डावा डोळा फडफडणे – कारणे व उपाय | डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

डावा डोळा फडफडणे – कारणे व उपाय / डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ (dava dola fadfadne information in marathi) >> अनेकदा आपला डोळा फडफडतो, आणि आपण बेचैन होऊन जातो. डोळा फडफडणे या बाबतीत अनेक समाज गैरसमज देखील समाजात आहेत, तसेच बर्‍याच गमती जमती या डोळा फडफडण्यावर तुमच्या आयुष्यात घडल्या देखील असतील. हल्लीच्या मुलांना कदाचित या बाबतीतले फारसे काही माहीत नसेल. डोळा फडफडणे मग त्यात परत डावा का उजवा त्यावर काही गोष्टी पूर्वीपासून आपल्या समाजात दृढ झाल्या आहेत.

आज आपण या लेखामध्ये डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ आणि त्याच बरोबर खरोखर डावा डोळा फडफडण्याची कारणे आणि उपाय आपण बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात डावा डोळा फडफडणे विषयी ची सर्व माहिती विस्तृत स्वरुपात.

डावा डोळा फडफडणे कारणे व उपाय | डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ (dava dola fadfadne karane ani upay / shubh ki ashubh)- संपुर्ण माहिती

सुरवातीला डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ या बद्दल ची माहिती आपण बघूयात आणि त्या नंतर डोळा फडफडणे कारणे आणि उपाय जाणून घेऊयात.

डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ (dava dola fadfadne shubh ki ashubh)

डाव्या बाजूचा डोळा फडफडणे यावर अनेक जणांचे वेगवेगळे समज आहेत. कुणाला वाटते डावा डोळा फडफडला तर कसला तरी शकुन होणार आहे. म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट होणार आहे. तर काही जणांचा असा समज आहे की डाव्या बाजूचा डोळा फडफडला तर काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे. असे विविध लोकांचे काही ना काही समज असतात. त्यामुळे काहींच्या नजरेत हा डोळा फडफडायला लागल्यास शुभ तर काहींना हे अशुभ वाटते.

काही लोकांचा असा समज आहे की, पुरुषांचा डावा डोळा जर फडफडत असेल, तर पुरूषांना भविष्य काळात खुप मोठया संकटाना तोंड ध्यावे लागते किंवा विनाकारण एखादया व्यक्तीशी दुश्मनी चालु होते म्हणजेच पुरुषांच्या चालू घडामोडींना ग्रहण लागते. आणि याच्या उलट स्त्रियांचा डावा डोळा जर फडफडत असेल, तर त्याचा स्त्रियांना खुप फायदा होतो, कोणता ना कोणता लाभ नक्की मिळतो.म्हणजेच डावा डोळा फडफडणे हे पुरुषांसाठी अशुभ तर स्रियांसाठी शुभ मानले जाते.

काही लोकांचा असा सुध्दा समज आहे की, जर कुणी आपली आठवण काढत असेल तरी देखील डावा डोळा फडफडतो. आता प्रत्येकाच्या स्वतःच्या विचारांवर हे मानणे की न मानणे अवलंबुन आहे. या सर्व गोष्टींवर तुम्ही किती आणि केव्हढा विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे.

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

जुन्या काळातील लोक सांगायचे की डावा डोळा फडफडत असेल तर, त्या डोळ्यावरून सोन्याची अंगठी फिरवावी. आणि काही जण असेही सांगतात की, विवाहित स्त्रिया आपल्या गळयातील मंगळसुत्राच्या सोन्याच्या वाटया सुध्दा फडफडत्या डोळयावर फिरवु शकतात. आता तुम्हाला जर अशा गोष्टींवर विश्वास असेल तर, असे करून बघण्यास काहीच हरकत नाही.

डोळा फडफडण्याची विविध कारणे व उपाय ( dava dola fadfadne vividh karane ani upay)

डोळा फडफडणे हा प्रकार काही गंभीर नसतो काही वेळा शरीरातले इतर स्नायु नियंत्रणाबाहेर गेल्यावर डोळा फडफडतो. पण काही काळाने डोळा आपोआप व्यवस्थित होतो. तर आपण याच डावा डोळा फडफडण्याची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.

१) कामाचा जास्त ताण आला किंवा सतत लॅपटॉप किंवा कम्प्युटर वर काम करून डोळयांवर सुध्दा जास्त ताण येतो आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून देखील डावा डोळा फडफडतो.

डावा डोळा फडफडणे कारणे व उपाय | डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ (dava dola fadfadne karane ani upay / shubh ki ashubh)- संपुर्ण माहिती
कामाचा स्ट्रेस – डावा डोळा फडफडणे कारणे व उपाय (dava dola fadfadne karane ani upay)

२) रात्रीची झोप जर पुरेशी नाही झाली, तरी देखील डोळयांना त्रास होतो आणि मग डोळा फडफडायला लागतो.

३) डोळा फडफडण्याचे शास्त्रीय कारण असे आहे की, अपचनामुळे किंवा वातुळ पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला जे अपचन होते आणि मग गॅसेसचा प्रॉब्लेम निर्माण होतो. हे सगळे वातामुळे होते आणि त्यामुळे डावा डोळा देखील फडफडतो.

४) याशिवाय शरीरात कॅल्शिअम कमी पडले तरी डोळा फडफडतो. अशावेळी कॅल्शिअमची किंवा व्हिटॅमिनची गोळी घेतल्यास डोळा फडफडणे थांबु शकते, पण डॉक्टारांच्या सल्ल्यानेच गोळया घ्याव्यात मनाने घेऊ नये. जर सारखा सारखा डोळा फडफडत असेल तर या उपायाने नक्कीच कमी होतो.

५) आजकाल प्रत्येकालाच टेन्शन असते आणि त्यामुळे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली वावरत असतो, आणि त्यामुळे हया तणावामुळे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल म्हणजे आपले शरीर वेगवेगळया प्रतिक्रीया देते जसे की, अंग दुखणे, अंग जड होणे, पापण्या फडफडणे आणि आपण बघत आहोत ते डोळयांचे फडफडणे यांपैकीच एक आहे. जे की ताणतणावामुळे देखील उद्भवते.

डावा डोळा फडफडणे कारणे व उपाय | डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ (dava dola fadfadne karane ani upay / shubh ki ashubh)- संपुर्ण माहिती
कॉनटॅक्ट लेन्स -डावा डोळा फडफडण्याची कारणे व उपाय (dava dola fadfadne karane ani upay)

६) त्याचबरोबर अतिप्रमाणात मोबाईलचा वापर केला, कॉम्पुटर किंवा लॅपटॉपवर जास्त प्रमाणात काम केले किंवा गेम खेळत बसले तरी आपला डावा डोळा फडफडतो. एखादयावेळेस एकाच डोळयावर सुध्दा जास्त ताण पडतो आणि मग डोळा फडफडतो. आजकाल टिव्ही पाहताना डॉक्टर किंवा अॅक्टरेस जास्त प्रमाणात कॉनटॅक्ट लेन्सचा वापर करतात आणि याचा वापर केल्यानेसुध्दा एखादयावेळेस डोळा फडफडतो.

डावा डोळा फडफडणे कारणे व उपाय | डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ (dava dola fadfadne karane ani upay / shubh ki ashubh)- संपुर्ण माहिती
गेमिंग – डोळा फडफडण्याची कारणे आणि उपाय

७) दारूचे सेवन जास्त प्रमाणात केले तरी देखील डोळे फडफडतात. दारूमुळे शरीराला अनेक नुकसान तर होतातच, त्याचबरोबर हे डोळा फडफडणे सुद्धा होते. त्यामुळे मदयपान कमी केले पाहिजे. जर मदयपान बंदच केले तर डोळा फडफडण्याचा त्रास होणार नाही.

डावा डोळा फडफडणे कारणे व उपाय | डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ (dava dola fadfadne karane ani upay / shubh ki ashubh)- संपुर्ण माहिती
अति दारूचे सेवन – डावा डोळा फडफडणे कारणे आणि उपाय

८) जास्त प्रमाणात चहाचे, कॉफीचे किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन केले, तरी डोळा फडफडतो. त्याचबरोबर चॉकलेट कॅफिनचे सेवन देखील जास्त प्रमाणात केले तरी डोळा फडफडण्याचा त्रास निर्माण होतो. त्यामुळे हया सर्व पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

dava dola fadfadne karane ani upay / shubh ki ashubh
अति चहा/कॉफी/सॉफ्ट ड्रिंक्स – डावा डोळा फडफडण्याची कारणे व उपाय

९) ज्या लोकांना डोळयांच्या संबंधित अॅलर्जी असेल, डोळयामध्ये खाज होत असेल, डोळा सुजला असेल डोळयांत सतत पाणी येत असेन, तर अशा लोकांना देखील डोळा फडफडणे सारख्या समस्या उद्भवतात. जेव्हा आपण डोळे चोळतो तेव्हा डोळा कडकायला सुरूवात होते, डोळयांच्या बाबतीत कसलीही अॅलर्जी असेल तर डावा डोळा किंवा दोन्ही डोळे फडफडतात.

dava dola fadfadne karane ani upay / shubh ki ashubh
डोळ्यांच्या संबंधित अॅलर्गी – डावा डोळा फडफडणे कारणे व उपाय

१०) जर आहार सुध्दा व्यवस्थित नसेल किंवा आपल्या शरीराला मॅग्नेशियम सारखी योग्य ती पोषकतत्त्वे योग्य प्रमाणात नाही मिळाली, तरी डोळा फडफडण्याचा त्रास उद्भवतो.

११) आपल्या चष्म्याच्या नंबर जर वाढला असेल, आणि आपण त्यावर लवकर लक्ष नाही दिले, तर आपला डावा डोळा फडुफडु शकतो. त्यामुळे वेळच्यावेळी आपले डोळे चेक करावेत आणि चष्म्याचा नंबर सतत चेक करावा.

१२) काही वेळा डोळे घट्ट बंद करून ठेवल्यास देखील डोळे फडफडणे कमी होते.

१३) डोळा फडफडत असेल तर डोळयांवर हलक्या हाताने थंड पाणी मारावे, याने देखील डोळा फडफडणे थांबु शकते.

१४) डोळे फडफडण्याचे सुध्दा वेगवेगळे प्रकार आहेत, काहीवेळा जर जास्त प्रमाणात डोळा फडफडत असेल तर त्याला म्योकिमिया देखील म्हणतात. हा प्रकार तसा काही गंभीर नाहीये. पण तरीदेखील जास्त प्रमाणात त्रास होत असेन, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सारांश – डावा डोळा फडफडणे – कारणे व उपाय | शुभ की अशुभ

डावा डोळा फडफडणे हे शुभ की अशुभ या बाबत ची माहिती आपण वरील लेखाच्या सुरवातीला पहिली. त्याचबरोबर डोळा फडफडणे कारणे आणि उपाय कोणते आहेत या बाबत देखील माहिती बघितली तरी देखील तुम्हाला सतत डोळा फडफडणे चा त्रास जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top