देशात पुन्हा एकदा नवीन वाहतूक दंड आकारणी

“मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक 2019” 1 ऑगस्टला संसदेत मंजूर करण्यात आला. त्या कायद्या नुसार वाहतुकीचे  नियम मोडणार्‍यांवर कठोर दंड आकारणी करण्यात येईल,ही दंड आकारणी पूर्वीच्या दंड रक्कमेच्या जवळ पास 10 पट आसेल.

मागील महिन्यात गडकरी म्हणाले होते, वाहनचालक लायसेन्स बनविण्याची प्रक्रिया संगणकीकृत करण्यात येईल आणि मंत्री असो वा संसद सदस्य कोणालाही ऑनलाईन चाचण्या उत्तीर्ण झाल्याशिवाय  त्यांचा परवाना मिळणार नाही. आणि आता गडकरींच्या खात्याने वाहन कायदे अजून कठोर केले आहेत.  

कठोर दंड आकारल्या मुळे अपघात कमी होण्यास मदत होईल आणि यामुळे वाहनधारकां कडून वाहतुकीच्या नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले जाईल, असे दिल्लीचे परिवहन मंत्री गहलोत यांनी शनिवारी संगितले. “त्याचा रस्ता सुरक्षा सुधारण्यावरही मोठा परिणाम होईल” असे ते म्हणाले.

नवीन वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न घालणे, आणि मद्याधुंद अवस्थेत वाहन चालविणे यासारख्या सामान्य वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनांसाठी दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत.

कठोर दंडात्मक तरतुदी

traffic rule
  • सीटबेल्टशिवाय वाहन चालविल्यास आता 1000 रुपये दंडाची मागणी होऊ शकते, पूर्वी 100 दंड होता.  वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यावर रुपये 1,000-5,000  पूर्वी तो 1000 रुपये होता.
  • दारूच्या नशेत वाहन चालवण्याकरिता दंड रुपये 10,000 करण्यात आला आहे, जो पूर्वी 2000 ते 5000 होता.
  • रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलासारख्या आपत्कालीन वाहनांना मार्ग न दिल्यास आता 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.
  • नव्या कायद्यानुसार परवान्याशिवाय वाहन चालविण्यास 5,000 रुपये दंड आकरण्यात येईल जो पूर्वी 500 रुपये होता.
  • अपात्र असूनही वाहन चालविण्याकरिता दंडाची रक्कम पूर्वी 500 रुपये होती ती आता वाढवून तब्बल 10,000 रुपये करण्यात आली आहे.  
  • ओव्हरस्पीडिंग ला आता रू.1000 ते रु.2000 दंड आकारला जाईल. जो पूर्वी रु 400 होता आता लहान वाहनांसाठी रु 1000 असेल, आणि रु.2000 मध्यम प्रवासी वाहनांसाठी.
  • वाहन विमा असल्या शिवाय वाहन चालविण्यास 2000 रुपये दंड आकारला जाईल.
  •  हेल्मेटशिवाय वाहन चालविणा्यांना रू. 1,000 आणि त्यांचा परवाना तीन महिन्यां करता निलंबित केला जाऊ शकतो.
  • वाहन ओव्हरलोडिंग असेल तर रू.20,000 दंड आकारला जाईल.  
  • अल्पवयीन वाहनचालकांकडून कोणत्याही रस्त्यावर गुन्हा झाल्यास पालकांना दोषी ठरविले जाईल आणि दंड रू. 25,000  व तीन वर्ष तुरुंगवास आणि नोंदणी रद्द केली जाईल.
  • हिट अँड रन प्रकरणात मृत्यु पडलेल्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये तर जखमींना 2.50 लाख रुपये भरपाई तसेच तीन वर्ष कारावासाची शिक्षा असे नियम करण्यात आले आहे.

आपण आमचा “Driving License काढणे आता झाले खूप सोपे” हा लेख देखील तपासा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top