मामु चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय?

Reselling Wahtsapp marketing software and CRM

मामु चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय? >> महाराष्ट्रा सह देशात भाजप चे सरकार 2014 साली आले त्यावेळी भाजपने म्हणजेच त्यांच्या IT सेल ने काँग्रेस आणि इतर पक्ष्याचा अनेक नेत्यांना कश्या पद्धतीने ट्रोल केले होते हे आपल्याला सांगायची गरज नाही आपण सर्व जण हे जाणता.

आता भाजपचे हे डिजिटल मार्केटिंग चे तंत्र भाजपच्याच अंगाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. संपुर्ण देशात जरी मोदींना आणि त्यांच्या IT सेल ला सर्व आलबेल चाललेलं दिसत असले, तरी महाराष्ट्रात मात्र ६ महिन्या पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकी नंतरच्या शरद पवार यांच्या पॉवरफुल खेळी मुळे भाजपच्या माजी मुख्यमंत्री (मामु) फडणवीस आणि त्यांच्या टीम ला भयंकर ट्रोलिंग ला सामोरे जावे लागत आहे.

आता कोरोना विषाणू मुळे सर्वत्र लॉकडाउन आहे, याच दरम्यान महाराष्ट्र भाजप नेत्यांच्या अनाकलनीय कृत्यांमुळे,आणि विधानांमुळे मामु आणि त्यांचे सहकारी नेटिझन च्या ट्रोल चा शिकार होताना दिसत आहेत.

त्यातच भाजपचे मामु तर त्यांच्या गेलेल्या पदाच्या अविर्भावातून तून बाहेर आलेले दिसत नाहीयेत,आणि त्याच आवेशात ते सारखे राज्यपालांच्या भेटीला जात आहेत.

ते सारखे सारखे राज्यपालांच्या कडे का जात होते हे न कळण्या इतके नेटिझन दुधखुळे नाहीयेत त्यामुळेच ते ट्रोल होत आहेत.

दरम्यान IFSC सेंटर गुजरातला हलवण्याचा निर्णयाचे समर्थन करून मामु आणि टीम ने नेटिझन चा रोष अजूनच ओढवून घेतला आहे.

मामु – सहकारी आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

नेटीझन च्या ट्रोलिंगची दखल घेत काल मामु च्या विश्वासू आशिष शेलारांनी ट्विट करून त्यांच्या वर हसणाऱ्यां ला उद्देशून वेगळ्याच भाषेत उत्तर दिले ते म्हणाले “आपण हसायचं दुसऱ्याला आणि शेंबुड आपल्या नाकाला”.

अश्लील टीका करणारे कोण?

पूर्वी मामु आणि त्यांची “लष्करे …..” ह्या पत्रकारांच्या टीम ने नको त्या भाषेत आणि फोटोस मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना ट्रोल केले होते.

“आघाडी बिघडी” “देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र” ह्या सारख्या फेसबुक चे पेजेस चा जाहिरातींचा खर्च कोण करत होते?आणि हे पेजेस कसल्या पोस्ट टाकत होते ते सांगायची गरज नाही.

मामु - (aghadi bighadi फेसबूक पेज )
aghadi bighadi फेसबूक पेज

जयंत पाटील प्रतिक्रिया

भाजपच्या ह्या दुटप्पी धोरणावर बोलताना जयंत पाटील म्हणतात माघील ५ वर्ष्यात आमच्यावर सोशल मीडियात एका विशिष्ठ गटा कडून अत्यंत अश्लील भाषेत टीका होत होती, तेंव्हा आम्ही कारवाई ची मागणी केली परंतु त्यावेळी ह्यांनी कारवाई केली नाही.

आणि आता लोक ह्यांच्यावर नुसते हसत आहेत तर हे कारवाई ची मागणी करत आहेत.


आता मात्र ट्रोल करणाऱ्यांवर मामु आणि त्यांच्या टीम ने कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे ऐके काळी ट्रोल्लिंग ची किंग असलेली भाजपा आता मात्र घाबरलेली दिसत आहे. आणि कधी काळी टाकलेल्या स्वतःच्याच जाळ्यात स्वतः अडकत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या ५ वर्षात विरोधकां वर अश्लील भाषेत टीका करून त्यांना ट्रोल केले जात असताना, खोटे आरोप करून विरोधी नेत्यांना ट्रोल केले जात असताना तसेच IFSC च्या गुजरात मधल्या कार्यालयाची प्रोसिजर होत असताना गप्प बसून राहिलेले माजी मुख्यमंत्री आता मात्र कारवाई ची भाषा करत आहेत.

म्हणूनच म्हणावेसे वाटते “मा.मु. चा आता ट्रोलिंग वर भरोसा नाय काय?

टीप :-कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या  फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top