बाळाला दूध कसे पाजावे / balala dudh kase pajave

बाळाला दूध कसे पाजावे / balala dudh kase pajave >> प्रत्येक स्री साठी आई होण्यासारखा आनंद नाही. परंतु ह्या आई होण्याच्या आनंदा सोबतच एका आई समोर आणखी बरीच आव्हाने असतात. त्यातीलच एक आव्हान म्हणजे बाळाला दूध कसे पाजावे.काही काही मातांसाठी तर ही एक मोठी समस्याच होऊन जाते.

अनेकदा प्रसूती नंतर आईला उठून बसताना असह्य वेदना होत असतात मग अशा वेळी बाळाला दूध कसे पाजावे हा त्या माते पुढचा खूप मोठा प्रश्न होऊन बसलेला असतो,मग अशा समयी आई ने घाबरून न जाता आनंदाने व प्रेमाने बाळाला जवळ घ्यावे व दूध पाजावे. नवजात बाळाला आईच्या कुशीतील ऊब ही खूप महत्वाची असते. त्या बाळाला आईच्या कुशीतच सुरक्षित वाटत असते.

नुकतेच जन्मलेले बाळ हे पूर्णतः आईच्या दुधावरच अवलंबून असते. कमीतकमी सुरवातीचे ६ महीने तरी लहान बाळासाठी आईचे दूध हाच पूरक आणि पोषक आहार असतो. त्यामुळेच अनेक नुकत्याच आई झालेल्या महिलांना “बाळाला दूध कसे पाजावे” हा प्रश्न पडलेला असतो त्याचेच उत्तर देण्याचा आमचा हा प्रयत्न.

बाळाला दूध कसे पाजावे / balala dudh kase pajave
बाळाला दूध पाजणे

बाळाला दूध कसे पाजावे – अचूक आणि योग्य मार्ग

१) नवजात बाळाला दूध पाजताना मातेने शक्यतो भिंतीला टेकून बसावे,मांडीवर उशी घ्यावी व त्या उशीवर बाळाला ठेवून दूध पाजावे. आईच्या पाठीचा कणा नेहमी ताठ असावा जेणे करून भविष्यात आईला पाठदुखी सारखे आजार जाणवत नाहीत.

२) बाळाला दूध पाजत असताना आईने नेहमी प्रसन्न मनाने दूध पाजावे,चिडचिड करू नये. असे केल्यास बाळ देखील पोटभरून दूध पिते.

३) नवजात बाळाला सर्व साधारण पणे दर दोन तासांनी आईच्या अंगावरचे दूध पाजावे, आईने साधारण पणे दोन्ही बाजूने सरासरी १० मिनीट दूध पाजावे.

४) दूध पिऊन दोन तासांपेक्षा जास्त वेळ होऊन गेली आणि तरी देखील बाळ झोपलेले असेल तर त्याला झोपेतून उठवून दूध पाजावे.

५)कधी कधी बाळाला भूक लागलेली असते पण तरी देखील ते उठत नाही पण त्याचे ओठ कोरडे पडलेले असतात अशा प्रसंगी त्याला उठवून दूध पाजणे गरजेचे आहे.

६) दूध पाजून झाल्यावर बाळाला थोडावेळ उभे धरावे आणि हलक्या हाताने पाठीवर थोपटावे असे केल्यास बाल ढेकर देते. ढेकर दिल्यावर बाळाचे पोट आता पूर्ण पणे भरले आहे असे समजावे आणि आता बाळ शांत पणे झोपू शकते किंवा खेळू शकते.

अशा प्रकारे व्यवस्थित पणे काळजी घेऊन प्रसन्न मनाने मातेने बाळाला दूध पाजल्यास बाळ सारखे रडत नाही, व आनंदाने खेळते तसेच शांत झोपते देखील.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “बाळाला दूध कसे पाजावे / balala dudh kase pajave”

  1. Pingback: बाळाचा आहार कसा असावा |वयाच्या महिन्यांच्या नुसार आहार- Healthy Diet

Comments are closed.

Scroll to Top