करण्याची सवय लागल्यामुळे माणुस आळशी होत चालला आहे. नाहीतर पहिल्या काळी कुठे होते ब्लड प्रेशर, शुगर आता प्रत्येक घरामध्ये एकतरी असा असतो की त्याला ब्लड प्रेशर किंवा शुगर असते. याचे कारण ही काही प्रमाणात रासायनिक खते व औषधे आहेत. रासायनिक खतांचा वापर अधिक झाल्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. आणि या सगळ्यावर उपाय म्हणजे सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे.

चला तर मग जाणून घेऊयात सेंद्रीय शेतीची काही ठळक माहिती.

सेंद्रिय शेती ची वैशिष्टे / सेंद्रिय शेतीचे उद्दिष्टे / सेंद्रिय शेती प्रकल्प कार्यपद्धती (characteristics of organic farming)

  • मातीचा कस सुधारतो परिणामी मातीचे आरोग्यस्तर कायम राहण्यास मदत होते.
  • नैसर्गिक संतुलन कायम राहण्यासाठी किटकनाशके, रसायने, इत्यादींचा उपयोग न करता निर्सगाशी निगडीत वस्तुंचा अथवा घटकांचा वापर करणे.
  • सेंद्रीय पध्दतीने शेती केल्याने रासायनिक खतांवर व औषधांवर होणारा खर्च वाचु शकतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे शेती ही आर्थिक दृष्ट्या देखील सामान्य शेतकर्‍याला परवडते.
  • सेंद्रिय शेतीमुळे म्हणजेच सेंद्रिय शेतीतील अन्न धान्य खाल्यामुळे माणसाचे आरोग्य / शारीरिक स्वास्थ उत्तम राहते, आणि त्यामुळे मानवी जीवनमान उंचावण्यास मदत होते.
  • सेंद्रीय शेती केल्याने आर्थिक उत्पन्नात वाढ होते व पिकांसाठी होणार्‍या खर्चात घट यांमुळे शेतीचे उत्तम प्रकारे आर्थिक नियोजण होते.
  • सेंद्रिय शेतीमध्ये पांरपारिक पध्दतीचा वापर केला जातो. तसेच पाळीव प्राण्यांचा ही प्रामुख्याने वापर केला जातो.यामुळे इतर अवजारे अथवा मशीन घेऊन काम करण्याचा खर्च देखील कमी होतो.

सेंद्रिय शेती तील जैविक उपाय (सेंद्रिय खत)

अनेक शेतकर्‍यांना सेंद्रीय शेती करण्याची इच्छा असते, परंतु असे शेतकरी विविध पिकांवरील रोग आणि कीड याने त्रस्त असतात आणि त्यामुळेच ते रासायनिक शेती कडे वळतात. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सेंद्रीय शेती मधील जैविक उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.

कडूनिंब

अनेक वनस्पती ह्या किडनाशक असतात, त्यातल्या त्यात कडुनिंबाचा वापर कीड घालवण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो. कडुनिंबाच्या अर्काचा वापर हा किटक नियंत्रणात एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तुम्ही कडुनिंबाचा अर्क हा किडनाशक म्हणून पिकांवर फवारू शकता.

गोमुत्र

कडूनिंबा बरोबरच तुम्ही देशी गाईचे गोमुत्र देखील किडनाशक म्हणून वापरू शकता. ज्या पिकावर कीड पडली असेल किंवा कीड सदृश कृमी तुम्हाला आढळत असेल तर त्याचावर पाण्यात गोमुत्र टाकून त्यामिश्रणाची फवारणी केल्याने ती कीड नाहीशी होण्यास मदत होते. साधारणपणे १:२ या प्रमाणात गोमुत्र पाण्यात मिसळावे आणि त्याची फवारणी करावी.

आरोग्याचे तत्व

हवा, माती, धान्याची रोपे, पशु, प्राणी, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र याचे आरोग्य वाढवणे हा सेंद्रिय शेतीचा मुख्य उददेश आहे. सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचा अवलंब केल्यास आणि सेंद्रीय शेती च्या पद्धतीने पिकवलेल्या फळ भाज्या व धान्य खाल्ल्याने माणसाची रोगप्रतीकारक शक्ती वाढुन माणसाचे आरोग्य अधिक चांगले राहण्यास मदत होते.

