मोबाईल चे फायदे व तोटे मराठी | मोबाइलच्या अती वापराने बदलले घराचे घरपण

मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote) >> मोबाईल ही आता आपली गरजेची वस्तु बनलेली आहे । पूर्वी जसे म्हंटले जायचे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत,परंतु आता त्यात मोबाईल देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे ।

अगदी कमी कालावधीत ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे स्थान काबीज केले आहे । आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल हा महत्वाचा घटक बनला आहे । मोबाईल नसेल तर आपली अनेक कामे होत नाहीत आणि हल्ली तर मोबाईल शिवाय कामच होत नाही ।

मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)
मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)

कपडे खरेदी, फिरायला जाताना गाडी बुकिंग, नवीन माहिती घेण्यासाठी, डॉक्टर कडे नंबर लावण्यासाठी,पैसे पाठवण्यासाठी किंवा जेवण मागवण्यासाठी आता मोबाइल च लागतो ।

आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या मोबाईल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया ।

मोबाईल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम (mobile che fayde tote in marathi)

मोबाईलचे फायदे व तोटे या लेखाच्या सुरवातीला आपण मोबाइल या उपकरणाचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात त्यानंतर त्याचे तोटे बघूयात. चला तर मग जाणून घेऊयात मोबाईल चे फायदे व तोटे / मोबाईल चे दुष्परिणाम

मोबाईल चे फायदे (mobile che fayde in marathi)

१)हवे त्या व्यक्ती सोबत हवे तेंव्हा आपण बोलू शकतो । जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही फोन द्वारे पोहचू शकता । दिवाळी सारख्या सणांच्या शुभेच्छा आपण आपल्या नातेवाईकांना व आप्तेष्टाना मोबाईल द्वारे देऊ शकता मग ते जगात कुठेही राहायला असुध्या |

२)मोबाईल हे यंत्र वापरण्यास अगदी सोपे असल्याने अगदी लहानांपासून थोरा मोठ्यां पर्यंत सगळेच अगदी सहजतेने वापरू शकतात ।

३) मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधन आहे । तुमच्या आवडीचा चित्रपट, गाणे किंवा भजन कीर्तन पाहिजे तेंव्हा तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ।

४) मोबाईल मध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकता । तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढू शकता ।

५) घरबसल्या कोणतीही खरेदी तुम्ही मोबाईल वरून करू शकता । मग ते कपडे,गाडी,लहान मुलांची खेळणी,बूट-चप्पल असोत किंवा मग हॉटेल मधून जेवण मागवणे असो । यांसारख्या गोष्टी तुम्ही अगदी काही क्लिक वर ऑर्डर करू शकता |

६) दुकानदार तसेच व्यापारी लोकांना त्यांचे दैनंदिन हिशोब वही किंवा खतावणी मध्ये मांडण्या पेक्षा आता मोबाईल मधील काही अॅप्लिकेशन च्या मदतीने आगदी सहजरीत्या करता येऊ शकतो |

७) मोबाईल मधील whatsapp किंवा facebook सारख्या इतर अॅप्लिकेशन च्या मदतीने जगातील कोणत्याही कोपर्‍यातील व्यक्ती सोबत तुम्ही विडियो कॉल द्वारे समोरा बोलू शकता |

मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)
मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)

८) अभ्यासाशी संबंधित माहिती जी समजली नसेल किंवा अजून सखोल माहिती हवी असेल तर ती तुम्हाला मोबाईल वरुन इंटरनेट च्या मदतीने समजून घेता येऊ शकते |

मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)
मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)

९) बँकेचे व्यवहार आता तुम्ही मोबाईल च्या मदतीने काही क्लिक वर करू शकता | तुम्ही मोबाईल च्या मदतीने जगामध्ये कुठेही पैसे पाठवू किंवा स्वीकारू शकता |

१०) बाहेर कुठे फिरायला गेलात तर तुम्ही मोबाईल मधील गूगल मॅप अॅप्लिकेशन द्वारे तुम्हाला कुठून कुठे कसे जायचे तो रस्ता देखील कळतो | तसेच तुम्हाला तुम्ही आता जिथे आहात तिथून जिथे जायचे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी किती कालावधी लागू शकतो कुठे ट्रॅफिक आहे याची देखील माहिती मिळते |

मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)
मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)

यांसारखे अनेक मोबाईल चे फायदे असले तरी देखील ह्या आपल्या आवडीच्या उपकरणाचे तोटे / दुष्परिणाम देखील आहेत ।

मोबाईल चे तोटे / मोबाईल चे दुष्परिणाम (mobile che tote in marathi)

