व्यवसाय कोणता करावा ? | कोणता धंदा सुरु करावा ?

व्यवसाय कोणता करावा ? बिझनेस कोणता करावा ? नवीन व्यवसाय कोणता करावा? धंदा कोणता करावा ? कोणता व्यवसाय सुरू करावा ? >> आता ज्या वेळी तुम्ही हा प्रश्न विचारता त्यावेळी तुम्हाला असे अपेक्षित असते की कोणी तरी तुम्हाला व्यवसाय सुचवावे.

मुळात व्यवसाय कोणता करावा किंवा business konta karava हा प्रश्न तुम्ही कोणाला तरी विचारनेच चुकीचे आहे.

कारण जो कोणी तुम्हाला आज एखादा धंदा सुचवेल तो उद्या पासून तुमच्या सोबत असेल का? हा व्यवसाय नीट कसा चालेल हे तो व्यक्ती तुम्हाला येणाऱ्या काळातील व्यवसायातील अडचणींना सामोरे जाताना सांगेल का? तुमचा व्यवसाय मोठा व्यवसाय कसा होईल या प्रश्नांची उत्तरे तो देईल का? या सर्व प्रश्नांचे एकचं उत्तर आहे ते म्हणजे “नाही”.

Table of Contents

व्यवसाय कोणता करावा ? उद्योग किंवा धंदा कोणता करावा ? नवीन व्यवसाय

या प्रश्नाचे उत्तर हे मुळात तुमच्या कडेच आहे.कसे ते सांगतो त्या साठी तुम्हाला स्वतःला व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न न विचारता इतर काही प्रश्न विचारावे लागतील आणि योग्य उत्तरं मिळवावी लागतील.
असेच काही प्रश्न खाली आहेत.

१) नवीन व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न करण्यापूर्वी तुमची मानसिकता व्यवसाय करण्याची झाली आहे का? ते तपासा.

– हे चेक करण्यासाठी तुम्हाला आधी ह्याचा विचार करावा लागेल की तुम्ही ह्या जगाला काय देऊ शकता आणि ते देण्यासाठी तुम्ही कोणताही धोका पत्करायला तयार आहात का.

असे विचार करण्याचे कारण म्हणजे या जगाला तुम्ही काहीतरी नवीन आणि उपयुक्त असे देण्याचा जो पर्यंत प्रयत्न करणार नाही तो पर्यंत तुमचा व्यवसाय मोठा होणार नाही.

मग तुम्ही सेवा द्या किंवा प्रॉडक्ट द्या तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी आणि उत्तम रीतीने चालवण्या साठी तुम्हाला हा विचार करावाच लागेल.

जसे मार्क झुकेरबर्ग ने जगाला काही तरी देण्याच्या उदेश्यानेच फेसबुक ची निर्मिती केली. ज्याप्रमाणे बिल गेट्स ने जगाला कॉम्पुटर चांगल्या पद्धतीने हाताळता यावा या साठीच मायक्रोसॉफ्ट ची निर्मिती केली.

आणि दुसरा मुद्दा म्हणजे धोका,हो व्यवसाया मध्ये धोका आहे आणि जर तुम्हाला सुरक्षा हवी असेल तर तुम्ही नोकरी केली पाहिजे.

जर तुमची या दोन्ही गोष्टीं म्हणजे जगाला नवीन काही तरी देण्याची आणि धोका पत्करण्याची तयारी असेल तर तुम्ही व्यवसाय कोणता करावा ? हा विचार करू शकता.

२) व्यवसाय कोणता करावा हे तुम्ही ज्या भागात नवीन व्यवसाय सुरू करणार आहे, त्या भागातील लोकांची गरज काय ? आणि ती तुम्ही कशी भागवू शकता ? यावर अवलंबून असते.

ह्या प्रश्नाचे उत्तर हे तुमचा धंदा कसा चालेल हे तुम्ही तो सुरू करण्याच्या आधीच सांगेल.कोणताही व्यवसाय सुरू करण्या आधी तुम्ही तो ज्या भागामध्ये सुरू करनार आहात त्या भागातील लोकांच्या गरजांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे.

तिथल्या लोकांना कोणती गोष्ट लागते,जी तिथे उपलब्ध नाहीये,किंवा कमी प्रमाणात आहे अथवा वेळेला उपलब्ध होत नाही अशी वस्तू तुम्ही देऊ शकता.

तसेच एखादी गोष्ट जी केल्यावर त्या लोकांचे खर्ची होणारे कष्ट,वेळ,आणि पैसा तुम्ही वाचवू शकता.

तुमच्या व्यवसाया मुळे लोकांच्या अडचणी कमी कश्या होतील, त्यांचा वेळ कसा वाचेल.या कडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे.

उदा.Jack Ma यांनी चीन मध्ये Alibaba.com ही वेबसाईट चालू केली,त्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय एकमेकांच्या संपर्कात आले. त्यामुळे अनेक व्यावसायिकांच्या त्यांच्या वस्तू विकताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्या,त्यांना फायदा झाला आणि पर्यायाने सामान्य माणसाला ही फायदा झाला.

धंदा कोणता करावा या प्रश्नाचे अंशतः उत्तर तुम्हाला लोकांच्या गरजा ओळखल्यावर मिळेल.

लोकांच्या अश्या ४ गरजा/अडचणी शोधा, ज्यांचे उत्तर तुमच्या कडे आहे आणि त्याच तुमच्या व्यवसायाच्या कल्पना आहेत.

३) माझी आवड कशात आहे ? माझी बलस्थाने कोणती ? माझी आवड कशात आहे ? – या गोष्टींवरून देखील तुम्ही कोणता नवीन व्यवसाय करावा ठरवू शकता.

लोकांच्या अडचणी कमी करणाऱ्या किंवा गरजा भागवणार्‍या व्यवसायाच्या ज्या कल्पना तुम्ही निवडल्या आहेत त्यापैकी कशात तुम्हाला जास्त आवड आहे ते तपासा.

आवड म्हणजे जे काम केल्यावर तुम्हाला आनंद मिळतो.आपली आवड ही अशी पाहिजे जी काळानुरूप बदलली नाही पाहिजे.

बऱ्याचदा असे होते १-२वर्ष आपण एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो आणि नंतर ते काम किंवा व्यवसाय करताना कंटाळा येतो आणि त्याचाच परिणाम तुमच्या व्यवसायावर होतो.

त्यामुळे तुमची आवड कश्यामध्ये आहे ते ओळखा. जे काम तुम्ही वर्षानुवर्षं सतत जरी केले तरी तुम्ही त्यात आनंदी असाल आणि जो व्यवसाय केल्यावर तुम्हाला समाधान मिळते असा व्यवसाय / धंदा निवडा.

आवड ही नेहमी अशी असावी ज्याची तुमच्या आयुष्याशी बांधिलकी असेन,ज्या कामात तुम्हाला अपयश येत राहिले तरी तुम्ही जिद्दीने ती करण्यात स्वतःला झोकून द्याल आणि त्यात यश हे मिळवाल.

तुम्ही तुमची बलस्थाने आणि कमजोरी कोणती हे लक्षात घेतल्यास व्यवसायाची आखणी करणे सोपे जाते.

आपण आपली बलस्थाने आणि कमजोरी एका पानावर लिहुन घेऊन, त्याचा आपल्या बालस्थानांचा नवीन व्यवसाया मध्ये कसा फायदा होईल याचा विचार करावा.तसेच आपली कमजोरी कशी कमी करता येईल ते ठरवता येईल.

४) नवीन व्यवसाय करण्यासाठी भांडवल किती लागेल ? तेवढे भांडवल आपल्या कडे आहे का ? ते कसे उभे करता येईल ?

ज्या वेळी आपण व्यवसायाचा विचार करतो त्याच वेळी त्यासाठी किती भांडवल लागेल हा सर्वात महत्वाचा मुद्दा सर्व प्रथम आपल्या समोर येतो.

आपल्या नवीन व्यवसायाला किती भांडवल लागणार आहे याचे गणित हे व्यवसाय सुरू करण्याआधीच काढणे गरजेचे आहे, इतकेच नव्हे तर ते भांडवल आपण कसे उभे करू शकतो त्याचे मार्ग कोण कोणते असू शकतात.

भांडवल उभे करण्या पर्यंत बरेच जण सर्व नियोजन योग्य करतात, परंतु ही भांडवलाची परतफेड आपण कशी करनार आहोत याचा विचार आधीच करणे गरजेचे आहे.

म्हणजे अंदाजे धंदा सुरू झाल्यावर किती दिवसांत आपण ते पैसे परत घेतलेल्या ठिकाणी देऊ शकतो याचे मोजमापन आधीच केले तर आपला व्यवसाय त्या दिशेने पुढे नेण्यास मदत होते.

आता हे धंदा उभा करताना लावलेले पैसे परत मिळवण्यासाठी आपल्याला त्याच धंद्या मधून तेवढे उत्पन मिळवायला किती कालावधी लागेल.

नवीन धंद्या मधून महिन्याला साधारण किती पैसे आपण मिळवू ह्या गोष्टींचा अभ्यास करवा लागणार.

आणि हा अभ्यास करताना आपल्या वस्तूच्या निर्मितीची किंवा सेवा देणार असल्यास सेवा देताना येणारा खर्च या गोष्टींचा अभ्यास व्यवसाय सुरू करण्या आधी करावा लागेल.

नवीन व्यवसाय सुरू करताना प्रत्येक जण भांडवल उभारणी बाबत विचार करतो, पण ते भांडवल आपण जिथून कुठून उभे करणार आहोत त्याचा परतावा आपण कसा आणि किती कालावधी मध्ये करणार आहोत. याचा विचार देखील करणे गरजेचे आहे.

एखादा व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे तूर्तास आवश्यक पैसे नसल्यास आपण आपले सामाजिक संबंध आणि आपली इच्छा शक्ती या गोष्टींचा वापर करून तूर्तास टिकून राहून तेवढे भांडवल कसे उभा करता येईल याचा विचार करा.

तेवढे भांडवल उभे करण्यासाठी काय करावे लागेल किंवा काय करता येईल याचा विचार करा.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि इच्छा शक्ती चा वापर करा कारण हा एकमेव मार्ग असा आहे ज्यातून आपण आपली स्वप्न पूर्णत्वास नेऊ शकता.

एवढे भांडवल नाही म्हणून मी हा व्यवसाय करू शकत नाही असे म्हणून विषय सोडून देण्यापेक्षा,त्या व्यवसायाची सुरवात कमी भांडवल वापरून लहान स्वरूपात करता येऊ शकते का ? किंवा तेवढे भांडवल मी कसे उभे करू शकतो याचा विचार करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

५) संयम >> हा नवीन व्यवसाय मला माझ्या उद्दिष्टा पर्यंत घेऊन जाऊ शकते का ? का मी पहिला चालू व्यवसाय बंद करून दुसरा सुरू करू?

कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना आपले ध्येय ठरलेले असते.त्यातून आपल्याला किती नफा होणार आहे,आणि तो नफा आपण कशात खर्च करणार आहोत याचा पण पूर्ण विचार आपण केलेला असतो.

आपल्याला मिळालेले यश कसे असेल आणि त्या यशाच्या शिखरावर गेल्यावर आपण काय काय करणार आहे हे सगळे आपले ठरलेले असते परंतु तिथे पोहचायचे कसे? कधी पोहचणार? आपण पोहचणार आहे का नाही? असे एक ना अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येतात आणि असे लोक कोणताही धंदा / व्यवसाय सुरू करण्याआधीच माघार घेतात.

  • कोका कोला कंपनी हे व्यवसाया मधील संयम याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

कोका कोला कंपनी आपल्याला माहिती आहे,आज ती ज्या यशाच्या शिखरावर आहे, ती काय एका रात्रीतून तिथे पोहचलेली नाही.

कॅडलेर (Founder of Coca Cola) यांनी जेंव्हा सुरवात केली तेंव्हा सुरवातीच्या काळात त्यांना कमी प्रतिसाद मिळत होता, परंतु त्यांनी संयम सोडला नाही टिकून राहिले.

कोका कोला कंपनी - व्यवसाय कोणता करावा ? बिझनेस कोणता करावा ? नवीन व्यवसाय कोणता करावा? धंदा कोणता करावा ? कोणता व्यवसाय सुरू करावा ?
कोका कोला कंपनी

प्रयत्न चालू ठेवले म्हणून आज कोका कोला कंपनीचे उत्पादन जगभरात जवळ जवळ प्रत्येक देशात विकले जात आहेत.

आज जगातील सर्वात मोठी पेय कंपनी कोका कोला ही आहे.

सुरवातीच्या काळात ज्यावेळी दिवसाला फक्त १० बाटल्या विकल्या जात होत्या. तेंव्हाच जर कॅडलेर यांचा संयम सुटला असता आणि त्यांनी ही कंपनी बंद केली असती तर आज कोका कोला हा ब्रँड पण अस्तित्वात नसता.

त्यामुळे तुमच्या व्यवसायात कोणतीही अडचण आली तरी खचून न जाता व्यवसाय या मधून कसा बाहेर निघेल, आणि आपल्या व्यवसायाची वाढ कशी होईल याचा संयमाने विचार करने गरजेचे आहे.

६) आपण हे विकू शकतो का ? विक्री करण्याच्या विविध पद्धती शिकण्याची तयारी आहे का ?

आपली गोष्ट किंवा आपले मत दुसऱ्याला पटवून देणे ही एक प्रकारची विक्री कलाच आहे.

व्यवसाय किंवा धंदा म्हणजे काय तर वस्तूंची देवाण घेवाण. ज्या वेळी लोक तुमच्या कडून काहीतरी विकत घेतील तेंव्हाच तुमचा धंदा होईल.

आता लोकांनी वस्तु / सेवा विकत घेण्यासाठी तुमच्या पर्यंत येण्याची तुम्ही वाट बघायची का तुम्ही स्वतः तुमचे उत्पादन किंवा सेवा त्यांच्याकडे विक्री साठी घेऊन जाणार? कोणती वस्तु किंवा सेवा तुम्ही सहजतेने लोकांना विकू शकता ? याचा विचार करा.

विक्री करण्या साठी तुम्हाला जाहिरात करता येणे गरजेचे आहे आपली वस्तू अधिक अधिक लोकांपर्यंत कशी पोहचवता येईल ते पाहणे गरजेचे आहे.

नवीन काळानुसार बदलणार्‍या विक्री करण्याच्या विविध पद्धती तुम्ही शिकणे,अवगत करणे गरजेचे आहे.

तुमचा व्यवसाय लोकांना दिसला,माहीती झाला तर आणि तरच लोक तुमच्या कडून काहीतरी विकत घेतील ना. त्यासाठी डिजिटल मार्केटिंग चे नवीन तंत्र तुम्हाला स्वतःला अवगत करून घेणे ही काळाची गरज आहे.

जसे की फेसबुक जहिरात,इन्स्टाग्राम जहिरात,ट्विटर वर जाहिरात आणि असे बरेच पर्याय तुमच्या कडे आहेत.

व्यवसाय कोणता करावा ? बिझनेस कोणता करावा ? नवीन व्यवसाय कोणता करावा? धंदा कोणता करावा ? कोणता व्यवसाय सुरू करावा ?
फेसबूक जाहिरात

आपण एखादी वस्तू विकतोय म्हणजे ह्यात काही कमीपणा आहे असा न्यूनगंड मनात बाळगू नका. याउलट मी हे उत्पादन किंवा सेवा तयार केले आहे,ते उत्पादन लोकांच्या अडचणी दूर करणारे आहे किंवा फायदा करून देणारे आहे ते मे लोकांपर्यंत पोहचवून लोकांना त्याचे फायदे सांगणे,ते त्यांना पटवून देणे हे माझे काम आहे असा विचार करा.

विक्री करत असताना दोन्ही बाजूंचा विचार करा.म्हणजे ज्या विक्री नंतर तुम्ही आणि तुमचे गिऱ्हाईक सुद्धा खुश असले पाहिजे.जेंव्हा दोन्ही बाजूचे लोक खुश असतील, तेंव्हाच भविष्यात परत परत व्यवहार होतील.

तुम्ही तुमचे उत्पादन / सेवा कितीला व कशी विकणार आहात त्यात नफा किती प्रमाणात असेल या सर्वांचे गणित व्यवसाय सूरु करण्याआधीच करणे जरुरीचे आहे.

तात्पर्य – व्यवसाय कोणता करावा / धंदा कोणता करावा

वरील मुख्य ६ प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा,हे प्रश्न स्वतःला विचारा. असे केल्यास तुम्हाला धंदा कोणता करावा किंवा व्यवसाय कोणता करावा या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळेल, आणि हा प्रश्न इतर कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही.

टीप :- बऱ्याच लोकांना आपला नवीन एखादा व्यवसाय सुरू करावा असे वाटत असते पण त्यातील काही ठराविक लोकच तो सुरू करतात. आणि एकदा सुरू केलेला व्यवसाय टिकवण्यात फारच कमी लोक यशस्वी होतात,तुम्हाला जर व्यवसाय टिकवून ठेवणाऱ्या लोकांच्या यादीत यायचे असेल तर कायम शिकत राहा,नवीन नवीन संकल्पना आपल्या व्यवसायात अवलंबत राहा.

नवीन व्यवसाय कोणता करावा ?

नवीन व्यवसाय कोणता करावा या प्रश्नाचे उत्तर तुमचे तुम्हालाच माहिती आहे,ते शोधण्यासाठी आधी हा लेख वाचा आणि मग ठरवा तुम्ही कोणता नवीन व्यवसाय करू शकता किंवा केला पाहिजे. तरी देखील तुम्हाला थोडी आयडिया यावी म्हणून काही पर्याय सुचवतो,ते पुढील प्रमाणे :- तुम्ही जर ग्रामीण भागातून येत असाल तर तुम्हाला ग्रामीण भागात करता येणारे व्यवसाय हा आमचा लेख वाचला पाहिजे. आणि जर तुम्ही घर बसल्या व्यवसाय करू इच्छिता तर तुम्हाला ऑनलाइन बरेच पर्याय उपलब्ध आहेत जसे की,ब्लॉग लिखाण करणे,यूट्यूब,लोगो डिजाइन,डिजिटल मार्केटिंग,सोशल मीडिया मार्केटिंग आणि महिलांसाठी कोचीन क्लासेस,स्वयंपाकाचे क्लास,मेहंदी क्लास,लहान मुलांना सांभाळणे,ऑनलाइन कपडे विक्री दागिने विक्री बरेच काही.

तुम्ही आमचे हे लेख देखील वाचु शकता घरगुती व्यवसाय आणि ग्रामीण भागातील व्यवसाय.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

3 thoughts on “व्यवसाय कोणता करावा ? | कोणता धंदा सुरु करावा ?”

  1. Hello my friend! I wish to say that this post is awesome, nice written and come with almost all significant infos.

    I would like to see more posts like this .

  2. अनिकेत ठोंग

    हा वी4 तर मी केलाच आहे पण व्यवसाय कोणता करावा मी आहे 1 शेतकरी

Comments are closed.

Scroll to Top