गुगल पे कसे वापरावे | मोबाईल वरून पैसे पाठवण्यासाठी उत्तम पर्याय

गुगल पे कसे वापरावे | मोबाईल वरून पैसे पाठवण्यासाठी उत्तम पर्याय >> पुरातन काळापासून चालत आलेली जी व्यवहार पद्धती आहे, ती विनिमयच्या साहाय्याने केली जाते. पैशाचा शोध लागण्यापूर्वी लोक हे वस्तूची देवाण घेवाण करून विनिमय म्हणजेच व्यवहार करत असे. नंतर सोने किंवा चांदी याचा विनिमय म्हणुन वापर होऊ लागला. मग त्या मधुनच हळू हळू पैशाचा वापर सुरू झाला आणि पैसा हे चलन अस्तित्वात आले. तेव्हा पासून ते आज पर्यंत चलन म्हणून पैशाचा वापर होत आहे.

आजच्या काळामध्ये तर पैशासोबतच डिजिटल करन्सी चा वापर होत आहे. आधी आपल्याला एकमेकांना पैसे पाठवण्यासाठी बँकेत जावे लागे, आणि बँकेमधून कॉम्प्युटर वरून इंटरनेटच्या साह्याने पैसे पाठवले जात असे. ही पैसे पाठवण्याची नवीन पद्धत अस्तित्वात आली होती. परंतु आता स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये यापेक्षा पण सोपी पद्धत अस्तित्वात आहे ती म्हणजे UPI ने पैसे पाठवणे. UPI चा लॉंग फॉर्म Unified Payment Interface आहे. हे भारत सरकार ची ऑनलाईन पमेंट करण्यासाठी ची यंत्रणा आहे. हे UPI चालवण्यासाठी सरकार ने काही मोबाइल अँप कंपनीला परवानगी दिली आहे, त्यानुसार UPI काम करते. त्यामध्ये फोन पे ॲप, पेटीयम ॲप, गुगल-पे अशा प्रकारचे मोबाइल ॲप आहेत. त्यामधील गुगल पे हे गुगल कडून लॉन्च केलेले UPI वापरण्यासाठी चे मोबाईल ॲप आहे.

गुगल पे कसे वापरावे संपुर्ण माहिती विस्तृत स्वरुपात (google pay kase vaprave in marathi)
गुगल पे कसे वापरावे

आज आपण हेच गुगल पे कसे वापरावे या बद्दल पुर्ण माहिती बघणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात गुगल पे कसे वापरावे.

गुगल पे कसे वापरावे संपुर्ण माहिती विस्तृत स्वरुपात (google pay kase vaprave in marathi) / google pay information in marathi

गुगल पे ला “Google pay” असे नाव होते पण आता त्याचे नाव हे शॉर्ट करण्यात आले असून त्याला आता “Gpay” असे करण्यात आले आहे. सुरवातीला आपण “Gpay” इंस्टॉल करून त्याची setting कशी करायची हे जाणून घेणार आहोत. त्यानंतर हे “Gpay” अॅप्लिकेशन वापरुन विविध प्रकारे पैसे कसे पाठवायचे ते जाणून घेऊयात.अशा रीतीने आपण “गुगल पे कसे वापरावे” हे समजून घेणार आहोत.

गुगल पे कसे वापरावे (google pay kase vaprave in marathi)
गुगल पे कसे वापरावे

गुगल पे कसे वापरावे / गुगल पे कसे चालू करायचे – गुगल पे ॲप इंस्टॉलेशन आणि इतर सेटिंग

सर्वप्रथम गुगल च्या प्ले स्टोर वर Gpay सर्च करून ते गुगल पे डाउनलोड करा, आणि तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टॉल करा. आणि गुगल पे चालू करा. त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट त्याच्याशी लिंक करा. मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट लिंक केल्यावर तुमचे गुगल पे चालू होईल. गुगल पे चा वापर तुम्ही पैसे पाठवण्यासाठी, टीव्ही किंवा मोबाईल चा रीचार्ज करण्यासाठी, गॅस बूकिंग तसेच लाइट बिल भरणा यांसारख्या गोष्टी करण्यासाठी करू शकता. वापरण्यास अगदी सोपे असे हे गुगल पे अॅप्लिकेशन असून, याचा वापर करण्यासाठी तुम्हाला काही पैसे ध्यावे लागत नाहीत अगदी फ्री मध्ये आणि काही क्लिक वर तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता.

google pay kase vaprave in marathi
how to use google pay in marathi

गुगल पे च्या सर्व सुविधा आणि त्यांचा सुलभ वापर

पैसे पाठवणे

गुगल पे मध्ये पैसे सेंड करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आहेत, त्यामध्ये तुम्ही मोबाईल नंबर वर पैसे पाठवू शकता, बँक खात्यात पैसे टाकू शकता किंवा QR कोड द्वारे पैसे पाठवू शकता. त्याची विस्तृत माहिती खालील प्रमाणे:-

गुगल पे ओपन केल्यानंतर तुम्हाला स्वतःच्या मोबाइलचा स्क्रीन लॉक चा पॅटर्न किंवा फिंगर सेन्सॉर असल्यास तो टाकून हे अॅप्लिकेशन चालू करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील त्यातील तुम्हाला न्यू पेमेंट हा ऑप्शन निवडावा लागेल. हा पेमेंट चा ऑप्शन निवडल्या नंतर तुम्हाला वरती दोन ऑप्शन दिसतील, पिपल आणि बिझनेस त्यामधील तुम्हाला पीपल हे ऑप्शन निवडायचे आहे. (बिझनेस ऑप्शन बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी किंवा तुम्ही जर कोणत्या बिजनेस ल पैसे पाठवत असाल तर वापरायचा आहे.)

पुढे तुम्हाला रिचार्ज आणि पे बिल्स पहिला ऑप्शन मिळेल त्यामधून तुम्ही रिचार्ज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारचे बिल भरू शकता,जसे की गॅस कनेक्शन, लाइट बिल इ.

याच्या खाली ऑप्शन असेल मनी ट्रान्सफर आणि यामध्ये मनी ट्रान्सफर करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन असतील ते पुढील प्रमाणे:

  • Bank transfer
  • Phone number
  • UPI ID or QR
  • Self transfer

या चार पद्धतीनुसार तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता या पद्धती खाली आपण विस्तृत स्वरुपात पाहूयात,

1) Bank transfer

बँक अकाउंट मध्ये पैसे टाकताना तुम्हाला चार ऑप्शन चा फॉर्म येईल त्यामध्ये पहिल्या रकाण्यात अकाउंट नंबर भरावा लागेल, दुसर्‍या ऑप्शन मध्ये अकाउंट नंबर पुन्हा भरावा लागेल, तिसर्‍या ऑप्शनमध्ये बँकेचा आयएफसी कोड टाकावा लागेल आणि शेवटी चौथ्या ऑप्शन म्हणजे ज्याच्या नावाने पैसे पाठवत आहे त्याचे नाव म्हणजेच Recipient name. ती पूर्ण माहिती भरून तुम्ही त्या खात्यामध्ये कंटिन्यू करून पैसे ट्रान्सफर करू शकता.

2) Phone number

हे ऑप्शन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर टाकायचा आहे. पण त्यामध्ये ज्याचा नंबर टाकत आहोत त्याचे पण गुगल पे अकाउंट चालू पाहिजे आणि त्याच नंबर सोबत चालू पाहिजे तर पुढे तुम्ही तो नंबर टाकून त्यावर ती पैसे पाठवू शकता.

3) UPI ID or QR code

या ऑप्शन मध्ये तुम्हाला पुढे दोन ऑप्शन येतील एक म्हणजे “यूपीआय आयडी” नुसार आणि दूसरा “क्यू आर कोड” नुसार यूपीआय आयडी या ऑप्शन द्वारे फोन नंबर सारखे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा यूपीआय आयडी टाकून तुम्ही पैसे पाठवू शकता.

यूपीआय आयडी चा खालचा ऑप्शन “ओपन कोड स्कॅनर” (Open code scanner) असा येतो, त्यामधून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. क्यू आर कोड स्कॅन करणे हा सगळ्यात सोपा पेमेंट पाठवण्याचा मार्ग आहे. जेव्हा तुम्ही समोरासमोर असाल तेव्हा हा व्यवहार करायला खूप सोपे आहे, किंवा एखाद्या दुकानात तुम्ही काही वस्तु खरेदी करायला गेलात आणि तिथे क्यूआर कोड लावलेला असेल,तर तुम्ही तो क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता किंवा क्यू आर कोड च्या फोटो वरून पण तुम्ही स्कॅन करून कोणालाही पेमेंट करू शकता.

4) Self transfer

जेव्हा तुमचे स्वतःचे दोन बँक अकाऊंट असतील तेव्हा तुम्ही ह्या ऑप्शन चा वापर चांगल्या प्रकारे करू शकतात जर तुमच्या स्वतःच्या एका खात्यातून तुम्हाला दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे असतील. तर तुम्ही या ऑप्शन चा वापर करू शकता त्यामध्ये तुमचे दोन्ही पण खाते सेव्ह केलेली असतील तर तुम्ही अगदी एक ते दोन क्लिक द्वारे पैसे एका खात्यातून दुसर्‍या खात्या मध्ये पाठवू शकता.

मोबाइल रिचार्ज करणे

Gpay चा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाइल चा रिचार्ज घरबसल्या करू शकता. या साठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.

विविध प्रकारचे बिल भरणे

गूगल पे वर तुम्ही लाइट बिल, गॅस चे पेमेंट,टीव्ही डीटीएच बिल देखील भरू शकता.

सारांश – गूगल पे कसे वापरावे

गुगल पे वापरताना सगळ्यात महत्त्वाची घ्यावयाची काळजी म्हणजे तुम्ही वरीलपैकी कोणत्याही ऑप्शन ने पैसे सेंड करत असाल तर तुम्हाला शेवटचा ऑप्शन म्हणजे एक “यु पी आय पिन” टाकावा लागेल. तो तुम्ही तुमचा सिक्रेट कोड म्हणून ठेवावा, या कोड शिवाय कोणी तुमच्या Gpay मधून पैशाचा कोणताही व्यवहार नाही करू शकत.गुगल पे पहिल्यांदा चालू केल्यावर तुम्हाला हा “UPI पिन” सेट करावा लागतो.

तुम्हाला गुगल पे अॅप्लिकेशन डाऊनलोड करून इंस्टॉल करायचे असल्यास खालील “Gpay Download” या बटन वर क्लिक करा.

तुम्ही गुगल पे किंवा ईतर कोणत्याही UPI द्वारे सुरक्षित व्यवहार करू शकता. फक्त ते ॲप तुम्ही जरा काळजीपूर्वक वापरायला हवे कारण त्यामधील काही क्लिक वर तुमच्या अकाऊंट मधील सर्व पैसे ट्रान्सफर होऊ शकतात.

Google Pay मध्ये शिल्लक बॅलेन्स कसे तपासायचे?

गूगल पे ॲप तुमच्या मोबाइल मध्ये open केल्यावर त्यामध्ये स्क्रोल करून खाली या, तिथे तुम्हाला एकूण 3 पर्याय दिसतील. १) Show transaction history २) View account balance ३) Regular Payments. या मधील २ नंबर च्या पर्याया वर क्लिक केल्यावर तुम्ही जे जे बँक अकाऊंट गूगल पे वर लिंक केलेले आहेत ते दिसतील. आता तुम्हाला ज्या बँक खात्याचा बॅलेन्स बघायचा आहे त्या वर क्लिक करा आणि तुम्ही सेट केलेला ६ अंकी UPI PIN टाका तुम्हाला तुमच्या खात्यातील शिल्लक बॅलेन्स दिसेल.

आपल्याला गुगल पे कसे वापरावे ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top