अॅप्स | बिजनेस अॅप्स
उद्योगविश्व

अॅप्स |व्यवसाया ला उपयोगी मोबाइल Apps|Business Apps

अॅप्स |व्यवसाया ला उपयोगी मोबाइल Apps|Business Apps >> पूर्वी व्यवसाय हा ठराविक ठिकाण पुरता मर्यादित असायचा परंतु आता जग बदलले आहे । आता तुम्ही तुमच्या घरी,खेडे गावात,तालुक्याच्या ठिकाणी बसून व्यवसाय करू शकता आणि तुमचे उत्पादन विकू शकता । त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाचे ठिकाण सोडून कुठे जावे लागत नाही हे सर्व शक्य झाले आहे ते इंटरनेट मुळे।

आता इंटरनेट च्या आधुनिकते सोबत आपण आपला व्यवसाय देखील आधुनिक केला पाहिजे । त्याच बरोबर आता पूर्वी सारख्या खतावण्या घेऊन हिशोब करण्याची देखील गरज नाहीये हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाइल मध्येच काही अॅप्स च्या माध्यमातून करू शकता ।

तसेच अशी बरीच काम जी आपल्याला पूर्वी व्यवसायाचे ठिकाण सोडून दुसरी कडे जावे लागायचे ती सर्व आता तुम्ही तुमच्या मोबाइल मधून करू शकता । जसे की तुमच्या व्यवसायाला लागणारा कच्चा माल आणणे,तुमच्या उत्पादनाची जाहिरात करणे, आणि विक्री । या सर्व गोष्टी आता तुम्ही घर बसल्या काही क्लिक वर मोबाइल च्या माध्यमातून करू शकता ।

असेच काही छोट्या व्यवसायाला उपयोगी मोबाइल अॅप आम्ही आपल्याला आज सुचवणार आहोत।

व्यवसाया ला उपयोगी मोबाइल अॅप्स ( बेस्ट अॅप्स फॉर बिजनेस )

बिजनेस ची जाहिरात करण्यासाठी उपयोगी काही बिजनेस अॅप्स :

Canva / PicsArt : या अ‍ॅप्स च्या मदतीने आपण आपल्या बिजनेसच्या जाहिराती साठी लागणारे बॅनर बनवू शकता । हे दोन्ही पण अॅप्स वापरण्यास एकदम सोपे असून याच्या साहाय्याने आपण आपल्या बिजनेस ची जाहिरात करण्यासाठी उत्तम असे बॅनर डिजाईन करू शकता आणि ते सोशल मीडिया साईट वर सेंड करू शकता ।

डिजाईन बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या फ्लेक्स डिजाईन वाल्याकडे जाण्याची गरज नाही ना कोणत्या प्रकारच्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटर ची गरज लागेल । हे दोन्ही अ‍ॅप्स फ्री मध्ये गूगल च्या प्लेस्टोर ला उपलब्ध आहेत ।

व्यवहारांची माहिती ठेवणारे अॅप्स :-

Khatabook / Ok Credit / Vyapar / Mera Cashier
हे सर्व अॅप्स तुम्हाला तुमच्या बिजनेस मध्ये होणाऱ्या प्रत्येक देवाण – घेवाणीची माहिती ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत । याचा वापर केल्यास तुम्ही कोणाकडून येणारी उधारी किंवा कोणाचे देणे विसरणार नाही ।

हे अॅप वापरण्यास सोपे असून यातील जवळ जवळ सर्वच अ‍ॅप्स मध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे ती भाषा निवडू शकता । ह्यांचा वापर केल्यास तुम्हाला तुमच्या उत्पादन विक्री मधील चढ उतार देखील आलेखाच्या माध्यमातून उत्तमरीत्या समजतील ।

या ४ अ‍ॅप्स पैकी कोणतेही एक अॅप सुचवायचे म्हंटल्यावर आम्ही आपल्याला khatabook हे अॅप सुचवू इच्छितो ।

दैनंदिन कामांची यादी / महत्वाच्या नोट्स / कामां बाबत सहकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी अॅप्स

Evernote / Todoist
हे दोन्ही पण अॅप्स तुम्ही विनाशुल्क वापरू शकता । यांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत व्यवसायातील कामांची यादी चेक लिस्ट स्वरूपात बनवू शकता ज्या मुळे झालेली कामे व राहिलेली कामे कोणती याची माहिती तुम्हाला उत्तम रित्या कळेल ।

तसेच Evernote या अॅप चा वापर करून तुम्ही सहकाऱ्यांसोबत महत्वाच्या नोट्स बनवू शकता ।

Todoist या अॅप च्या मदतीने तुम्ही तुमच्या टीम ला कामे विभागून देऊ शकता । आणि ते पूर्ण कधी होतील याचे उत्तम नियोजन करू शकता ।

हे दोन्ही पण अॅप्स उत्कृष्ट आहेत यातील कोणतेही तुम्ही तुमच्या व्यवसायात वापरू शकता ।

बिजनेस ला लागणारा कच्चा माल स्वस्त दरात खरेदीसाठी अॅप्स

Amazon / Alibaba / Aliexpress / IndiaMart
हे चार अॅप्स तुम्ही व्यवसायाला लागणार कच्चा माल खरेदी करण्यासाठी वापरू शकता ।

यातील ऍमेझॉन अॅप मध्ये होलसेल स्वरूपात माल खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या GST नंबर च्या सहाय्याने ऍमेझॉन बिजनेस अकाउंट रजिस्टर करावे लागेल ते कसे रजिस्टर करायचे याची माहिती तुम्हाला हवी असल्यास आमचा हा लेख वाचा 👉Amazon Business Account कसे रजिस्टर करायचे ।

या चारही अॅप्स च्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाला लागणारा कच्चा माल स्वस्त दरात खरेदी करू शकता । या चार पैकी चांगले आणि जास्त उपयोगी अॅप्स जर निवडायचे म्हंटले तर Amazon Business आणि AliExpress हे अॅप आहेत ।

पैशांचे व्यवहार करण्यासाठी योग्य अॅप्स

(Business): GooglePay Business App / PhonePay Business App / PayTm Business App / Freecharge Business App
ऑनलाईन पैशांची देवाण – घेवाण करण्यासाठी बरेच अॅप आहेत,त्यांचा वापर करून आपण पैसे ऑनलाईन पाठवू शकता आणि घेऊ शकता ।

यातील जवळजवळ सर्वच अॅप्स ऑनलाईन केलेल्या व्यवहारां वर तुम्हाला कॅशबॅक किंवा डिस्काउंट कूपन देतात । ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात होणाऱ्या व्यवहारां सोबतच इतर फायदा देखील होतो ।

यातील Googlepay आणि Phonepay हे अॅप्स लोकप्रिय आहेत ।

तुमचे उत्पादन घरबसल्या विक्री करण्यासाठी अॅप

ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, Paytm
तयार माल विकण्या साठी तुम्ही यांसारख्या अॅप चा उपयोग करू शकता । या अॅप्स वर तुमचे प्रॉडक्ट विक्री साठी तुम्ही टाकू शकता ।

हे असे अॅप आहेत ज्यावर तुम्ही तुमचे उत्पादन विक्रीसाठी टाकल्यावर ते तुम्ही पूर्ण देशात कोठेही विकू शकता ।

ज्यावेळी कोणी कस्टमर तुमचे उत्पादन घेण्यासाठी ऑर्डर टाकेल ते बनवून तयार करून व्यवस्थित पॅक करून ठेवणे हेच तुमचे काम असेल ते घेऊन ज्यायला ह्या वेबसाईट चा माणूस येईल व ते विकत घेनाऱ्या व्यक्तीस पोहच होईल ।

घरबसल्या तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकता ।

महत्वाचे डॉक्युमेंट्स जतन करण्यासाठी वापरायचे अॅप

Google Drive
महत्वाचे डॉक्युमेंट्स जे तुम्हाला कधीही अचानक लागू शकतात असे कागदपत्र किंवा फाइल्स तुम्ही Google Drive अॅप वर ठेवू शकता ।

इथे तुम्हाला जवळ पास १५ जी.बी. पर्यंतचा फ्री डेटा स्टोरेज मिळतो । जो की खूप जास्त आहे ।

जे जे तुम्हाला अचानक कधीही लागू शकते जसे की तुमच्या व्यवसायाचा शॉप ऍक्ट,फूड लायसेन्स,बँक पासबुक व इतर अनेक ।

यांसारखी कागदपत्र एकदाच Google Drive अॅप वर अपलोड करून ठेवा जेणे करून ते कायम तुमच्या सोबत तुमच्या मोबाइल मध्ये असतील । त्याच बरोबर तुम्ही तुमच्या उत्पादनाचे विडियो देखील इथे अपलोड करू शकता |

Google Drive हे लोकप्रिय अॅप वापरल्यास कागद पत्र जुळवणी व जतन करून ठेवण्याचा तुमचा त्रास नक्कीच कमी होईल.

तात्पर्य

वरील सात प्रकारच्या मोबाईल अॅप्स चा उपयोग करून तुम्ही तुमचा व्यवसाय मोबाईल वरून उत्तमरीत्या हाताळू शकता ।

तुम्हाला तुमच्या व्यवसायचे ठिकाण सोडून इतरत्र कोठे जाण्याची गरज भासणार नाही आणि तुमचा कच्चा माल आणायला जाणे, कागद पत्र जपून ठेवणे, व्यवहारांचा हिशोब ठेवणे, उधार वहीत मांडून ठेवणे, विक्री साठी बाहेर जाणे यांसारखी अनेक त्रासदायक कामे कमी होतील.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *