योगी च्या राज्यातच “हिंदू खतरें मैं” युपी मध्ये दोन साधूं ची मंदिरात हत्या.उद्धव ठाकरेंनी केला फोन.

साधू हत्या>>उत्तरप्रदेश च्या बुलंद शहरातील पागोना गावाच्या शिव मंदिरात सोमवारी रात्री उशिरा दोन साधूं चा मृतदेह आढळल्याने एकचं खळबळ उडाली आहे.लागलीच पोलिसांनी दोन्ही साधूं च्या पार्थिवाचा पंचनामा केला आहे.तसेच पोलिसानी या प्रकरणातील एका आरोपीला अटक देखील केली आहे.

शेरसिंह सेवादार आणि जगिन दास अशी मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या तलवारीने करण्यात आली आहे.ह्या दोन्ही साधूंचे वय जवळपास 50वर्षे आहे आणि गेल्या 15 वर्ष्या पासून ते मंदिरात राहत होते.सकाळी गावातील काही लोक मंदीरा जवळून जात असताना त्यांना ह्या साधुंचे मृतदेह दिसले.ही माहिती वार्‍यासारखी गावात पसरली व घटनास्थळी मोठा जमाव जमला होता.मंदिर परिसरात साधूंच्या हत्येनंतर लोकांमध्ये रोष निर्माण झाला होता. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.

या पार्श्व भूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना फोन केला होता असे उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून संगितले आहे . तसेच आम्ही ज्या पद्धतीने पालघर मधील आरोपींवर कडक कारवाई केली आहे तशीच कारवाई आपण देखील कराल अशी अपेक्षा व्यक्त केली .

attack on sadhus (साधू की हत्या )
attack on sadhus in UP

murder of sadhus in temple (साधू की हत्या )
attack on sadhus in temple

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील पालघर मध्ये असेच साधू हत्या करण्यात आली होती आणि त्या मुद्यावरून बीजेपी नेत्यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता परंतु नंतर त्या प्रकरणात सुद्धा बीजेपी चे स्थानिक पदाधिकारी सापडल्यावर हा मुद्दा विरोधी पक्ष्याने सोडला होता.परंतु युपी मध्ये तर बीजेपी ची सत्ता आहे व योगी आदित्यनाथ तिथे मुख्यमंत्री आहेत तरी पण तिथे जर अशी साधू हत्या होत असेल तर आता बीजेपी च्या राज्यातच “हिंदू खतरे मैं है”असे म्हणावे लागेल.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top