धंदा वाढवण्यासाठी उपाय
उद्योगविश्व

धंदा वाढवण्यासाठी उपाय | धंदा चांगला चालण्यासाठी काय करावे

Advertisement

धंदा वाढवण्यासाठी उपाय >> कोणताही धंदा किंवा उद्योग लहान मोठा नसतो तो उत्तम रित्या चालवण्यासाठी सर्व प्रकारचे न्युनगंड बाजूला सारून जे गरजेचे आहे ते सर्व करण्याची आपली तयारी पाहिजे.आपण प्रचंड कॉन्फिडेंट आहात परंतु धंदा चांगला चालत नाहीये? तुम्ही कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगत नाहीत तरी देखील धंदा वाढत नाहीये ? धंदा वाढवण्यासाठी उपाय काय करावे ? व्यवसाय कसा वाढवावा ? असे एक न अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील.

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा लेख वाचल्यावर नक्की मिळतील. आणि हे उपाय केल्यावर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

धंदा वाढवण्यासाठी उपाय :-

१) तुमचा व्यवसाय डिजिटल करा

आताचा काळ हा डिजिटल आहे. बदलत्या काळानुसार तुम्हाला तुमचा व्यवसायातील काही गोष्टी देखील बदलणे गरजेचे आहे.आता लोक दुकानात जाण्यापेक्षा घरात बसून वस्तू खरेदी वर जास्त भर देतात.

धंदा वाढवण्यासाठी उपाय म्हणून तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय डिजिटल करावा लागेल.तुमचा व्यवसाय डिजिटल करण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टी करा.त्याचा नक्कीच तुमचा धंदा चांगला चालण्यासाठी उपयोग होईल.

Google My Business वर रजिस्टर करा.

Advertisement

तुमचा व्यवसाय मोठ्या करण्यासाठी सुरवातीला तुम्हाला तुमच्या व्यवसायाची तुमच्या भागामध्ये ओळख निर्माण करावी लागेल.तुमच्या जवळपास च्या लोकांना तुमचा व्यवसाय माहीत झाला पाहिजे.

Google My Business वर रजिस्टर केल्यामुळे तुमचा व्यवसाय गूगल मॅप वर दिसेलच,पण त्याच बरोबर बऱ्याच लोकांना गूगल तुमचा व्यवसाय सुचवेल.

उदाहरण:- जर तुमचे शाकाहारी व मांसाहारी हॉटेल आहे आणि तुम्ही Google My Business वर रजिस्टर केलेलं असेल तर ज्या वेळी कोणी व्यक्ती तुमचे हॉटेल ज्या शहरामध्ये तिथूनच गूगल वर शाकाहारी जेवण असे search करेल त्यावेळी गूगल तुमचा व्यवसाय त्यांना सुचवेल.

Google My Business वर तुम्ही रजिस्टर केल्यास तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी निश्चित फायदा होईल.

व्यवसायाची वेबसाईट बनवा

आता लहान मोठे सगळ्याच उद्योगांची वेबसाईट आहे.असे काही नाही की तुमचा व्यवसाय लहान आहे मग वेबसाईट कशाला बनवायची.

Advertisement

तुमचा व्यवसाय कसला ही असुद्या त्याची जर वेबसाईट असेन तर त्याची एक वेगळीच छाप आपल्या गिऱ्हाईकावर आपन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला कोणा वेब डिजाईनर कडे जाण्याची गरज नाहीये तुम्ही स्वतः कमी पैशात आणि घर बसल्या देखील चांगली वेबसाईट बनवू शकता.२०००-३००० रुपया मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची एक चांगली वेबसाईट स्वतः बनवू शकता.

GoDaddy किंवा BIGROCK सारख्या वेबसाईट चा वापर करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायाची उत्तम वेबसाईट बनवू शकता.

सोशल मीडियाचा वापर

हल्लीच्या युगात प्रत्येक जण सोशल मीडिया वापरत आहे,तुमचे जवळ पास सर्वच कस्टमर हे सोशल मीडिया वापरत असतील.

आणि जर मग आपले सर्व कस्टमर सोशल मीडिया वर असतील तर मग तुमचा व्यवसाय देखील सोशल मीडिया वर हवाच.

Advertisement

तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावाने फेसबुक,इन्स्टाग्राम,ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया वेबसाईट वर अकाउंट उघडले पाहिजे आणि ते रोज रोजच्या रोज हाताळले पाहिजे असे केल्याने तुम्ही तुमच्या कस्टमरच्या कळत न कळत संपर्कात असता ज्याचा निश्चित परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वृद्धी मध्ये होतो.

तुमच्या व्यवसायाचे व्हिडिओ तुम्ही जास्त करून सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करा जेणेकरून तुमच्या पेजची लोकांशी Engagement वाढेल.

CRM (Customer Relationship Management) Software

तुमचा व्यवसाय कोणता आहे त्यावरुन शक्य असल्यास CRM software वापरा. तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही रेलशनशीप बनवणे गरजेचे आहे तुमचे त्यांच्या सोबत बॉंडींग होणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला हे सॉफ्टवेअर मदत करते.

आता जवळ पास सर्वच उत्तम चालणारे व्यवसाय हे CRM सॉफ्टवेअर वापरत आहेत.

तुमच्या कस्टमर ला सण किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे किंवा तुमच्या व्यवसायातील विविध ऑफर तुमच्या कस्टमर ला मेसेज करून कळवणे, या सारखे अनेक फायदे CRM सॉफ्टवेअर वापराचे आहेत.

Advertisement

२) कच्चा मालातील नफा वाढवा

तुमच्या व्यवसाया साठी लागणारा कच्चा माल हा चांगल्या गुणवत्ते सोबतच स्वस्त देखील असला पाहिजे आणि अश्या प्रकारचा माल हा तुम्ही जिथे हा माल बनवला जातो तिथूनच जर होलसेल किंमती मध्ये विकत घेतला तर तुमचा नफा नक्की वाढेल.

फक्त आपल्या कस्टमर ला विकलेल्या उत्पादनातूनच नाही तर तुम्ही विकत घेणाऱ्या कच्चा मालावर देखील तुम्ही नफा वाढवू शकता.

खाली काही वेबसाईट दिल्या आहेत ह्या वेबसाईट वर तुमचे अकाउंट नसेल तर आजच ओपन करा.

Amazon Business Account

ऍमेझॉन च्या ह्या सर्विस मध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू होल सेल किंमतीत मिळतील.तसेच तुम्हाला जवळ जवळ २८% GST Examption देखील मिळेल.Amazon चे बिजनेस अकाउंट कसे चालू करायचे ह्या बाबत सर्व माहिती हवी असल्यास खालील बटन वर क्लिक करा.

Advertisement

AliBaba

या वेबसाईट वरन तुम्ही जास्त प्रमाणात उत्पादने खरेदी करू शकता आणि ते पण एकदम कमी किंमती मध्ये. या वेबसाईट वरून तुम्ही एखादे उत्पादन बनवणाऱ्या कंपनी सोबत डायरेक्ट व्यवहार करू शकता.ह्या वेबसाईट वर रजिस्टर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Ali Express

alibaba प्रमाणेच या वेबसाईट वर देखील तुम्ही डायरेक्ट manufacturer सोबत व्यवहार करू शकता.या वेबसाईट वर रजिस्टर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

३) गिऱ्हाईका सोबतची तुमची वागणूक

आपण आपल्या गिऱ्हाईक सोबत कायम अदबीने वागले पाहिजे.तुमचे उत्पादन किंवा सेवा विकण्याच्या आधी आणि विकल्या नंतर पण आपण त्यांचा सोबत अदबीनेच बोलले आणि वागले पाहिजे.असे केल्यास ते तुम्हाला कायम लक्षात ठेवतील आणि तुमच्या व्यवसायाचा तोंडी प्रचार देखील करतील.त्यांचे काम एक वेळ थोडे उशिरा झाले तरी चालेल पण त्यांच्यासोबत आपण नम्रतेनेच बोलले पाहिजे.

Advertisement

ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

1st Android apps Baby Products Books Health Health Related Products Measurement Mechanical Engg Metrology & Quality Control Products udyojak अजित पवार अमिताभ बच्चन उद्योग उपाय कोल्हापूर ग्रामीण छत्रपती ट्रक ट्रोलिंग देश पैसे प्रेरणा फडणवीस फायदा बिजनेस मशीन महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण मोदी मोबाइल रजिस्टर रेकॉर्ड लहान बाळ वायरल विदेश विद्यापीठ व्यवसाय शरद पवार शेती संधी स्वदेशी स्वयंपाक हिंदू

Advertisement
Advertisement
First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत