mahajanadesh yatra
राजकारण

जालना,परभणी नंतर आज हिंगोली मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे.

Advertisement

भाजपा च्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या महा जनादेश यात्रा ही विघ्नानी भरलेली आहे असेच म्हणावे लागेल.

आता पर्यन्त 2 वेळा बंद करून पुन्हा सुरू झालेल्या या यात्रे मधले अडसर काही केल्या संपत नाहीयेत. या आधी कोल्हापूर सांगली पूर परिस्तिथी मुळे आणि नंतर अरुण जेटली यांच्या निधना मुळे थांबवण्यात आलेली ही महाजनादेश यात्रा आता मुख्यमंत्र्यांनी परत एकदा चालू केलीय.

काल मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचरणार्‍या पुजा मोरे ला केलेल्या अटकेनंतर तर मुख्यमंत्र्यांच्या अडचणी अजून वाढल्या असेच वाटत आहे. परवा जालना मध्ये ताफा अडवला तर काल परभणी मध्ये सभा उधळली आणि आज हिंगोली मध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.

mahajanadesh yatra

आज मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा हिंगोली मध्ये पोहचली आहे. हिंगोली मध्ये यात्रा येत असताना मुख्यमंत्री ताफ्याला हिंगोली जवळ काही तरुणांनी काळे झेंडे दाखवले आहेत त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला.परंतु तो आसफळ ठरला .

आता पर्यन्त महाजनादेश यात्रेत पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे अशी सर्व स्थरा वरुण टीका होत असतानाच काल पुजा मोरे या तरुणीचा अटकेचा विडियो viral झाला होता .

पुजा मोरे वर झालेल्या अन्यायाचा सर्व स्ठरावरून विरोध होत आहे. सोशल मीडिया मध्ये बीजेपी च्या यात्रे मध्ये पुजा मोरे या युवती ल अटक करतानाचा विडियो खूप viral झाल्या नंतर कडक शब्दात लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या.

Advertisement

शेतकरी कर्जमाफी,शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी या सारख्या असंख्य अडचणी असताना हे सरकार काहीच करत नाहीये याचाच निषेध आता जन समुदायकडून काळे झेंडे दाखवून नोंदविला जात आहे.

Video:

महाजनादेश यात्रेचा काळे झेंडे दाखवून निषेध

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *