Pooja-more-appeal-donation
महिला विशेष

मराठा तरुणी झालेल्या आत्याचारा विरोधात लढण्यासाठी मागतेय आर्थिक मदत.

Advertisement

2 ते 3 वर्ष पूर्वी मराठा क्रांति मोर्च्या मध्ये केलेल्या भाषणाने लोकांच्या दृष्टीशेपात आलेली ही तरुणी. गेल्या आठवड्यात सोशल मीडिया वर पुन्हा प्रसिद्ध झाली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रे मध्ये पोलिसा कडून मिळालेली वागणूक आपण सर्वांनी पहिलीच असेल. ती मुख्यमंत्र्यांना शेतकरी धोरणा विषयी विरोध दर्शवत असताना काही पोलिस कर्मचारी तिचे तोंड दाबत होते हे त्या video मध्ये दिसतच आहे. नंतर राजू शेट्टी नी देखील या प्रकरणा विषयी निषेध नोंदविला होता.

पूजा मोरेंच्या या प्रकरणा मुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आणि आता पूजा मोरे हिला संपूर्ण राज्यभरातून सहानभूती मिळत आहे. या परिस्थितित आता ही मराठा तरुणी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे. #सातबारा कोरा #पिकविमा #मुस्कटदाबी #नुकसानभरपाई या मुद्यान वर आपण राज्यस्तरीय आंदोलन करणार असल्याचे तिने जाहीर केले असून या आंदोलना साठी तिने आर्थिक मदतीचे आव्हान केले आहे.

मराठा युवतीचे आर्थिक मदतीचे आव्हान

pooja more appeal donation
pooja more appeal donation

तिचा हा आर्थिक मदतीचे आव्हान करणारा मेसेज सोशल मीडिया वर पसरत आहे.

येऊ घातलेल्या विधानसभा 2019 निवडणुकी पूर्वी पूजा मोरे या मराठा युवतीने पुकारलेल्या या आंदोलनाला किती यश मिळते आणि तिच्या आंदोलनाचा बीड जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे येणारा काळच ठरवेल.

Advertisement

आपण आमचा “जालना,परभणी नंतर आज हिंगोली मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे” हा लेख देखील तपासा.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *