अभ्यासात मन कसे लावावे | अभ्यासात मन लागण्यासाठी काय उपाय करावे

अभ्यासात मन कसे लावावे |अभ्यासात मन लागण्यासाठी काय उपाय करावे | अभ्यासात एकाग्रता कशी वाढवावी >> बर्‍याच मुलांच्या बाबतीत पालकांना ह्या अडचणी येत असतात.किंवा काही मुलांना देखील अभ्यास करायची इच्छा असते, परंतु त्यांचा मनावर ताबा नसतो अशा मुलांच्या मनामध्ये अभ्यासाची ओढ निर्माण होणे गरजेचे असते.

मुलांचेच काय आपल्या प्रत्येकाचे असेच असते ना, आपल्याला ज्या गोष्टींची आवड असते,किंवा ज्या गोष्टींच्या मागे आपण काही उद्दीष्ट ठेवतो त्याच गोष्टी आपण आवडीने किंवा मन लाऊन करतो. तसेच अभ्यासाचे आहे अभ्यासात मन लागण्यासाठी मुलांना त्यात आवड निर्माण झाली पाहिजे. किंवा अभ्यास करून आपल्याला काय उद्दिष्ट गाठायचे आहे ते मुलांनी स्वतः ठरवले पाहिजे. पालकांनी कितीही उद्दिष्टे ठरवून उपयोग नाही,मुलांनी उद्दिष्टे ठरवली तरच मुले मन लावून अभ्यास करतात.

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला आपल्या मनावर ताबा मिळवता आला, तो जग जिंकायची ताकद ठेवू शकतो किंबहुना तो जिंकतो पण ज्याच्या वर मनाने ताबा मिळवला त्याला सर्व काही गमवावे लागते. त्यामुळे अभ्यासात मन कसे लावावे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा मिळवता आला पाहिजे.

अनेक विद्यार्थ्यांचे असे म्हणणे असते की, आमची इच्छा असते अभ्यास करण्याची पण, अभ्यासात मन लागत नाही आमचे, त्यामुळे आम्ही अभ्यास करत नाही. तर काही पालक प्रश्न विचारताना पाहायला मिळतात की आमच्या मूलांचे अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे ? अशाच सर्वांसाठी या लेखामध्ये आम्ही अभ्यासात मन लागण्यासाठी ६ उपाय देत आहोत. जे उपाय आपण केल्यास नक्कीच थोड्या बहुत प्रमाणात आपल्यात किंवा आपल्या मुलांमध्ये बदल दिसेल आणि ते मन लाऊन अभ्यास करतील.

अभ्यासात मन कसे लावावे – उपाय व उपायांची अंमलबजावणी | अभ्यासात मन लागण्यासाठी काही उपाय | (Abhyasat man kase lavave – upay)

अभ्यासात मन कसे लावावे (उपाय १) – प्रेरणा घ्या

जो पर्यंत तुम्ही तुमच्या मनाला काही तरी प्रेरणा देणार नाहीत, तो पर्यंत कुठलेही काम होणर नाही. जो पर्यंत तुम्ही व तुमचे मन दोघेही एकत्र येऊन एखादी गोष्ट ठरवून करणार नाही तो पर्यंत ती गोष्ट पूर्णच होणार नाही. असेच अभ्यासाचे आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यासात मन लागण्यासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून प्रेरणा घ्यावी लागेल.

प्रेरणा
प्रेरणा

जसे की एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एखाद्या शास्त्रज्ञा विषयी माहिती वाचा, जीवन चारित्र्य वाचा ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल. पालकांनी आपल्या मुलांना अशा काही अभ्यास करून मोठ्या झालेल्या लोकां विषयी माहिती द्यावी, प्रेरणादायी चित्रपट दाखवा,विडियो दाखवा. जेणेकरून मुले त्यातून प्रेरणा घेतील. माझा जन्म हा सरळ आणि साधे जीवन जगण्यासाठी झालेला नाही, मला आपल्याला आयुष्यात मोठे हयायचे आहे हे जो पर्यंत तुम्ही तुमच्या मनाला सांगणार नाही तो पर्यंत तुमचे अभ्यासात मन लागणार नाही.

अभ्यासात मन कसे लावावे (उपाय २) – अभ्यास का करावा याचे कारण शोधा

अभ्यासात मन कसे लावावे
ध्येय

प्रत्येकाची अभ्यास करण्यामागची वेगवेगळी कारणे असतात. जसे की तर काहींना सरकारी परीक्षा तर काहींना शालेय परीक्षा चांगल्या मार्कांनी उतीर्ण करायच्या असतात. अभ्यास हा प्रतेकाचा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, त्यामुळे ज्याने त्याने त्या त्या क्षेत्रातील आपले ध्येय काय आहे ते ठरवले पाहिजे. लक्षात असुद्या ध्येय वेडी माणसेच यशस्वी होतात.

अभ्यासात मन लागण्यासाठी (उपाय ३) – व्यायाम करा

अभ्यासात मन लागण्यासाठी काय करावे
व्यायाम

व्यायाम केल्याने आपले आरोग्य निरोगी राहते. जर तुमचे शरीर सदृढ असेल तर तुमचे मन देखील प्रसन्न राहते. नियमित व्यायाम केल्याने देखील तुम्हाला अभ्यासात मन लागण्यासाठी उपयोग होऊ शकतो. त्यामुळे अभ्यास करताना मनाची एकाग्रता हवी असेल तर दररोज व्यायाम करा.

अभ्यासात मन लागण्यासाठी (उपाय ४) – मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यान किंवा जप करा

अभ्यासात मन लागत नाही - ध्यान करा
ध्यान

माणसाचे मन खूप चंचल आहे, अभ्यासाला बसल्यावर टीव्ही बघावा वाटतो तर कधी बाहेर खेळायला किंवा फिरायला जावे वाटते. मनाच्या ह्या या असल्या अवस्थेवर तुम्हाला ताबा मिळवता आला पाहिजे, त्यासाठी तुम्ही ध्यान करून मन स्थिर करू शकता.रोज सकाळी व संध्याकाळी १० मिनिटे एखादा मंत्र जप केल्यास किंवा शांत डोळे मिटून बसून मनात कोणतेही विचार न आणता ध्यान केल्यास देखील तुम्हाला तुमच्या मनावर ताबा मिळवता येऊ शकतो.

अभ्यासात मन लागण्यासाठी (उपाय ५) – पुरेशी झोप घ्या

पुर्ण झोप
पुरेशी झोप

आपल्या शरीराला जशी आरामाची गरज असते तशीच तुमच्या मनाला देखील आरामाची आवश्यकता असते. पुरेशी झोप देखील तुम्हाला मन प्रसन्न ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अभ्यासाला बसल्यावर अभ्यासात मन लागते. रोज रात्री किमान ७-८ तास झोप झाली की तुमच्या शरीरा बरोबरच मनाला देखील प्रसन्न ठेवण्यास गरजेची आहे.

अभ्यासात मन लागण्यासाठी (उपाय ६) – अभ्यासाला बसण्याची जागा प्रेरणादायी व प्रसन्न ठेवा

तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता ती रूम किंवा तो टेबल नेहमी स्वच्छ असला पाहिजे. आपले शरीर जसे काम केल्यावर थकते तसे आपले मन हे घन जागा किंवा अस्थ व्यस्थ पडलेले समान बघून थकते त्यामुळे मन प्रसन्न व ठेवण्यासाठी तुमची अभ्यासाला बसण्याची जागा नीटनेटकी ठेवा.

अभ्यासाची जागा प्रसन्न ठेवा
अभ्यासाची जागा

अभ्यासात मन लागण्यासाठी तुमच्या अभ्यासाच्या जागेवर प्रेरणा देणार्‍या व्यक्तींचे फोटो किंवा काही प्रेरणा दायी सुविचार चिटकवा, इंटरनेट वर असे सुविचार भरपूर उपलब्ध आहेत. असे केल्याने जेंव्हा जेंव्हा तुमचे मन तुमच्या ध्येय पासून भटकेल हे लावलेले सुविचार व फोटो तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण करून देतील.

तात्पर्य

अभ्यासात मन कसे लावावे त्यासाठी ६ उपाय दिलेले आहेत हे ६ उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या मनाच्या चंचल अवस्थेवर ताबा मिळवता येईल व तुम्ही अभ्यासच नाही तर कोणतेही काम एकाग्रतेने करू शकता. त्यामुळे तुम्हाला अभ्यासात मन लागण्यासाठी हे उपाय नक्कीच फायदेशीर ठरतील.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “अभ्यासात मन कसे लावावे | अभ्यासात मन लागण्यासाठी काय उपाय करावे”

  1. Wow! At last I got a web site from where I know how to actually get
    valuable data concerning my study and knowledge.

Comments are closed.

Scroll to Top