तुम्ही कुठे फिरता ते स्टोर करून ठेवणारे गूगलचे फिचर माहिती आहे का ?

तुम्ही कुठे कुठे फिरता ते स्टोर करून ठेवणारे गूगलचे फिचर >> आता मोबाईल चा जमाना आहे, मोबाईल मुळे जसे अनेक फायदे झाले आहेत तसेच काही प्रमाणात तोटे देखील आहेत । मोबाईल च्या या जगात हल्ली लोक सर्रास पणे खोटे बोलत असतात । फोन वर खोटे बोलणे हे तर जणू आता कॉमन च होऊन बसले आहे ।

परंतु आपली प्रिय व्यक्ती, किंवा आपली मुले देखील असेच आपल्या सोबत खोटे बोलून बाहेर कुठे फिरत आहेत हे आपल्याला जरूर कळले पाहिजे त्या साठी तुम्ही गूगल मॅप च्या एका फिचर चा उपयोग करू शकता । ज्याचा वापर करून आपण ती व्यक्ती दिवस भरात किंवा मागच्या काही दिवसांमध्ये किती ठिकाणी फिरली आहे कोणत्या कोणत्या हॉटेल ला, शहरा ला त्यांनी भेट दिली आहे ते सर्व तुम्हाला कळेल ।

तुम्ही कुठे कुठे फिरला हे दाखवणारे गूगल मॅप चे फिचर :

गूगल च्या गूगल मॅप मध्ये तुम्हाला “Your Timeline” हे फीचर मिळेल,ज्याचा उपयोग करून तुम्ही आज पर्यंत किती फिरला आहात याची माहिती मिळेल । या शिवाय तुम्ही ठराविक एखाद्या तारखेचा इतिहास देखील पाहू शकता । त्या तारखेला तुम्ही कुठे होता, कुठे कुठे फिरला व तुम्ही कोणत्या कोणत्या हॉटेल ला भेट दिली ।

तुम्ही आता पर्यंत किती देश्यांचा दौरा केला आहे तसेच आता पर्यंत कोणत्या कोणत्या शॉपिंग सेंटर ला भेट दिली आहे त्याबरोबरच कोण कोणत्या एअरपोर्ट ला आता पर्यंत भेटी दिल्या आहेत अशी सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल । या साठी अट फक्त एकच आहे ती म्हणजे तो मोबाईल वापरकर्त्या व्यक्तीने त्यातील ‘डिलिट डे’ या पर्यायाचा उपयोग करून तो सर्व डेटा डिलिट केलेला नसावा ।

गूगल मॅप मध्ये टाइम लाइन फीचर कुठे असते

तुम्ही कुठे कुठे फिरता ते स्टोर करून ठेवणारे गूगलचे हे फिचर
‘Your Timeline’ वर क्लिक करा

तुमच्या मोबाईल मध्ये गूगल मॅप हे अँप्लिकेशन इन्स्टॉल असेलच ते ओपन करा । त्यामध्ये चित्रात दाखवल्या प्रमाणे डाव्या कोपऱ्यात तुम्हाला तीन आडव्या लाइन दिसतील त्यावर क्लिक करा । यानंतर जे पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्यातील “Your Timeline” वर क्लिक करा तुमच्या समोर पूर्ण ट्रॅव्हल हिस्टरी ओपन होईल । इथे तुम्ही अगदी आरामात आज पर्यन्त तुम्ही कुठे कुठे फिरला आहात आहे हे जाणून घेऊ शकता ।

Timeline Feature चा वापर कसा कराल

आपला आपल्या मुलांवर तसेच आप्तजणांवर विश्वास असणे गरजेचे आहेच परंतु आजच्या मोबाइल च्या या युगात आपण आपल्या मुलांकडे विशेषतः लक्ष देणे गरजेचे आहे,ते तुमच्या सोबत खोटे तर बोलत नाहीयेत ना या कडे लक्ष देणे गरजेचे आहे । तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती बद्दल तसेच तुमच्या मुलांच्या फिरण्यावर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता ।

कुठे कुठे फिरला ते दाखवणारे गूगल टाइमलाइन
गूगल टाइमलाइन

आपला मुलगा कुठे कुठे फिरतो हे पालकांना माहीत असणे गरजेचे आहे त्यासाठी पालक वर्ग ह्या फीचर चा वापर करू शकतात । एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही अशी माहिती चेक करू ईच्छीत असाल तर त्या व्यक्तीच्या मोबाइल मध्ये तुम्हाला गूगल मॅप मध्ये ही माहिती मिळेल ।

या शिवाय आठवणीचा आनंद घेण्यासाठी किंवा आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही गूगल मॅप वर टाइम लाइन बघू शकता । तुमच्या जुन्या ट्रिप च्या आठवणी तुम्हाला नक्कीच ऊर्जा देतील ।

ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा .

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top