जस जशी विधानसभा 2019 निवडणूक जवळ येत आहे तसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. बीजेपी आणि शिवसेनेत इनकमिंग जोरात चालू आहे, तर कॉंग्रेस,राष्ट्रवादीची आमदार आणि मात्तबर नेत्यांची गळती काही केल्या थांबायला तयार नाहीये.
अश्या परिस्थितीत राजकीय नेते मंडळी पक्ष बदलाची लाख कारणे सांगत जरी असली तरी त्यांच्या कार्यकर्त्याला काय वाटते ह्याचा विचार कोणता नेता करतोय असे वाटत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना कोणता पुढारी लक्षात गेऊन निर्णय घेताना दिसत नाही.
काल अमित शहांच्या उपस्थितीत सोलापूर मध्ये बीजेपी चा मेगा भरतीचा कार्यक्रम पार पडला त्यात राष्ट्रवादीचे उस्मानाबाद चे पद्मसिंह पाटील व राणा जगजीत सिंह पाटील हे पिता पुत्र देखील सेफ झोन (बीजेपी) मध्ये गेले.
परंतु त्यांच्या जाण्याचा अर्थ उस्मानाबाद मध्ये जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो देखील बीजेपी शिवसेना युती कडे वळला असा होत नाही. कारण तिथे असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेने मधील विळ्या भोपाळ्याचे राजकारण हे प्रतेक गावात जैसे थे च आहे. आणि अश्या परिस्थितीत पाटील कुटुंबियांनी बीजेपी मध्ये जाऊन काय साधले हे त्यांनाच ठाऊक.
आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बैठकीत उस्मानाबाद कळंब मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक गाजली एका कट्टर कार्यकर्त्याने, पवार साहेबांप्रती असलेली त्यांची निष्ठा हा युवा कार्यकर्ता अतिशय तिखट शब्दात मांडत आहे.त्याच्या या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यां मध्ये एक ऊर्जा संचारली होती आणि त्यांनी देखील टाळ्या वाजवून त्याचे समर्थन केले. आता सोशल मीडिया वर हे भाषण viral होत आहे .
आमदार आणि नेते मंडळी पक्ष बदलत आहे परंतु पवार साहेब आणि साहेबांचे कार्यकर्ते यांची नाळ जुळलेली आहे हेच या कार्यकर्त्याच्या भाषणातून दिसते.
Viral Video
आपण आमचा ” Viral रानू मंडल नंतर ,महाराष्ट्रातील हा चिमुकला होईल मोठा गायक? “ हा लेख देखील तपासा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)