modi-gov-track-you?
आरोग्य

मोदी सरकार ट्रॅक करतय ? कोरोनाच्या भीतीचा फायदा घेऊन.

मोदी सरकार ट्रॅक करतय >> मोदी सरकार वर गेल्या अनेक दिवसांपासूनआरोप होत आहे की हे सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांच्या हालचालींवर पाळत ठेवत आहे. जगभरात हा मुद्दा प्रामुख्याने पुढे आला तो साधारण ५ वर्षा पूर्वी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणूकी मध्ये,त्या वेळी डोनाल्ड ट्रूम्प यांच्यावर हा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान साधारण १ते २ वर्षा पूर्वी भारतात देखील व्हाट्सअप च्या माध्यमातून लोकांवर पाळत ठेवली जात असून, मोदी सरकार ट्रॅक करतय असा आरोप केंद्र सरकार वर झाला होता.

आता जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातलेले असताना भारत सरकारने Aarogya-Setu हे अॅप जनतेला वापरायला संगितले आहे. परंतु आता हेच अॅप लोकांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

ह्या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे,ते म्हणाले “आरोग्य सेतु ऐप “ ही एक अत्याधुनिक पाळत ठेवणारी यंत्रणा आहे, जी एका प्रायव्हेट ऑपरेटरला आउटसोर्स केलेली आहे. संस्थात्मक देखरेखीशिवाय – डेटाची गंभीर सुरक्षा आणि गोपनीयतेची चिंता वाढवते. तंत्रज्ञान आम्हाला सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते; परंतु नागरिकांच्या संमतीशिवाय भीतीचा फायदा नागरिकांचा मागोवा घेण्यासाठी होऊ नये.”

आरोग्य सेतु अ‍ॅप विषयी ही माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे  :-

 • आरोग्य सेतु हे केंद्र सरकार च्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने विकसित केलेले एक कोविड -१९ संपर्क ट्रेसिंग अ‍ॅप आहे.
 • हे अ‍ॅप  जीपीएस आणि ब्लूटूथ सेन्सरच्या मदतीने वापरकर्त्याच्या हालचालीचा मागोवा ठेवते.
 • आणि जर डेटाबेस आणि अल्गोरिदम वापरुन संक्रमित लोकांच्या संपर्कात आला तर ती माहिती त्यांना पाठवते.
 • अ‍ॅपवर नोंदणी करताना वापरकर्त्यांना वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि हा डेटा केवळ भारत सरकारबरोबर सामायिक केला जाईल.
 • अ‍ॅप च्या गोपनीयता धोरणात नमूद केल्यानुसार तृतीय पक्षाचा समावेश नाही.
 • ह्या अ‍ॅपच्या गोपनीयता धोरणात तिसर्‍या पक्ष्याचा समावेश नसल्याचे नमूद केलेले असले तरी सुद्धा विरोधक मात्र असा आरोप करत असल्यामुळे येणार्‍या काळात ह्या मुद्दया वरुण विरोधक मात्र सरकारला धारेवर धरण्याच्या तयारीत दिसत आहेत.
मोदी सरकार ट्रक by Aarogya Setu App ?
Aarogya Setu App
मोदी सरकार ट्रक by Aarogya Setu App
Aarogya Setu App
 • दरम्यान भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयारावघवन यांनी सांगितले आहे की, येणार्‍या काळात सरकार या अ‍ॅपचा वापर लोकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी ई-पास म्हणून करनार आहे.
 • Economics Times ने दिलेल्या वृता नुसार ह्या अ‍ॅप मध्ये ट्रॅकिंग हे ब्लूटूथ आणि लोकेशन च्या माध्यमातून तयार झालेल्या सामाजिक आलेखाद्वारे केले जाते, जे सकारात्मक चाचणी घेत असलेल्या कोणाशीही आपला संवाद दर्शवू शकते.

मोदी सरकार ट्रॅक करतय असा आरोप करणारे काही ट्वीट:-

मोदी सरकार च्या धोरणांमुळे धोक्याची घंटा :-

 • मोदी सरकारने हे अ‍ॅप सर्व सरकारी कर्मचार्‍यांना बंधनकारक केले आहे.
 • विरोधक म्हणत आहेत तसे जर सरकार खरेच ही माहिती गोळा करत असेल आणि तिराहित कंपनी सोबत शेअर करत असेल तर हे सर्व धोका दायक आहे ह्या मुळे प्रतेक माणसाचे खाजगी आयुष्य खाजगी राहणार नाही.
 • सोशल मीडिया वर अशी पण चर्चा आहेत की पाकिस्तानने आरोग्य सेतु सारखे फेक app बनवले आहे भारताचा डाटा चोरण्यासाठी, ह्या चर्च्यां मध्ये कितपत सत्य आहे ते अजून तरी कळू शकलेले नाही. जर हे खरे असेल तर भारताला ह्या पासून भविष्यात मोठा धोका होऊ शकतो.

आपल्याला काय वाटते मोदी सरकार ट्रॅक करतय का ? आपले मत कमेन्ट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *