व्यवसायाचे प्रकार |व्यवसाय के प्रकार |Types of Business

व्यवसायाचे प्रकार | व्यवसाय के प्रकार |Types of Business >> सर्व प्रथम आपण जाणून घेऊ व्यवसाय म्हणजे काय ? व्यवसाय ही अशी प्रक्रिया आहे ज्यात वस्तू आणि सेवांचे उत्पादन आणि विक्री नफा मिळविण्याच्या उद्देशाने नियमितपणे केली जाते. व्यवसायामध्ये उत्पादनांपासून वस्तूंच्या विक्री पर्यंतच्या सर्व क्रिया समाविष्ट असतात. व्यवसायाचा मुख्य हेतू समाजाच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यातून निधी मिळविणे हा आहे.

व्यवसायाचे प्रकार हे मुख्यतः क्षेत्र,आकारमान,संस्था पद्धत, उत्पादनाचे प्रकार,आर्थिक क्रिया आणि व्यवसायाचे ठिकाण या ६ गोष्टींवर आधारित आहेत.

व्यवसायाचे प्रकार :-

क्षेत्रा नुसार व्यवसायाचे प्रकार

 • सरकारी उद्योग

व्यवसायाच्या आकारमाना नुसार प्रकार

 • मोठे उद्योग (मल्टि नॅशनल कंपनी)
 • मध्यम उद्योग
 • लघु उद्योग

संस्था पद्धतीनुसार व्यवसायाचे प्रकार

 • सहकारी संस्था
 • संयुक्त भांडवली संस्था
 • भागीदारी संस्था
 • व्यक्तिगत संस्था

उत्पादना नुसार प्रकार

 • शेती उद्योग (Agriculture Business)
 • मूलभूत उद्योग (Primary Industries)
 • पूरक उद्योग (Supplementary Industries)
 • सेवा उद्योग (Service Industries)

आर्थिक क्रियांच्या आधारे व्यवसाय प्रकार

 • प्राथमिक क्रिया – ज्या क्रियां मध्ये माणूसा कडून नैसर्गिक स्त्रोतांचा थेट वापर केला जातो आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो, त्या सर्व क्रिया प्राथमिक क्रिया म्हणून संबोधले जाते. उदाहरण :- इमारती लाकूड तोडणे, वन उपक्रम,पशुसंवर्धन,शेतीविषयक कामे,मत्स्यपालन इत्यादी .
 • दुय्यम क्रिया – या क्रियां मध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा थेट वापर केला जात नाही. उलट, निसर्गाने प्रदान केलेला माल पुनर्निर्मित करून वापरला जातो. जसे की कापसापासून कापूस बनवणे, लोखंडा पासून स्टील, लाकडापासून फर्निचर,गव्हाचे पीठ इ.
 • तृतीय क्रिया – या क्रियां मध्ये समाजाला प्रदान केलेल्या सेवांशी संबंधित क्रिया समाविष्ट असतात. जसे की शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यापार, रहदारी,टेलीकॉम,खाद्यपदार्थ घरपोहच करणे इ. सारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित सेवा.
 • चतुर्थ क्रिया – ज्या क्रियां मध्ये समाजाचा विकास करण्या हेतूने कार्य केले जाते,त्या सर्व क्रियांना चतुर्थ क्रिया म्हणून संबोधले जाते उदाहरणार्थ संशोधन कार्य, वैज्ञानिक, कलाकार, नेतृत्व, पुरस्कार इ.

व्यवसायाचे ठिकाण

 • शहरी भागातील व्यवसाय.

मित्रांनो, या लेखामध्ये आपण व्यवसायाचा अर्थ आणि प्रकार या विषयी शिकलो आहोत, आशा आहे की आपल्याला व्यवसायाचा अर्थ आणि प्रकार समजले असतील. आपल्यास हा लेख किंवा व्यवसायाशी संबंधित काही प्रश्न असल्यास, कृपया खाली कमेंट करा आम्ही आपल्या कमेंटची प्रतीक्षा करीत आहे.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “व्यवसायाचे प्रकार |व्यवसाय के प्रकार |Types of Business”

 1. Pingback: ग्रामीण भागातील व्यवसाय-गुंतवणूक-नफा- 14 Best Business Ideas - Bihar Se Hai

Comments are closed.

Scroll to Top