शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार

मागील पंधरा दिवसांपासून शरद पवारांनी जे राज्यात राजकारण पेटवले आहे ते पाहता ग्रामीण तरुण हा त्यांच्या बाजूने आलेला प्रखरतेने जाणवते आहे. शरद पवार हे तसे ग्रामीण भागातूनच आलेले नेतृत्व आहे, त्यामुळे ही गोष्ट सहाजिकच आहे असे म्हणावी लागेल.

परंतु सध्याची सोशल मिडिया वरची परिस्थिती पाहता शरद पवार यांच्या बाजूने अथवा त्यांच्या समर्थनार्थ जे काही पोस्ट फेसबुक,व्हाट्सअप इतर सोशल मीडिया वर येत आहेत त्या बहुतांश ग्रामीण भागातील तरुणांच्या आहेत आणि त्याला काउंटर करणारे काही तथाकथित 40 पैसेवाले किंवा स्वयंस्फूर्तीने पोस्ट करणारे शहर भागातील तरुण आहेत आणि आज ते शरद पवारांवर टीका करत आहेत.

शरद पवार

विशेष म्हणजे यातील बरेच लोक पूर्वी गाव सोडून शहरातील एमआयडीसीमध्ये नोकरीच्या निमित्ताने काम करणारे आहेत. परंतु गाव सोडून आल्यापासून एक दिवस आठवडा सुट्टीचा सोडला तर ते फारसे कधी गावाकडे जात देखील नाहीत किंबहुना त्यांना जावे लागत नाही. त्यांनी एकदा आपल्या गावातील एखाद्या माणसांला विचारावे शरद पवार काय आहेत आणि काय त्यांची कामे.

    गावागावात खऱ्या अर्थाने या पाच वर्षात शरद पवारांसारख्या शेतकरी नेत्याची कमी जाणवली कारण शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा आणि खऱ्या अर्थाने शेतीशी नाळ जोडलेला नेताच नव्हता सत्ताधाऱ्यांमध्ये आणि जे कोणी थोडी थोडकी जानकरी असणारे होते त्यांना सरकारनेच सत्तेपासून दूर ठेवले तर काही मंडळी सत्तेच्या हवेत जिरून गेली.

     महाराष्ट्राचा माघील इतिहास पाहता शरद पवारांनी खर्‍या अर्थाने शेतकरी समृद्ध केला होता.इतिहासात डोकावत असताना एक गोष्ट प्रकर्षाने आठवते शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले होते म्हणून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना हे शेतकरी पुत्र म्हणाले होते शेतकर्‍यांना पण त्यांच्या मालाला भाव मिळूद्या. एवढे स्पष्ट आणि परखड शेतकर्‍याच्या बाजूने भूमिका घेणारे मंत्री कदाचित ते एकटेच. आता मात्र सरकार कांदाचा भाव वाढला म्हणून लगेच पाकिस्तान आणि इतर देशातून कांदा आयात करते आहे. शरद पवारांना दुसर्‍या हरित क्रांतिचे जनक उगीच म्हणत नाहीत त्यांचे तेवढे काम आहे.

   असो आता आपल्या मूळ विषयाकडे येतो तो म्हणजे शहरी भागा साठी शरद पवारांचे योगदान तर तरुण मित्रांनो हे जाणून घ्या की तुम्ही शहरातील लोक जे शरद पवारांवर कसल्याही भाषेत टीका करताय ना जरा मागे वळून बघा तुमच्या च कुटुंबातील एखादा व्यक्ति तरी शरद पवारांनी केलेल्या कामाचा लाभार्थी असेल,मग कोणी पवारांनीच उभ्या केलेल्या एमआयडीसी मध्ये एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये काम करत असेल,किंवा आलिशान वाटणार्‍या एखाद्या IT पार्क मध्ये कामाला असेल. पण त्यांनी कधी लाभार्थी लोकांसमोर टीव्ही च्या किंवा इतर कोणत्या माध्यमातून उभे केले नाहीत.

शरद पवारांनी शहरामद्धे केलेली कामे आज ही जागतिक नकाश्यावर ठळक पणे दिसत आहेत, हीच त्यांची कामाची पावती आहे. तुम्हीच बघा ना पुण्या सारख्या शहरातील हिंजवडी आयटी पार्क ची संकल्पना देखील पवार साहेबांच्या विचारतील आहे याचं आयटी पार्क च्या जागे वर साखर कारखाना उभारणी साठी भूमिपूजन समारंभा मध्येच साहेबांनी स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध पत्करून आयटी पार्क ची घोषणा केली होती. त्याकाळात जो विरोध झाला त्याच्या उलट परिस्तिथी आज तिथे आहे. आज हिंजवडी आयटी पार्क मुळे फक्त महाराष्ट्रातील चं नव्हे तर देशातील लोकांना रोजगार मिळालेला आहे. आशियातील मोठी MIDC म्हणून नावारूपास आलेली पिंपरी चिंचवड एमआयडीसी साहेबांची चं देण आहे बर का आणि इथे आज जगभरातील Jaguar, Mercedez-Benz, Volkswagen, Tata, Mahindra अश्या नामांकित कंपन्या  आहेत. जिथे आपल्या महाराष्ट्रातील शहरातील व ग्रामीण भागातील तरुणां ना रोजगार उपलब्ध झालेला आहे. नवी मुंबई हे शहर वसवण्याचे काम हे पवार साहेबांच्या विचारातून च झालेले आहे. स्मार्ट सिटी च्या नुसत्या गप्पा मारणारे हे सरकार सत्तेत येण्या आधीच हे नवी मुंबई हे शहर स्मार्ट झालेले होते.

  देश्याच्या राजकरणात आघाडीवर असणार्‍या नेत्याला धूर्त असावेच लागते,आपले शिवाजी महाराज धूर्त नव्हते का? होतेच ना? मग पवार तर शिवरायांच्या विचारावरच चालणारे होते. आणि त्यांच्या ह्या धुर्त स्वभावा विषयीच गैरसमज पसरवण्यात विरोधक यशस्वी झाले. त्यांच्या प्रती गैरसमज पसरविण्यास खर्‍या अर्थाने सुरवात झाली ती 1995 च्या विधान सभा निवडणुकीच्या आधी. पवारांवर आरोप करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकार सत्तेवर आले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे नी तर शरद पवारांचे थेट दाऊदशीच संबंध आहेत आणि आम्हाला सत्ता ध्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे प्रचार सभांमध्ये जाहीर करून देखील प्रत्यक्ष्यात सत्ता आल्यावर ते काही करू शकले नाहीत. तसे आज पर्यंत अनेकांनी पवारांवर खोटे आरोप केले. शरद पवारांवर आरोप करून चर्चेत यायच हाच मूल हेतु त्या मागचा. किंबहुना काहींनी तर ट्रक भरून पुरावे असल्याचे देखील दावे केले परंतु सगळेच फोल ठरले. केवळ सत्ता काबिज करण्यासाठी कायम पवारांवर आरोप करण्याचे काम सर्वांनी केले परंतु सगळ्यांना पुरून उरला तो हा सह्याद्रीपुत्र.

    अगदी आताची निवडणूक देखील पवारांचे विरोधक हे खोट्या आरोपांच्या आधारावर लढण्याच्या तयारीत होते. ज्याप्रमाणे 2014 ची निवडणूक ही त्यांनी खोट्या आरोपांच्या आधारावरच लढवली,आणि सत्तेत आल्यावर मात्र काही कारवाई नाही केली, 5 वर्ष ह्यांची सत्ता असताना काही केले नाही आणि आता निवडणूक कार्यक्रम लागला की लगेच मोठ मोठे आकडे घालून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले. या आरोपांमध्ये काही तथ्य नाही हे पवारांनी ईडी सारख्या संस्थेला डायरेक्ट अंगावर घेऊन दाखवून देखील दिले. पवारांनी ज्या प्रकारे ईडी चे प्रकरण हाताळले ते पाहता विरोधकांनी ज्या ईडी च्या मुद्या वरुण पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच हा डाव उलटविण्यात पवारांना यश आले असेच म्हणावे लागेल. आज संपूर्ण देशात अनेक माजी मंत्री,आणि दिग्गज ज्या ईडी च्या चौकशीला घाबरून आहेत त्या ईडी च्या देखील हाताला हा बाळासाहेबांचा तेल लावलेला मित्र सापडला नाही.

    पवारांचा हा Larger then Life प्रवास तरुणांना नक्कीच उर्जादायी असा आहे. वर्तमानात आलेल्या संकटाशी लढायचे कसे हे पवार साहेबांकडून शिकावे. अश्या प्रसंगांना आव्हान देत असताना शरद पवार कदाचित असे म्हणत असतील तेरे हर एक वार पर मै पलटवार हूं ,युही ना कहलाता मै शरद पवार हूं.  

तुम्ही आमचा अजित दादांच्या वर लिहलेला हा लेख देखील वाचू शकता. “शेतकरी असाच असतो हळवा(अजित पवार एक शेतकरी )”

4 thoughts on “शहरी तरुणाला न समजलेले शरद पवार”

  1. Nice I read above comment then I understood sharad Pawar .sharad Pawar is very intelligent and clever man. So I proud of you

  2. आम्ही साहेबांच्या विचाराचे वारसदार

  3. खरच पवार लोकांना कळलेच नाहित, कोणी भावनिक मुद्यांवर कित्येक लोकांनी पक्ष उभे केले, कोणी वंश परंपरेने नेते झाले , कोणी जातीचे, कोणी धर्माचे, कोणी भाषेचे राजकारण केले पण पवारांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले, जेव्हा मुख्यमंत्रि तेव्हा संपुर्ण महाराट्राचा विचार आणि कृृृषिमंत्री असताना संपुर्ण देशाचा विचार, नाहितर आपआपल्या राज्याचा विचार करणारे अनेक नेते आपण पहात आलोय आणी पहात आहोत

Leave a Comment