सेंद्रिय शेती विषयी संपुर्ण माहिती | सेंद्रिय शेती कशी करावी | सेंद्रिय शेती विश्लेषण (sendriya / organic farming information in marathi)
sendriya / organic farming information in marathi

सेंद्रिय शेतीसाठी उत्तम खत

सेंद्रिय शेती पद्धतीने शेती करत असताना, पिकांची वाढ उत्तम व्हावी आणि जमिनीचा कस वाढावा म्हणून तुम्ही एक उत्तम खत बनवू शकता, तुम्ही एका लहान ड्रम मध्ये किंवा भांड्यामध्ये साधारण १५ किलो देशी गाईचे शेण घ्या, त्यामध्ये ३ किलो सेंद्रिय गूळ, साधारण ५ लिटर देशी गाईचे गोमुत्र, कडुनिंबाचा पाला आणि वडाच्या झाडाखालील थोडी माती हे सगळे चांगले मिक्स करून घ्या मिक्स करताना गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाका आणि हे मिश्रण झाकून ठेवा. साधारण १५ दिवस हे मिश्रण सावलीच्या ठिकाणी ठेवा आणि एक दिवसाआड हे मिश्रण एखाद्या काठीने ढवळा. १५ दिवसांनंतर हे मिश्रण तुमच्या पिकाला पाणी देताना पाण्यातून सोडा.

वरील प्रमाणे हे एक ऐकर क्षेत्राला पुरेसे आहे, आपल्याला जर अधिक क्षेत्रासाठी वापरायचे असेन तर आपण त्याप्रमाणात वाढ करावी. १५ दिवसांनंतर ज्यावेळी तुम्ही हे शेतात पाण्यातून सोडाल, तेंव्हा त्यामध्ये तुम्हाला काही कृमी तयार झालेले दिसतील. या कृमींमुळे तुमची शेती सुपीक होते आणि पीक देखील जोमात येते.

पर्यावरणीय तत्व

सेंद्रीय पद्धतीने शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबुन आणि अनुरूप् हवी. ती जीवसृष्टीला धरून असावी. परिणामी कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही आणि पर्यावरणाचा देखील ऱ्हास होणार नाही.

सिक्किमची सेंद्रीय शेतीतील उत्तुंग भरारी – सेंद्रिय शेती कशी करावी याचे उत्तम उदाहरण

निसर्ग पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत जगभर आरडाओरडा सुरू असताना, या विषयावर अचूक वेध घेत सिक्कीम सारख्या एका छोट्याश्या राज्याने संपुर्ण राज्यात केवळ सेंद्रिय शेतीची, क्रांतिकारी पाऊले टाकली आहेत. १००% सेंद्रिय शेती करणारे सिक्कीम हे देशातील पहिले राज्य आहे. कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खते, औषधे, कीटकनाशकांच्या वापरावर निर्बंध, पारंपारिक शेती पद्धती, बाह्य घटकांचा कमीत कमी वापर ही या सेंद्रीय शेतीची वैशिष्ट्ये आहेत. “नेचर कल्चर अँड अडव्हेंचर” हे ब्रीद घेऊन उभी असणाऱ्या अर्थव्यवस्थेने सेंद्रीय शेतीसाठी अनेक नियम घातले. सिक्किम मध्ये सेंद्रीय शेती चे हे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले गेले जसे की जनजागृती आणि सेंद्रिय शेती संबंधित कृती कार्यक्रम आणि यांसर्वांची व्यवस्थित अंमलबाजवणी.

सारांश – सेंद्रिय शेती प्रकल्प महत्व

सेंद्रीय शेती ही एक जीवनपद्धती आहे.केवळ पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही एक संकल्पना नाही.जसा आहार तसा विचार असतो.सात्विक आहारामुळे मानवाचा कौटुंबिक,शारीरिक,मानसिक,नैतिक विकास होतो.यामुळे आजच्या आधुनिक व स्पर्धात्मक युगात सेंद्रिय शेतीचे महत्व वाढले आहे.याशिवाय जागतिक तापमान वाढ.पर्यावरण प्रदूषण व अन्न सुरक्षा यांसारख्या प्रश्नावर सेंद्रीय शेती हाच उपाय आहे.

सेंद्रिय शेती कशी करावी ?

शेती करतांना कोणत्याही रासायनिक खते अथवा रसायनांचा वापर न करता आपल्या शेती भोवतालचा पाचापाचोळा, कापणी झाल्यानंतर उरलेले शेतातील पिंकाचे अवशेष, कोंबड खत, गोमुत्र इत्यादी नैसर्गिक साधनांचा वापर करून केल्या जाणा-या शेतीला सेंद्रीय शेती असे म्हणतात. सेंद्रीय पद्धतीने शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबुन आणि अनुरूप् हवी.

  • नैसर्गिक संतुलन कायम राहण्यासाठी किटकनाशके, रसायने, इत्यादींचा उपयोग न करता निर्सगाशी निगडीत वस्तुंचा अथवा घटकांचा वापर करुन सेंद्रीय शेती करावी.
  • आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

    यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

    Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

    Scroll to Top