पोट कमी करण्यासाठी व्यायाम व पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

पोट कमी करण्यासाठी व्यायाम | पोटाची चरबी कमी करण्यासाठी योगा / पोट कमी करणे व्यायाम / पोट कमी करण्यासाठी उपाय | pot kami karnyasathi upay >> स्थुलपणा ही सध्या मोठयाप्रमाणात समस्या आपल्याया पाहावयास मिळते. विशेषकरून तरूण पिढीसाठी खुप मोठया प्रमाणात या  त्रासाला सामोरे जात असतांनाचे चित्र आहे. अवेळी जेवण व अपुरी झोप महत्वाचे म्हणजे व्यायाम करत नसल्याने आपल्या शरीराचा आकार खास करून आपले पोट वाढल्याचे दिसते. शरीरात जास्त चरबी असलयाने त्याचा भार आपल्या पोटावर पडतो. परिणामी आपल्याला पोटांच्या व्याधी वाढतांत .

अशा प्रकारच्या विकारांपासून वाचायचे असेल तर पोट कमी करावेच लागेल आणि पोट कमी करण्यासाठी काही गोष्टी व व्यायाम कराव्या लागतील.अशा च काही तुमच्या फायद्याच्या गोष्टी व पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय व पोट कमी करण्यासाठी व्यायाम या लेखामध्ये सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

Table of Contents

पोट कमी करण्यासाठी चा प्रोग्राम

पोट कमी करण्यासाठी किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी या प्रोग्राम ला नक्की जॉइन व्हा. प्रोग्राम ला जॉइन होण्यासाठी खालील “Join Program” या बटन वर क्लिक करा. (FOR SERIOUS People WANTING FASTER RESULTS AND SUPPORT.)

चला तर मग जाणून घेऊया पोट कमी करण्यासाठी उपाय / व्यायाम कोणते कोणते आहेत.

पोट कमी करण्यासाठी व्यायाम / पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय Potachi Charbi / pot kami karanyasathi upay / Gharguti Upay Ani Vyayam

राजीव दिक्षीत यांच्या म्हणण्या नुसार, पोट वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपण जेवण झाल्या झाल्या पाणी पितो. प्राचीन काळापासून आपल्या सांगितले आहे की, “भोजनांते विषम वारी” अर्थात जेवण केल्याने लगेच पाणी पिणे म्हणजे विष पिण्यासारखे आहे. कारण आपण जेव्हा अन्नांचा कण तोंडात घेतो तेव्हा आपल्या पोटात एक अग्नी तयार होते, त्यालाच जठर अग्नी म्हणतात. ती अग्नी आपण केलेले जेवण शरीरात पचवतो, शिवाय त्या जेवणातून रक्त, पित्त चरबी तयार करते, परंतु आपण जेवण केल्यानंतर लगेचच पाणी पिऊन टाकतो, पिरिणामी तो जठर अग्नी शांत होतो व आपल्या पोटांतील अन्न पचत नाही तर सडते व आपल्या विविध प्रकारचे पोटाचे आजार उदभ्वतात.

या लेखामध्ये सुरवातीला आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी योगा / व्यायाम कोणते करता येतील ते बघूयात आणि त्या नंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय बघूयात.

पोट कमी करण्यासाठी व्यायाम / पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम (potachi charbi kami karnyasathi vyayam)

जर आपण लवकर व्यायाम करायला सुरूवात केली तर आपले वजन व पोट नियंत्रणात आणता येऊ शकते.खाली काही व्यायाम दिलेले आहेत ते दैनंदिन केल्यास पोट / पोटाची चरबी कमी करण्याच्या तुम्ही केलेल्या निच्छयाला नक्कीच मदत मिळेल.

योगासन – पोट कमी करण्यासाठी व्यायाम / योगासन गरजेचे आहे

दैनंदिन आयूष्यात योगासन करण्याचे अनेक फायदे आहेत आणि त्यातील एक म्हणजे योगासन केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन हा योगासनाचा प्रकार सर्वोत्तम आहे.

मॉर्निंग वॉक – वजन कमी करण्यासाठी योग्य उपाय

तुम्ही जर वजन कमी करण्याचा निच्छय केला असेल तर तुम्ही पहाटे उठून पायी चालाण्याची सवय स्वतःला लाऊन घ्या. असे केल्याने तुमच्या पोटावर आलेली चरबी कमी होण्यास सुरवात होईल.असे काही नाही की तुम्ही सकाळी उठून पळले पाहिजे नुसते चालण्याने देखील वजन कमी होऊ शकते. परंतु सकाळी उठून साधारण कमीत कमी २ किमी तरी चालले पाहिजे ज्यामुळे तुमचे पोट कमी करण्यास नक्की मदत होईल.

वक्रासन (पोट कमी करण्यासाठी योग्य व्यायाम)

पोट कमी करण्यासाठी व्यायाम - वक्रासन
वक्रासन

हे आसन करण्यासाठी आधी तुम्ही सपाट पृष्टभागावर पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही पायांच्या मध्ये तुमच्या खांद्या एवढे आंतर ठेऊन तुमचे पाय गुडघ्यात वाकवून शरीराच्या जवळ उभे करा आणि तुमचे पोट वरती उचला. हे करत असताना आपले हात हे सरळ रेषेत पृष्ट्भागावरच ठेवा.

कपालभाती व अनुलोंमविलोम (पोट कमी करण्यासाठी व्यायाम)

समस्त शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कपालभाती व अनुलोंमविलोम हा रामबाण उपाय मानला जातो. सतत या पध्दतीने योगा केल्यास आपल्याला ‍चांगले परिणाम दिसायला लागतात.

भुजंगासन – पोत कमी करण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम

भुजंगासन - पोट कमी करण्यासाठी व्यायाम
भुजंगासन

भुजंगासन केल्यामुळे तुमच्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूस ठेवा व त्यानंतर हळूवार श्वास घेत घेत, हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुध्दावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सुरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसण १० ते १२ वेळा करा असे केल्यास पोटावरची चरबी निघून जाण्यास मदत होईल.

उष्ट्रासन

पोट कमी करण्यासाठी व्यायाम - उष्ट्रासन
उष्ट्रासन

उष्ट्रासन करण्यासाठी पायांना लांब करून बसा व डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमचा टाचा मागच्या भागाला टच होईल असे ठेवा. हे करत असताना श्वास सोडत असताना कमरेचा मागच्या भागाला मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला व डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू दया की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसान केल्याने कंबरेचा व पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.

नौकासन – पोट कमी करणे व्यायाम

नौकासन
नौकासन

सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा व श्वास घेत दोन्ही हात व पाय एकाचवेळी जमिनीपासून ३० अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आला पाहिजे. हया स्थितीत थोडा वेळ थांबावे व सावकाश आसन सोडावे. वजन कमी होते व तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता.

शतपावली

जेवणानंतर आपण लागलीच झोपतो व पर्यायी आपल्या शरीरात  अतिरिक्त चरबी तयार होते, पर्यायाने ती चरबी आपल्याला पोटावर दिसते. जेवण केल्यानंतर कमीत कमी आपण शंभर पावले तरी चालले पाहिजे.त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडावेळ का होईना फिरायला जाण्याची सवय लावा.  

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Potachi Charbi Kami Karanyasathi Gharguti Upay)

पोट कमी करण्यासाठी विविध व्यायाम बघितल्या नंतर आता आपण इतर काही पोट कमी करण्याचे उपाय / पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय बघूयात. ज्याप्रमाणे व्यायाम महत्वाचा आहे त्याच प्रमाणे व्यायामा सोबतच इतरही काही गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे, त्या जाणून घेऊयात.

लिंबू – पोट कमी करण्यासाठी उपाय

कोमट पाण्यात लिंबाचा रस व थोडे मिठ मिसळून घ्या. रोज सकाळी या मिश्रणाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॅलिजम चांगले राहाते आणी त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास सुरवात होईल.

जेवणाची वेळ महत्वाची आहे

रात्री उशीरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी किमान २ तास तुमचे जेवण झालेले पाहिजे. जेवल्या नंतर लगेच झोपणे शक्यतो टाळा.

जेवणाची पद्धत

अनेकांना गपागप जेवण करायची सवय असते,जणू काही जेवण करून लगेच कुठे जग जिंकायला जाणार आहेत. तर मित्रांनो तुम्ही जर पोटाची चरबी कमी करण्याचे ठरवले असेल तर कृपया करून सावकाश जेवण करा. घास व्यवस्थित चावा कारण जर तुम्ही सावकाश एनआयटी घास चावून जेवण केले नाही तर त्या अर्धवट चावल्या गेलेल्या अन्नाचे पचन होणार नाही आणि बहुतांश वेळा या मुळे तुमच्या शरीरातील चरबी वाढते.

चहा पिणे टाळा

चहा बंद करा व ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी घ्या.खाली काही ग्रीन टी व कॉफी दिलेल्या आहेत ज्या घेतल्यामुळे तुमचे पोट लवकरात लवकर कमी होण्यास मदत होईल.

ग्रीन टी

Tetley Green Tea Packet, 500g

Organic India Classic Tulsi Green Tea, 100 gm

ग्रीन कॉफी

Sinew Nutrition Green Coffee Beans Powder for Weight Management – 200 g

कोमट पाणी,हळद,लिंबू आणि मध

१ ग्लास कोमट पाणी त्यामध्ये १ चमचा मध, साधारण अर्धा चमचा हळद टाका आणि अर्ध्या लिंबाचा रस. हे चार ही चांगले मिक्स करा व दररोज सकाळी अनुषापोटी घ्या. आणि हे मिश्रण घेतल्या नंतर किमान अर्धा ते एक तास काही खाऊ नका. तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे. याचा रिजल्ट तुम्हाला १ महिन्यात दिसायला लागेल.

पूर्ण झोप घ्या

पुर्ण झोप
पुर्ण झोप

झोपल्याने चरबी वाढते हा समज चुकीचा आहे,जेवण केल्या केल्या लगेच झोपल्याने चरबी वाढत असते. परंतु रोज शरीराला आवश्यक असलेली झोप ही मिळणे गरजेचेच आहे. त्यामुळे पूर्ण झोप घ्या रोज तुमची किमान 7 तास तरी झोप झालीच पाहिजे.

आहारावरील नियंत्रण

पोट / पोटाची चरबी कमी करण्यासाठी समतोल आणि सकस आहार घेतला पाहिजे. सकस आहार म्हणजे काय जाणून घेण्यासाठी आमचा सकस आहार म्हणजे काय हा लेख वाचा.

एकाजागेवर बसून काम करणे टाळा

तुमचे जर एका जागेवर बसूनच काम असेल तर पोटाची चरबी वाढते, त्यामुळे कामाच्या हयातून वेळ मिळाले तेवढे चाला. एकाच जागेवर तासंतास बसने टाळा. शरीराची सतत हालचाल केल्याने तुमचे पोसचर सुधारेल.

तणाव किंवा चिंता करू नका

प्रत्येक माणसाला कोणत्या न कोणत्या गोष्टीचे टेंशन म्हणा किंवा चिंता ही असतेच,कोणीतरी असे म्हंटलेच आहे ना चिंता ही चिते समान असते. तर मित्रांनो हे खरे आहे आणि असे पण तुमच्या विचार करण्याने किंवा सतत त्याच गोष्टीची चिंता केल्याने ती गोष्ट काय बदलणार आहे का मग चिंता करणे सोडा आणि खुश रहा. तणाव मुक्त राहिल्याने तुम्हाला पोत कमी करण्यात नक्कीच फायदा होईल.

सारांश – पोट कमी करण्यासाठी व्यायाम (pot kami karnyasathi upay)

अशा प्रकारे आपण काही पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय  व पोट कमी करण्यासाठी व्यायाम बघितले. हे सर्व तुम्ही अमलात आणून दवाखान्याचे पैसा व वेळ वाचवून आपल्या पोटाची चरबी सहजरित्या कमी करू शकता.

वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत

वजन कमी करण्यासाठी घरगुती तुम्ही विविध प्रकारचे व्यायाम / योगा करू शकता. वजन कमी करण्यासाठी शक्यतो तुम्ही पुढील योगा / व्यायाम प्रकार करावेत :- १) वक्रासन २) कपालभाती ३) अनुलोंमविलोम ४) भुजंगासन ५) उष्ट्रासन ६) नौकासन इ. या व्यायाम प्रकारांसोबतच सकाळचा मॉर्निंग वॉक व संध्याकाळची जेवणा नंतरची शतपावली देखील तुम्ही करावी.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय पुढील प्रमाणे :- १) लिंबु – तुमच्या आहारात लिंबाचा समावेश करा. २) झोप पूर्ण घेणे जरूरी आहे.३) ताण तणाव चिंता करू नका ४) शक्यतो एकाच जागेवर तासंतास बसून काम करणे टाळा ५) लिंबाचा रस,मध, हळद आणि कोमट पाणी यांचे मिश्रण रोज सकाळी अनुषापोटी घ्या. ६) चहा पिणे टाळा ७) ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी घ्या ८) जेवणाची वेळ पाळा ९) जेवताना गपागप खाणे टाळा, सावकाश आणि पूर्ण अन्न चावून खा.


वजन
 कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा

वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय पुढील प्रमाणे :- १) लिंबु – तुमच्या आहारात लिंबाचा समावेश करा. २) झोप पूर्ण घेणे जरूरी आहे.३) ताण तणाव चिंता करू नका ४) शक्यतो एकाच जागेवर तासंतास बसून काम करणे टाळा ५) लिंबाचा रस,मध, हळद आणि कोमट पाणी यांचे मिश्रण रोज सकाळी अनुषापोटी घ्या. ६) चहा पिणे टाळा ७) ग्रीन टी किंवा ग्रीन कॉफी घ्या ८) जेवणाची वेळ पाळा ९) जेवताना गपागप खाणे टाळा, सावकाश आणि पूर्ण अन्न चावून खा.

आपल्याला ही पोट कमी करण्यासाठी व्यायाम / योगासने ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

1 thought on “पोट कमी करण्यासाठी व्यायाम व पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय”

Comments are closed.

Scroll to Top