हरवलेली वस्तु कशी सापडावी उपाय । हे उपाय करा आणि हरवलेली वस्तु मिळवा

हरवलेली वस्तु कशी सापडावी उपाय / haravleli vastu >> दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक अडचणी येत असतात त्यातील एक म्हणजे एखादी वस्तू हरवणे । आजच्या ह्या धावपळी च्या युगात तुमची एखादी वस्तू मग ते घड्याळ,लॅपटॉप,मोबाइल, पाकीट,पैसे किंवा मग एखादी व्यक्ती देखील हरवू शकते ।

अश्या प्रसंगी तुम्ही काही तातडीचे उपाय करणे गरजेचे असताना काही लोक अश्या वेळी उगाच पॅनिक होऊन अंधश्रद्धेचे बळी ठरतात किंवा मग आपल्या नशिबाला दोष देत बसतात ।

तुमची वस्तु कुठे हरवली आहे ते वस्तु शोधण्यासाठी महत्वाचे आहे । तुम्हाला जर तुमची वस्तु कोठून हरवली आहे हे आठवत असेल तर ती सापडणं सोपे आहे । अश्याच काही प्रसंगी आपण आपली हरवलेली वस्तु कशी शोधावी ते सांगण्याचा आमचा प्रयत्न ।

तुमची कोणती वस्तु हरवली आहे त्यानुसार उपाय करावेत जेणे करून हरवलेली वस्तु सापडण्यास मदत होईल ।

हरवलेली वस्तु कशी सापडावी या साठी काही उपाय

जर एखादी वस्तु हरवली असल्यास लोक हे उपाय करतात
लॅपटॉप, मोबाइल,इंटरनेट मोडेम,स्पीकर,चार्जर इ. सहसा अश्या गोष्टी ह्या कॉलेज,ऑफिस,ट्रेन,बस अश्या ठिकाणा वरून च हरवतात तर मग अश्या गोष्टी सापडण्या साठी तुम्ही जिथे हरवली तिथले सीसी टीव्ही फुटेज चेक करून बघू शकता, ट्रेन किंवा बस असेल तर संबंधित अधिकाऱ्यां ना भेटून तुमची तक्रार नोंदवा ।

शक्यतो तुमच्या मोबाइल चे किंवा लॅपटॉप फोटोज तुमच्या जवळ असतील तर ते सोशल मीडिया वर शेयर करा जेणे करून कोणाला तुमची वस्तु सापडली असेल तर ती मिळेल ।वरील सर्व करून देखील वस्तू सापडत नसेल तर सापडून देणार्‍या ला बक्षीस म्हणून काही तरी देण्यात येईल असे सोशल मीडिया वर टाका ।

जर तुमची वस्तु जास्त किंमतीची असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन ला तक्रार द्या ।

हरवलेला मोबाइल कसा सापडावा उपाय

हरवलेला मोबाईल सापडण्यासाठी सगळ्यात सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मोबाईल मध्ये किंवा कॉम्पुटर/लॅपटॉप मध्ये तुमचे गूगल चे अकाउंट लॉगिन करा लॉगिन करण्यासाठी तुमच्या gmail चा वापर करा आणि मग गुगलवर जावा आणि गूगल वर “find my phone” असे टाइप करा ।

गूगल तुम्हाला लगेच खाली तुमच्या मोबाईल चे अचूक लोकेशन दाखवेल परंतु त्या साठी तुमच्या मोबाईल मध्ये GPS आणि इंटरनेट चालू पाहिजे । मोबाईल हरवल्या हरवल्या लगेच तुम्ही जर हा उपाय केलात तर तुमचा मोबाईल कुठे आहे ते तुम्हाला लगेच कळेल ।

या व्यतिरिक्त तुमचा मोबाईल सायलेंट मोड वर जरी असेन तरी तो रिंग करण्याचा देखील पर्याय गूगल तुम्हाला देईल तसेच कर तुम्ही तुमच्या मोबाईल मधला महत्वाचा डेटा डिलिट करू इच्छीत असाल तर तुम्ही ते देखील करू शकता । जेणे करून तुमच्या मोबाईल मधील सर्व फोटो आणि माहिती डिलिट होईल आणि त्याचा गैरवापर तुम्ही टाळू शकता ।

व्यक्ती हरवली असल्यास हे उपाय करा

अनेक जण हरवलेली व्यक्ती सापडण्या साठी मंत्र वगैरे शोधत असतात,परंतु हे असले थोतांड करण्यापेक्षा योग्य उपाय केल्यास हरवलेली व्यक्ती लवकर सापडू शकते ।

बरेच लोक पोलीस स्टेशन ला तक्रार देतात परंतु त्या व्यतिरिक्त इतर पर्याय देखील तुम्ही वापरले पाहिजेत जसे की पेपर मध्ये जाहिरात द्या । सोशल मीडिया वर फोटो टाकून त्यांना शोधण्यास मदतीची विनंती करा । सेवा भावी संस्थांशी संपर्क करा त्यांचे चांगले कॉन्टॅक्ट असतात ज्यांचा तुम्हाला हरवलेली व्यक्ती शोधण्यास फायदा होईल ।

फेसबुक व व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडिया वर अनेक ग्रुप असतात त्या ग्रुप्स मध्ये हरवलेली व्यक्तीच्या फोटो सहित माहिती पाठवा ।

ह्या गोष्टी केल्यास तुम्हाला तुमची हरवलेली वस्तु किंवा व्यक्ती सापडण्यास नक्की च मदत होईल । परंतु कोणताही मंत्र वगैरे म्हणून जर हरवलेली वस्तु किंवा माणूस सापडत नाहीत । असले मंत्र वगैरे म्हणत बसाल तर आताच्या ह्या आधुनिक युगात त्याचा काहीच फायदा होणार नाहीये ।

आपल्या ला ही हरवलेली वस्तु / haravleli vastu शोधण्या साठी ची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यां सारख्या इतर माहिती च्या अपडेट साठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top