मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना/विनंती अर्ज कसा लिहायचा/विनंती अर्ज नमुना / vinanti arj in marathi >> विनंती अर्ज हा आपण सहसा एखाद्याला म्हणजेच आपल्या वरिष्ठांना, संस्थेला किंवा बँकेला करत असतो. आपण आपल्या कामा संधर्भात जी काही विनंती असेल ती पूर्ण करण्यासाठी त्या त्या ठिकाणी असणार्या वरिष्ठांना विनंती करतो अनेकदा ही विनंती आपण तोंडी देखील केलेलीच असते.
तुम्ही बँकेत एखादे कर्ज मिळण्यासाठी म्हणा,शाळेची फी कमी करण्याबाबत,नोकरी मध्ये बदली होण्याबाबत किंवा बदली न होण्या बाबत आणि रजा म्हणजेच सुट्टी मिळण्या बाबत अशा विविध प्रकारच्या विनंती करत असताच, पण बहुदा तुम्हाला ही विनंती कागदावर लिहून द्यायची असते किंवा त्यांची तशी अपेक्षा असते. मग अनेकांना बहुदा प्रश्न पडतो की आता हा मराठी विनंती अर्ज कसा लिहावा.
चला तर मग या लेखात आपण जाणून घेऊयात विनंती अर्ज कसा लिहायचा,व सोबतच या लेखाच्या शेवटी तुम्हाला मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना देखील डाऊनलोड करता येईल.
मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना / vinanti arj
विनंती अर्ज पूढील ४ स्टेप वापरुन अगदी सहज पणे तुम्ही विनंती अर्ज लिहू शकता.
विनंती अर्ज नमुना Step 1
अर्ज लेखन करायला सुरवात करण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या व्यक्तिला अर्ज करायचा आहे त्याचे नाव व हुद्दा (पोस्ट) तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुमचे जे काम तुम्हाला अर्ज करून करायचे आहे ते काम ज्या व्यक्तीच्या अखत्यारीत येते त्याच्याच नावे तुम्ही अर्ज केला पाहिजे किंवा त्या व्यक्तीच्या वरिष्ठ हुद्दया वर असणार्या व्यक्तिला तुम्ही अर्ज लिहू शकता.
जसे की जर तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून आहात आणि तुम्हाला सुट्टीचा अर्ज करायचा आहे तर तो तुम्ही प्रिन्सिपल च्या नावानेच केला पाहिजे. किंवा बँकेत एखादे काम करायचे आहे जसे की स्टेटमेंट काढायचे आहे तर तुम्ही जो अर्ज कराल तो अर्ज हा बँक मॅनेजर च्या नावे केला गेला पाहिजे. ग्रामपंचायत मधील अर्ज हा सरपंचाच्या नावे केला जातो.
अर्जाच्या सुरवातीला पानाच्या डाव्या बाजूला वरती तुम्हाला प्रति, लिहून खालच्या ओळीवर त्या व्यक्तीचे नाव टाकायचे आहे आणि त्या नंतर त्याच्या खालच्या ओळीवर त्या व्यक्तीचा म्हणजेच ज्याला तुम्ही अर्ज करत आहात त्यांचा हुद्दा टाकावा. आणि उजव्या कोपर्यात आपण अर्ज ज्या दिवशी हा अर्ज लिहीत आहात त्या दिवशीची तारीख टाकावी. या स्टेप मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीचा हुद्दा लिहणे विसरू नका.
विनंती अर्ज कसा लिहावा – Step 2
या स्टेप मध्ये तुम्हाला तुमची काय विनंती आहे ती विनंती विषय म्हणून लिहायची आहे. आणि त्या खाली अर्जदार म्हणून तुमचे नाव टाकायचे आहे. खालील चित्रामध्ये शाळेच्या फी मध्ये सवलत मिळावी म्हणून नमुना अर्ज लिहून दाखवला आहे.
विनंती अर्ज कसा लिहावा/अर्ज नमुना Step 3
या स्टेप मध्ये तुम्हाला काय विनंती करायची आहे ती विस्तृत स्वरुपात लिहायची आहे. खालील चित्रा मध्ये तुम्हाला शाळेच्या फी मध्ये का सवलत हवी आहे ते विस्तृत स्वरुपात लिहाले आहे.
विनंती अर्ज नमुना Step 4
या स्टेप मध्ये तुम्हाला अर्ज लिहून झाल्यावर खाली तुमचे नाव टाकून सही करायची आहे.
मराठी विनंती अर्ज कसा लिहावा नमुना (Download)/(vinanti arj in marathi format download)
वरील दिलेल्या 4 स्टेप क्रमाने वापरुन तुम्ही कोणताही विनंती अर्ज अगदी सहज लिहू शकता. विनंती अर्ज फॉरमॅट (vinanti arj in marathi format) डाऊनलोड करण्यासाठी खालील “विनंती अर्ज फॉरमॅट” या बटन वर क्लिक करावे.
सारांश – विनंती अर्ज कसा लिहावा
आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)
Techar mafi
विनंती अर्ज कसा लिहावा नमुना क
या सवलतीचा लाभ कसा घ्यावा याविषयी तुमचे तपशीलवार मार्गदर्शक शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
विनंती अर्ज कसा लिहावा नमुना क
विनंती अर्ज कसा लिहावा नमुना क
विनंती अर्ज कसा लिहावा नमुना क
Tc. Arj pdf pahije
Salebabt
विनंती अर्ज कसा लिहावा नमुना क