रामायण ने World Record केलेला नाही.

AutoEase™ 2-in-1 Car Seat Hook & Phone Holder (Pack of 2)

रामायण World Record>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर लगेच दूरदर्शन ने नॅशनलवर रामायण या टीव्ही मालिकेचे पुन्हा प्रसारण माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुरू केले होते. प्रसारण सुरू झाल्या नंतर पाहिला भाग पाहताना चा फोटो देखील त्यांनी ट्वीटर वर पोस्ट केला होता.(नंतर तो डिलिट केला तो भाग वेगळा).

 दूरदर्शन ने केलेला दावा :-

अलीकडेच दूरदर्शनने ट्विटरवर हा दावा केला होता की लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम रामायण च्या पुन्हा प्रसारित कार्यक्रमाने जगभरातील सर्वाधिक दर्शकांचा विश्वविक्रम केला आहे. पहिले ट्वीट ३० एप्रिल ला तर दुसरे २ मे ला डीडी नॅशनल ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केले.

या ट्वीट चा मराठी अनुवाद असा होतो “आमच्या सर्व दर्शकांचे आभार! # रामायण – जागतिक नोंद! जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेला मनोरंजन कार्यक्रम. “

या ट्वीट सोबत दूरदर्शन ने एक विडियो सुद्धा पोस्ट केला आहे.त्या विडियो मध्ये दाखवले आहे की रामायण चे सर्वात जास्त 77milion म्हणजे ७.७ कोटी इतके दर्शक 16 एप्रिल या एकाच दिवशी होते आणि हा विश्व विक्रम आहे.  

रामायण World Record
Ramayan World Record

हे ट्वीट आल्यानंतर त्वरित रामायण च्या चाहत्यांनी लोकप्रिय पाश्चात्य कार्यक्रमांच्या दर्शक संख्येशी रामायण ची तुलना केली.

उप राष्ट्रपती नी दर्शवला आनंद :-

भारताच्या उप राष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी देखील ट्वीट करून आपला आनंद दर्शवला .

World Record “रामायण” चा नसल्याचा पुरावा :-

तथापि, हे आतापर्यंत उघड झाले आहे की जगातील सर्वाधिक पाहिलेला मनोरंजन कार्यक्रम हा M*A*S*H हा कॉमेडी शो आहे.  

इंग्लीश वृतापत्र लाइव्हमिंट ने दिलेल्या वृत्तानुसार, 1983 मध्ये प्रसारित झालेल्या M*A*S*H या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीमध्ये हा कार्यक्रम पाहणारे तब्बल 10.6 कोटी प्रेक्षक होते.

Livemint च्या अहवालानुसार, दूरदर्शनने ग्लान्स या वृत्तावर आधारित आपला दावा सांगितला आहे परंतु हा दावा चुकीचा असून M*A*S*H हा कार्यक्रम जगातील सर्वाधिक दर्शक संख्या असलेला कार्यक्रम आहे.

दरम्यान रामायण हे पहिल्यांदा दूरदर्शनवर 1987 मध्ये प्रसारित झाले होते. या मालिके मध्ये अरुण गोविल यांनी राम, दीपिका चिखलिया यांनी सीता, सुनील लाहरी यांनी लक्ष्मणची भूमिका, अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची आणि दारा सिंह यांनी  हनुमाना ची भूमिका साकारलेली आहे.

टीप :-

  • दर्शक संख्ये वरुण रामायण या मालिकेची गुणवत्ता ठरवता येणार नाही.
  • अद्याप तरी M*A*S*H या मालिकेचा हा मनोरंजन क्षेत्रातील दर्शक संख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या कोणत्याही मालिकेला मोडता आलेला नाहीये.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top