१) मोबाइल च्या अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालला आहे । पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जायच्या त्या कमी होत चालल्या आहेत । हल्ली घरातील आई वडील आणि मुले आपल्या आपल्या मोबाईल मध्ये गुंगलेले पाहायला मिळतात आपापसात बोलणे कमी झाले आहे ।

२) शाळा कॉलेज मधील मुले मोबाईल चा गैरवापर करताना पाहायला मिळते । मुले शाळेत तासाला बसून मोबाईल चा वापर करतात । ह्या मुळे मुलां मध्ये आत्मकेंद्री पणा वाढताना दिसत आहे ।

३) मोबाईल मुळे वेळेचा अपव्यय होतो । सरकारी कर्मचारी म्हणा किंवा खाजगी कर्मचारी हल्ली सगळ्याच लोकांकडे मोबाईल असतो हे लोक कामाच्या ठिकाणी मोबाईल वर टाईमपास करताना पाहायला मिळतात ।अशा कार्यालयात मोबाईल बंदी गरजेची आहे ।

४) वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास अपघात होण्याची शक्यता असते । अनेक लोकांना गाडी लावताना मान वाकडी करून मोबाईल वर बोलण्याची सवय असते अशा सवयी मुळे ही लोक स्वतः बरोबरच समाजातील इतर लोकांच्या होणाऱ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात ।

५) बऱ्याच जणांना मोबाईल चार्जिंग ला लावून बोलण्याची सवय असते काही मोबाईल असे वापरल्यास गरम होऊन त्यांचा विस्फोट होऊ शकतो आणि वापरकर्त्यास मोठी ईजा होऊ शकते । त्यामुळे अशा पद्धतीने मोबाईल वापरणे शक्यतो टाळावे ।

६) हल्ली लहान मुले मुली देखील आई वडिलांचा मोबाईल हाताळताना दिसतात | अनेक लहान मुले अगदी हुशारीने हा मोबाईल हाताळत देखील असतात परंतु अति मोबाईलच्या वापरामुळे मुलांना देखील त्याची सवय लागते | आणि मग अगदीच लहान वयात चश्मा लागणे वगैरे सारख्या गोष्टी होतात |

७) काही वाईट प्रवृत्तीचे लोक या मोबाईल च गैरवापर देखील करू शकतात | अश्लील विडियो काढणे तसेच मोबाईल मध्ये असले विडियो इंटरनेट वर पाहणे | यांसारख्या वाईट गोष्टींचा देखील धोका मोबाईल मुळे असतो |

Mobile che Fayde va Tote in marathi
मोबाईल चे फायदे व तोटे (Mobile che Fayde va Tote)

८) बरेच जन आपली अति गोपनीय माहिती जसे की एटीएम चे पासवर्ड किंवा ऑनलाइन बँकिंग चे पासवर्ड हे मोबाईल मध्ये स्टोर करून ठेवतात | परंतु मोबाईल जर दुसर्‍या कोणाच्या हाती लागला किंवा हरवला आणि नको त्या व्यक्तींच्याच हातात गेला तर त्याचे गंभीर परिणाम मोबाईल धारकाला भोगावे लागतात |

९) मोबाईल ला हेडफोन लाऊन अगदीच जोरात आवाजात जास्त वेळ गाणे ऐकल्याने देखील त्रास होऊ शकतो | तसेच अनेकांना रात्री झोपताना हेडफोन कानात लाऊनच झोपायची देखील सवय असते अशांना कानाचे आजार किंवा ऐकू येण्यावर देखील परिणाम होऊ शकतात.

Mobile che Fayde va Tote in marathi
Mobile che Fayde va Tote in marathi

सारांश – mobile che fayde tote / dushparinam in marathi

मोबाईल हे एक उत्कृष्ट उपकरण असून, मोबाईल चे फायदे व तोटे अभ्यासल्या नंतर मोबाईल आपल्या साठी आहे,आपण मोबाईल साठी नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे | कोणतीही गोष्ट अती केल्यास त्याचे दुष्परिणाम हे असतातच । तसेच मोबाईल चे देखील दुष्परिणाम आहेत त्या पासून वाचण्याचा प्रयत्न करा ।

आपल्याला मोबाईल चे फायदे व तोटे / दुष्परिणाम (mobile che fayde tote / dushparinam in marathi) ही माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा. तसेच तुमच्या काही सूचना असल्यास सांगा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

3 thoughts on “मोबाईल चे फायदे व तोटे मराठी | मोबाइलच्या अती वापराने बदलले घराचे घरपण”

  1. Mobile sai hme dur rehna chiye q ki mobile sai hme our baki Janwar ko Bhai bhout nukasan ho raha hai is ke radiation sai braid Mar Rahi hai mobile sai hmari aakh our chest ko bhi nuksan hota hai our ise chelne sai time bhi kahrab hota hai

Comments are closed.

Scroll to Top