तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह सर्व माहिती मराठी

तुळशीचे लग्न / तुळशी विवाह व तुळशी मंगलाष्टक सर्व माहिती (tulashi che lagn) >> हिंदू सणा मध्ये सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. वर्षातून एकदा येणारा हा सण बरेच दिवस असतो.अगदी धनत्रयोदशी पासून सुरू होऊन लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबीज होऊन तुळशीचे लग्न होई पर्यंत चालणारा हा सण. याच दिवाळीतील शेवटच्या आणि महत्वाच्या तुळशीच्या लग्ना विषयी माहिती आपण ह्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह व तुळशी मंगलाष्टक सह सर्व माहिती (Tulashi Che Lagn)

दिवाळी ही खर्‍या अर्थाने संपते ती तुळशीचे लग्न झाल्यावर. शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्याला जोडून जाते. दिवाळी सारखे सण, दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी सामान्य माणसाची होणारी धावपळ आणि दगदग यातून आपल्याला आराम तर देतातच पण हे सण मनाला उभारी देखील देऊन जातात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा ,असा संदेश देणार्‍या या सणाची सांगता होते ती तुळशीचे लग्न लाऊन. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया तुळशीचे लग्न व मंगलाष्टक यांची माहिती.

तुळशीच्या लग्ना विषयी प्रसिद्ध अख्यायिका (Tulashi Lagn Story)

कनक नावाचा एक राजा होता. त्या राज्याला नवसाने एक मुलगी झाली होती तिचे नाव किशोरी होते. ज्या वेळेस किशोरी ची पत्रिका राजाने ज्योतिषाला दाखवली, ज्योतिषांनी सांगितले की जो किशोरी सोबत विवाह करेल व शारीरिक संबंध ठेवेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. हे एकूण राजाला धक्काच बसला. हे ऐकल्या पासून राजा दुखी झाला होता,याच दरम्यान राजाला एका ब्राह्मणाने ह्या पासून वाचण्यासाठी एक उपाय सांगितला. तो उपाय असा होता की, किशोरीने दासशाक्षरी विष्णू मंत्राचा जप करावा व तुळशीची पूजा करावी. तसेच कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे वृत्त त्यांनी सांगितले. राजाची मुलगी किशोरीही त्याच प्रमाणे करू लागली.

एकदा एका गंधयाने किशोरी ला पाहिले व तो किशोरी वर मोहित झाला. माळिनीच्या मदतीने त्या गंधयाने स्त्री वेश घेतला व त्या माळिनीबरोबर तो किशोरी कडे आला. माळीन त्या स्री वेशातील गंधयाला घेऊन किशोरी कडे आली व तिने किशोरीला संगितले ही माझी मुलगी आहे व फुलाची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईन. त्या दिवसांनंतर गंधी किशोरीकडे दासी बनून राहू लागला.

याच दरम्यान कांची नगरीतील कांची नामक राजाचा पुत्र मुकुंद हा देखील किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याचा उपासक होता. एक रात्र सूर्याने मुकुंद च्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला व सांगितले, तु किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्यालाच म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल व किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज करून मरून जाईल. सूर्याने किशोरीच्या वडिलांना देखील दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली.

गंधयाला हे सर्व कळले व तो खूप दुखी झाला. त्यांनी ठरवले की किशोरी लग्न मंडपात जाण्याआधी  तिचा सोबत आपल्या प्रेमा बद्दल बोलायचे. त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडाडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली. तिला पाहून गंधयाने तिच्या सोबत बोलण्याआधी तिचा हात धरला व त्याक्षणी गंधयाच्या डोक्यावर वीज कोसळली व त्याचा मृत्यू झाला. नंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी किशोरीचा विवाह संपन्न झाला. ब्राह्मणाने सांगितलेल्या व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले होते.

तुलसी व्रत हे एक काम व्रत आहे. तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लागते .

तुळशीचे लग्न कसे करावे / तुळशी विवाह विधी व माहिती (Tulashi Lagn Information)

तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी जी एकादशीपासून करायचा पूजोत्सव अशी प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते .

तुळशीचे लग्न / तुळशी विवाह
तुळशी विवाह

हिंदू धर्मा मध्ये तुळशीला पाप – नाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही  भारताच्या सर्व प्रांतात व सर्व प्रदेशात उगवणारी वनस्पती आहे. बहुतांश हिंदू कुटुंबीयांच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णू चा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे एक व्रत मांडले गेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.

घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची / तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. त्यावर बोर – चिंच – आवळा – कृष्णदेव – सावळा असे लिहितात. तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालतो.

तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.

तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टके / तुळशीचे लग्न मंगलाष्टक / तुळशीचे विवाह मंगलाष्टक (Tulashi Lagn Mangal Ashtak)

स्वस्ति श्री गणनायक गजमुख ,मोरेश्वरह सिद्धीदं । बलाळो मुरुड विनायकमह चिंतामणी स्थेवर ॥ लेण्याद्री घरी गिरिजात्मक सुरुवरदं ,विघ्नेश्रम ओझरम । ग्रामे रांजन संस्थितम गणपति कुर्यात सदा मंगलम ॥१॥

गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महिंद्रतनया शर्मनवती वेदिका । क्षिप्रा वेदवती महासुर नदी ,ख्याता गया गंडकी | पूर्णा पूर्ण जलै समुद्र सरिता ,कुर्यात सदा मंगलम  ॥२॥

गाव कामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना | सप्त मुखाोविषम हरि शंखोमृतम चांबुधे।रत्नानिह चतुर्दश प्रतिदिनम कुर्यात सदा मंगलम  ॥३॥

राजा भीमक रुखिणिस नयनी, देखोनी चिंता करी। ही कन्या सगुणा वरा नपवरा, कवणासि देईजे॥ आता एक विचार कृष्णा नवरा त्याशी समर्पू म्हणे। रुखमी पुत्र वडील त्यासी पुसणे, कुर्यात सदा मंगलम ॥४॥

लक्ष्मी कौस्तुभ पांचजनय धनु हे अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ॥ दैत्या प्राप्ती सुरा विधू विष हरा.उच्चै श्रवा भास्करा । धनु वैद्य वधू वराशि चवदा , कुर्यात सदा मंगलम .॥५॥

सारांश – तुळशीचे लग्न

आपण जे काही सण साजरे करतो ते का करतात यांसंधर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. यातीलच एक अतिशय आगळा वेगळा असा आपला दरवर्षी न चुकता आपण पार पाडतो तो विधी म्हणजे तुळशीचे लग्न. तर मंडळी या लग्नाचा विधी काय व लग्न कसे लावावे याची सर्व माहिती देणारा हा लेख असून तुम्हाला याची नक्कीच मदत होईल.

तुळशीचे लग्न कसे करावे ? / तुळशीचे लग्न कसे लावतात ?

तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची-गेरु व चुन्याने रंगरंगोटी करतात व तिला छान असे सजवितात. त्यावर बोर – चिंच – आवळा – कृष्णदेव – सावळा असे लिहितात. तुळशी जवळ बोर चिंच आवळा सितापळ कांदयाची पात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून तुळशीचे लग्न लावतात.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top