गणपती स्थापना कशी करावी - प्राणप्रतिष्ठापणा, पुजा, विधी व गणपती डेकोरेशन घरगुती (ganpati sthapana kashi karavi in marathi)
सण उत्सव शुभेच्छा

गणपती स्थापना कशी करावी / घरगुती गणपती स्थापना – संपुर्ण माहिती

गणपती स्थापना कशी करावी / घरगुती गणपती डेकोरेशन (ganpati sthapana kashi karavi in marathi) >> गणपती उत्सव संपुर्ण महाराष्ट्र व भारत देशासह संपुर्ण जग भरात साजरा केला जातो. अनेक मंडळे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात परंतु त्याच बरोबरीने जवळ जवळ प्रत्येक घरोघरी देखील गणेश उत्सव साजरा केला जातो. अशा सर्व घरगुती गणपती असणार्‍या लोकांसाठी व काही नवीन लहान मंडळांसाठी गणपती स्थापना काशी करावी याची माहिती आम्ही या लेखामध्ये देणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊयात गणपती स्थापना कशी करावी, गणेशाची स्थापना करण्यासाठी आवश्यक साहित्य व गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा किंवा पुजा कशी करावी.

गणपती स्थापना कशी करावी – प्राणप्रतिष्ठापणा, पुजा, विधी व गणपती डेकोरेशन घरगुती (ganpati sthapana kashi karavi in marathi)

घरामध्ये जिथे आपण गणपती बसवणार आहोत तिथे पहिला डेकोरेशन करून घ्यायचे आहे. गणपती बसवताना आपण पुर्वेला किंवा उत्तरेला बसवावा किंवा ईशान्य कोप-यात असावा तिथे आपण पाटावर लाल वस्त्र घालुन त्यावर अक्षदा टाकाव्यात मंडप सजवुन ठेवायचा आहे. आपले लायटिंग वगैरे सगळं करून पुर्ण डेकोरेशन करून झाल्यावर मगच गणपती आणायचा आहे.

गणपती स्थापना कशी करावी - प्राणप्रतिष्ठापणा, पुजा, विधी व गणपती डेकोरेशन घरगुती (ganpati sthapana kashi karavi in marathi)
गणपती स्थापना कशी करावी

लेखाच्या सुरवातीला आपण गणपती बाप्पाची पुजा अथवा विधी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात नंतर गणपती प्राणप्रतिष्ठापणा व बाप्पाची पुजा कशी करायची ते बघूया.

गणपती स्थापना पुजा अथवा विधी करण्यासाठी लागणारे साहीत्य

            प्रथम गणपतीची मुर्ती घेउन यायची आहे. त्यानंतर कापुर, श्रीफळ, फुले, हार, दुर्वा , अगरबत्ती, धुप, उद, अत्तर, जान्हवे, वस्त्र , पाच पाने, सुपारी 2 , खव्याचे मोदक किंवा आपण घरी करतो ते मोदक चालतील. वस्त्र, पाच फळे, चदंन, हळद, कुंकू, शेंदुर, गुलाल, बुका, गरम पाणी, अक्षदा, पंचामृत आणि पाच झाडांचया पत्री, घरातील लागणारे साहीत्य जसे की तांब्या, ताम्हण, पळी, समई,निरंजन, आरतीचे ताट, तुपाचे निंरजन दोन देवासाठी चैरंग किंवा पाट इ.

गणपती ची प्राणप्रतिष्ठापणा, विधीवत पुजा कशी करावी

१) सर्वात प्रथम जो व्यक्ती पुजा करणार आहे त्यांनी पांढरे वस्त्रे, किंवा सौळे घालायचे आहे. प्रथम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावे  नंतर समई लावून घ्यावी प्रथम आचमन करा भांडयात पाणी घ्यावे भांडयातील पळीभर पाणी हातात घेउन आवाज न करता प्यावे.

ॐ केशवाय नमः ॐ नारायणय नमः ॐ माधवाय नमः आणि पुढील नावाच्यावेळी हातात पाणी घेउन ताम्हणात सोडा ॐ गोविंदाय नमः आता परत आणखी एकदा वरील प्रमाणेच आचमन करा. आता हातात अक्षदा घेऊन दोन्ही हात जोडून गणपती पुजनाचा संकल्प करा

श्री मन्महागणाधिपते नमः। श्री गुयभ्यो नमः।

सरस्वतै नमः। वेदाय नमः। वेदपुरूषाय नमः। इश्वरदेवभ्येनमः । कुलदेवताभ्या नमः । स्थानदेवाताभ्या नमः। वास्तुदेवताभ्या नमः। आणि हातातील अक्षता उजव्या हातावर घेउन त्यावर पाणी घालुन अक्षतासह पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ।

निर्विघ्नं कुरूं मे दैव सर्व कार्येषु सर्वेदा।।

गणपती स्थापना कशी करावी - प्राणप्रतिष्ठापणा, पुजा, विधी व गणपती डेकोरेशन घरगुती (ganpati sthapana kashi karavi in marathi)
गणपती स्थापना कशी करावी

२) आता कलशपुजा करावी. कलश म्हणजे पुजेसाठी घेतलेल्या तांब्याला गंध लावुन त्यावर अक्षता आणि फुल वाहावीत. कलश पूजन झाल्यानंतर घंटेची पुजा करावी. पुजेतील घंटेला गंध लावून त्यावर अक्षत आणि फुल वाहावीत या नंतर पुजा केलेल्या तांब्यातील पाणी फुलाने घेउन ते सर्व पुजेच्या साहित्यावर आणि आपल्यावर शिंपडुन घ्यावे. आणि आपण घरातील सर्वांनी श्री गणपतीचे पुजन करा हात जोडून श्रीगणपतीचे ध्यान करा

