तिरुपती बालाजी माहिती
सण उत्सव शुभेच्छा

तिरुपती बालाजी ची माहिती | बालाजी दर्शन व मंदिराची सर्व माहिती

तिरुपती बालाजी माहिती | बालाजी मंदिराची सर्व माहिती (tirupati balaji mahiti) >> तिरुपती बालाजी मंदिर दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक स्थळ मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या मंदिरा ला टेम्पल ऑफ सेवेन हिल्स पण म्हटले जाते, तिरुमला नगर १०.३ वर्ग मीटर २६ किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये वसलेले आहे. तिरूमला डोंगर समित डोंगर आहेत त्याला सात फण्यांचा अडिषेश असे पण म्हणतात, . मंदिर शेवटच्या डोंगरावर  वसलेले आहे, या परिसराला सप्तगिरी म्हणतात या डोंगरावर उन्हाळ्यात थंडावा असतो , तिरुपती राजधानी हैदराबाद पासून ४४० किलोमीटर अंतरावर आहे शहरा पासून वीस किलोमीटर असलेल्या डोंगरावर आहे.  बरेच भाविक अनवाणी पण मंदिरापर्यंत चालून जातात एकादशीला लाखो भाविक येतात. 

तिरुपती बालाजी माहिती (tirupati balaji mahiti)

तिरुपतीला भूलोकावर वैकुंठ म्हणून ओळखले जाते, पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान, तिरु म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती तेलुगु, तमिळ भाषेत मला /मलई म्हणजे डोंगर पर्वत बालाजी हे विष्णूचे अवतार मानले जातात ,डोंगरावर कपिलतीर्थ नावाचे सरोवर आहे. श्रद्धालु येथे भरपूर दान करतात आणि हे , मंदिर सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते. बालाजी मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे.

अशा या जगप्रसिद्ध तिरूपती बालाजी देवाची तसेच मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखामध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.चला तर मग जाणून घेऊयात तिरूपती बालाजी देवस्थाना बद्दल माहिती.

 तिरुपती बालाजी माहिती - tirupati balaji mahiti
तिरुपती बालाजी माहिती – tirupati balaji mahiti

तिरुपती बालाजी दर्शन माहिती

तिरूपती बालाजी च्या मंदिरात दर्शनासाठी कायम खूप लोक येत असतात त्यामुळे इथे देवस्थानच्या समिती ने भक्तांच्या दर्शनासाठी उत्तम सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच आपण दर्शनाचे पास ऑनलाइन देखील बूक करू शकता.यासाठी खाली दिलेल्या वेबसाइट वर भेट द्या.

https://tirupatibalaji.ap.gov.in/

तिरूपती बालाजी देवाचा जन्म

१) प्राचीन कथे नुसार  डोंगरावर मोठे वरूड होते .  

२) शेतकऱ्यास आकाशवाणी झाली की वारुळातील मुंग्यांना भरवण्यासाठी आग्या  झाली.

३) तिरूमला च्या स्थानिक राजाने ती आकाशवाणी ऐकली स्वतः वारुळात दूध पुरवू लागला.

४) त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले. 

५) पौराणिक कथेनुसार कलियुग यावेळी भक्तांना आशीर्वाद द्यायला पृथ्वीवर भगवान विष्णू अवतरीत झाले.

तिरूपती बालाजी देवास्थांना विषयी प्रचलित आख्यायिका

१) एकदा भृग ऋषी ह्यांना देवतांमध्ये कोण सर्वात मोठे आहे याबद्दल  मूल्यांकन करण्याची इच्छा झाली.

२) प्राचीन कथे प्रमाणे  एकदा भृग  ऋषी वैकुंठ ला आले तेव्हा त्यांनी शेष शैय्या वर लेटून असलेल्या विष्णु भगवान च्या छातीवर लाथ मारली.

३)  भगवान विष्णू त्यांच्यावर नाराज  ना होता  उलट त्यांना विचारले की तुम्हाला पायाला काही इजा तर नाही झाली.

४)   पण देवी लक्ष्मीला व्यवहार आवडला नाही आणि त्या भगवान विष्णू वर नाराज झाल्या कारण भगवान विष्णूने त्या भृग ऋषीला दंड का नाही दिला म्हणून ,आणि देवी लक्ष्मी नाराज होऊन वैकुंठ सोडून गेल्या.

५) भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला सोडणे सुरू केले.

६) देवीने पृथ्वी वर पद्मावती च्या नावाने जन्म घेतला.                      

७) भगवान विष्णूने पण रूप घेतले आणि पद्मावती जवळ विवाह प्रस्ताव मांडला जे देवीने स्वीकार केला.

८) विवाह करण्यासाठी धन आवश्यक होते, ही समस्या दूर करण्यासाठी भगवान शिव आणि ब्रम्हा ह्यांच्या साक्षीने कुबेर करून कर्ज घेतले.

९) कर्ज घेतल्यावर भगवान विष्णू चे व्यंकटेश रूप आणि देवी लक्ष्मी ची अंश पद्मावती चा विवाह संपन्न झाला.

१०) लग्नानंतर भगवान पत्नी लक्ष्मी सह तिरूमला च्या पर्वतावर राहू लागले.

११) भगवानाने कुबेरला वचन दिले की कर्ज कलियुग ( शेवटचे युग) पर्यंत चुकते करून देतील.

१२) आज मितीला देखील कलयुगच चालू असल्यामुळे देव कर्जात बुडूनच असल्यामुळे या देवाला भक्त दान देतात ज्यामुळे देव कर्जातून मुक्त होतील.

तिरुपती बालाजी माहिती – मंदिर विशेष आकर्षण

१) मंदिरात देवांची मूर्ती सुंदर कपडे आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते.

२) मंदिर मध्ये देवाला सजवण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांचा विशाल भंडार आहे.

३) तिरुपती बालाजी मंदिरा ला भूतलावरील वैकुंठ असे म्हटले जाते म्हणजे पृथ्वीवर विष्णूंनचा निवास.

४) अभिमान आहे की भगवान विष्णुने या कलियुगामध्ये मंदिरात स्वतः प्रकट झाले जेणे करून ते  भक्तांना मोक्ष कडे नेऊ शकतील.

५) तिरूपती च्या मंदिरात वैकुंठ एकादशीला लाखो भक्त येतात.

६) भक्तांची मान्यता आहे की जर इथे केसांचे दान केले तर मनातील सर्व मनोकामना पुर्ण होतात.म्हणून भक्त आपले केस येथे दान करतात.

तिरूपती बालाजी मंदिराची बांधणी सर्व माहिती (tirupati balaji mandir sarv mahiti)

१) मंदिराची शैली दाक्षिणात्य गोपुर शैली वर आधारित आहे.

२) जगातील उंच पातळीवर व्हॅटिकन सिटी ह्या ख्रिस्चन धर्मा नंतर या देवस्थानाचा क्रमांक लागतो.

३) मूर्तीची उंची   मीटर आहे बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक आभूषणांनी भरलेली आहे.

४) पल्लव राणी ने इस. ६१४ मध्ये येथील पहिली वेदी टाकली.  संगम साहित्यात इ स पूर्ण ५०० व इ. स. २०० याच्यात उल्लेख आढळतो. 

५) येथे चोल पल्लव साम्राज्यांनी दिलेल्या योगदानाचे कित्येक पट सापडले आहेत.

६) चोल काळात तिरूपती मंदिराच्या वैभवात वाढ झाली .

७) कृष्णदेवरायाने १५१७ मध्ये गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर देण्यासाठी दान दिले. 

८) मराठा सेनापती राघोजी भोसले यांनी नेहमीसाठी मंदिराच्या देखभालीची व्यवस्था केली.          

९) म्हैसूर आणि गडवल संस्थांनी द्वारे ही पुष्कळ देणग्या मिळाल्या. 

१०) 1933 पर्यंत ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन हाठीरामजी मठाला देण्यात आले. 

११) 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याने तिरुमला तिरुपती देवस्थान समितीची स्थापना केली,  या मंदिराच्या समिती मध्ये सरकारतर्फे एक आयुक्त नेमलेला असतो.  

सारांश – तिरुपती बालाजी माहिती / tirupati balaji mahiti

जीवनात प्रत्येकाने किमान एकदा तरी तिरूपती बालाजी चे दर्शन घेतलेच पाहिजे.अशा या अप्रतिम तिरूपती बालाजी देवस्थानची माहिती देण्याचा आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

आपल्याला ही तिरुपती बालाजी ची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्या कडे अधिक काही माहिती असल्यास अवश्य कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

      

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *