फडणवीस यांनी केला छत्रपती शाहू महाराज्यांचा अपमान,बघा काय म्हणाले.

शाहू महाराज अपमान प्रकरण>> आज ६ मे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा स्मृति दिवस,संपूर्ण महाराष्ट्र या सामाजिक क्रांतीच्या जनकाला अभिवादन करत असताना. आजच्याच दिवशी ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणविसांनी त्यांचा अपमान केला असल्याच्या प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडिया मध्ये चालू आहे.

घडलेली घटना अशी की देवेंद्र फडणवीस यांनी राजश्री शाहू महाराज्यांना अभिवादन करण्यासाठी ट्वीट केले परंतु त्या ट्वीट मध्ये त्यांनी शाहू महाराज्यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केल्या मुळे त्यावर नेटीझन नी एकच हाहाकार माजवला.लागलीच फडणवीसांनी ते ट्वीट डिलीट केले आणि नवीन ट्वीट केले. परंतु तो पर्यन्त बहुतांश लोकांनी ते आपल्या मोबाइल मध्ये जमा करून घेतलेले होते.

शाहू महाराज यांचा अपमान करणारे ट्वीट:-

शाहू महाराज यांचा अपमान करणारे फडणवीसांनी  केलेले ट्वीट
शाहू महाराज यांचा अपमान करणारे फडणवीसांनी केलेले ट्वीट

आता नव्याने केलेले फडणवीस यांचे ट्वीट:-

दरम्यान फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तरी देखील त्यांना माहिती नसावे का,छत्रपती राजश्री शाहू महाराज हे कोण होते?सामाजिक कार्यकर्ते होते का ?

त्यांनी आता ट्वीट जरी डिलीट केलेले असले तरी ते आता संपूर्ण महाराष्ट्र भरातून फडणविसांनी केलेल्या या कृतीवर आक्षेप व्यक्त केला जात आहे.नुसते ट्वीट डिलीट करून चालणार नाही तर फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे अशी भावना नेटीझन व्यक्त करत आहेत.

फडणविसांना कोल्हापूर प्रवेश बंदी :-

संभाजी ब्रिगेड ने तर एक पत्रक काढले असून त्यात म्हंटले आहे की, राजश्री शाहू महाराज्यांना “सामाजिक लोकशाहीचे स्तंभ” असे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अश्या शाहू महाराज्यांचा अपमान करणार्‍या फडणवीस यांचा समस्त कोल्हापूर करांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि जो पर्यन्त फडणवीस राजश्री शाहू महाराज्यांची आणि जनतेची माफी मागत नाहीत तो पर्यन्त त्यांना कोल्हापूर मध्ये प्रवेश बंदी करत आहोत. पत्रकात असे देखील म्हंटले आहे की राजश्री शाहू महाराज्यांच्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते असा कपटी दावा करणार्‍या फडणवीस यांची विरोधी पक्ष नेते पदावरून हकाल पट्टी करण्यात यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top