एकदंत शुर्पकर्ण गजवक्त्रं चतुर्भुजम्।

पायांकुशधरं देवं घ्यायेत सिध्दिविनायकम।। श्री महागणपतये नमः  घ्यायामी

वरील पंक्ती म्हणून झाल्यानंतर मुर्तिच्या छातीला हात लावून नंतर मुर्तीवर अक्षदा वाहाव्यात आणि हात जोडा. श्री महागणपतये नमः अवाहयामी पुजा करताना सर्वांनी शांत राहून पाया पडायचे आहे. शांती भव, सुप्रसन्न भवो, अभिमुखो भव, सुप्रतिष्ठितो भव नंतर श्री गणपतीच्या उजव्या बाजुला आसनावर अक्षदा वाहा व पळीमध्ये तांब्यातील पाणी घेउन त्यात गंध, अक्षता, घालुन ते फुलाने किंवा दुर्वानी श्रीगणपतीवर शिंपडावे.

३) आता श्रीगणपतीला पंचामृत स्थान घालायचे आहे. आपण दुध,दही, तुप, मध आणि साखर घालुन पंचामृत तयार केलेले असेल ते थेाडे पळीमध्ये घ्या व मूर्तीवर शिपंडा नंतर परत पळीमध्ये गंध आणि पाणी घेउन ते फुलाने किंवा दुर्वांनी श्रीगणपतीवर शिंपडावे. त्यानंतर पळीमध्ये शुध्द पाणी घेउन ते फुलाने किंवा दुर्वानी श्रीगणपतीवर शिंपडावे आता श्रीगणपतीला कापसाचे वस़्त्र घालावे. आणि गणपतीच्या उजव्या हातातुन जान्हवे घालुन ते डोक्यावरून घालावे आता श्रीगणपतीला प्रथम गंध किंवा चंदन लावावे नंतर हळदी कुंकू लावावे. नंतर मूर्तीला सुंगधित अत्तर लावावे आता श्रीगणपतीला दुर्वा वाहायच्या आणि गणपतीला अलंकार म्हणून अक्षदा घातल्यावर गणपतीला नाना प्रकारची फुले आणि पत्री वाहावीत.

४) त्यानंतर गणपतीला धुप किंवा सुवासिक उदबत्त्यांनी ओवाळुन नंतर तुपाच्या दिव्याने ओवाळावे आणि नैवेद्य दाखवावा. श्री गणपतीला गुळ खोब-याचा, मोदकांचा अथवा लाडु, पेठे इ. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. हातात 2 तुळशीपत्र आणि पाणी घेउन नैवेद्यच्या भोवती 2 वेळा गोल फिरवावे यानंतर 4 वेळा ताम्हणात पाणी सोडतांना उरलेल 3 तुळशीपत्र ताम्हणात पाण्याबरोबर सोडुन द्यावे.

५) गणपती बाप्पाला चंदन लावा. आणि 2 विडयांची पाने घेउन त्यावर 1 सुपारी, 1 नाणे व 1 फुल ठेवुन तो विडा आणि 3 नारळ घेउन श्रीगणपतीच्या उजव्या बाजुला ठेवा आणि त्या विडयावर आणि नारळावर उजव्या हाताने पाणी सोडा. गणपतीला तुपाच्या दिव्याने ओवाळावे आता कापुर लावावा आणि आपल्या उजव्या बाजुला वळून स्वताःभोवती एक प्रदक्षिणा घाला. देवासमोर एक साष्टांग नमस्कार घाला. आता फुलांना गंध लावुन घेउन ती देवाच्या पायावर वाहावीत. शेवटी तुळशीपत्र आणि अक्षता वाहा आता देवासमोर हात जेाडून नमस्कार करा. आणि देवासमोर हात जोडून उभे राहा.

आवाहन नजानामि न जानामि तवार्चनम।

पुजां चैव नजानामि क्षक्यता परमेश्वर।।

मत्रहिनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर।

यत्पुजित मया देव परिपुर्ण तदस्तु मे।।

अन्यथा शरण नास्ति त्वमेव शरमं मम।

तस्मात्कारूव्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।

आपण पळीमध्ये पाणी घेउन हातातुन ताम्हणात सोडावे आणि हात जेाडुन गणपतीला नमस्कार करावा.

ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः

ॐ गोविंदाय नमः हात जोडुन गणपतीला नमस्कार करावा. अशा पध्दतीने गणपतीची स्थापना करावी.

वरील सर्व विधी पुर्ण झाल्यावर गणपतीची आरती करायची आहे आणि गणपती स्थापना पुर्ण होईल.

गणपती स्थापना कशी करावी - प्राणप्रतिष्ठापणा, पुजा, विधी व गणपती डेकोरेशन घरगुती (ganpati sthapana kashi karavi in marathi)

सारांश – गणपती स्थापना कशी करावी

वरील लेखामध्ये दिल्याप्रमाणे गणपती ची स्थापना करावी. तरी देखील काही ठिकाणी प्रदेशाप्रमाणे गणपती स्थापनेची पद्धत थोडीफार वेगवेगळी असू शकते. आपण मनोभावे गणपती बाप्पाला घरी आणून त्याची स्थापना केली की सर्व काही सिद्धीस लागते त्यात काही गोष्टी या अश्याच पाहिजेत असा अट्टाहास नसावा. शुद्ध मनाने आणि चांगल्या भावनेने केलेली गणपती स्थापना ही कधीही फलदायीच असते. सर्वांना गणपती बाप्पा च्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *