थालीपीठ कसे बनवायचे
रेसिपी

थालीपीठ कसे बनवायचे । थालीपीठ रेसिपी साहित्य आणि डिटेल माहिती

ऑनलाइन जाहिरात

थालीपीठ कसे बनवायचे | थालीपीठ रेसिपी संपूर्ण माहिती | thalipeeth recipe in marathi >> महाराष्ट्रीयन स्पेशिअलिटी पदार्थ म्हंटले की आपल्याला जे पदार्थ आठवतात त्यांपैकी एक म्हणजेच थालीपीठ. थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन अन्नपदार्थ असून तो पौष्टिक देखील आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा थालीपीठ हा आवडीचा अन्न पदार्थ आहे.आणि हल्ली तर बरेच नॉन महाराष्ट्रीयन लोक देखील थालीपीठ चवीने खातात. ग्रामीण भागात थालीपीठाला धपाटे असे देखील म्हंटले जाते.

थालीपीठ दोन प्रकारचे असते,एक म्हणजे भाजणी पासून बनवलेले थालीपीठ आणि दुसरे म्हणजे इन्स्टंट डायरेक्ट घरातील पीठांचे थालीपीठ.
यातील इन्स्टंट बनवण्यात येणारे थालीपीठ कसे बनवायचे याची माहिती आपण आज बघणार आहोत .

चला तर मग आपण जाणून घेऊया हे सर्वांच्या आवडीचे थालीपीठ कसे बनवायचे, त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि ते बनवण्याची प्रक्रिया काय आहे.

थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

थालीपीठ बनवण्यासाठी ठराविक असे काही साहित्य नसून आम्ही आपल्याला जे साहित्य खाली देत आहोत यांपैकी आपल्या स्वयंपाक घरात जे उपलब्ध आहे ते वापरू शकता.

साहित्य :- गव्हाचे, ज्वारीचे व बाजरीचे असे प्रत्येकी १ वाटी पीठ,१ वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ,साधारण १ चमचा धना पावडर,१ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट(आपल्याला त्याप्रमाणात तिखट हवे आहे तेवढे घ्यावे),१ चमचा मीठ त्यानंतर साधारण २ वाटी भरून बारीक चिरलेला कांदा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी . या व्यतिरिक्त तुम्ही ह्या मध्ये पालक वगैरे सारख्या पाले भाज्या देखील बारीक करून घालू शकता.

थालीपीठ कसे बनवायचे संपूर्ण कृती :-

थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम वरील प्रमाणे सर्व प्रकारचे पीठ एका भांड्या मध्ये एकत्र करून घ्या. त्यानंतर त्या एकत्रित केलेल्या पीठा मध्ये बारीक चिरलेला कांदा ,धना पावडर,हळद,लाल तिखट व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या.त्यानंतर अंदाजाने पाणी घालून हे मिश्रण मळून घ्या .जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही असे मध्यम स्वरूपात हे मळून घ्या.त्यानंतर चांगले स्वच्छ असे सुती कापड धुवून पिळून घ्या,आणि पोळ पाटावर उलगडून पसरवून ठेवा.

तुमचा हात ओला करून त्या मळलेल्या पिठातील एक गोळा करून घ्या तो गोळा त्या कापडावर ठेवून तुमच्या बोटांनी दाब देऊन तो हळू हळू कापडावर पसरवा.मधून अधून हात पाण्यात ओला करून घ्यावा जेणे करून थापलेले थालीपीठ देखील थोडे ओलसर राहते.

थालीपीठ कसे बनवायचे 1
थालीपीठ कसे बनवायचे 1
थालीपीठ कसे बनवायचे 2
थालीपीठ कसे बनवायचे 2
थालीपीठ कसे बनवायचे 3
थालीपीठ कसे बनवायचे 3

थालीपीठ थापताना सर्व साधारण पणे गोल आकार द्यावा आणि त्या थापलेल्या थालीपीठावर तुमच्या बोटांनी ठराविक अंतर ठेवून ४-५ छिद्रे करा.गॅस वर मंद आचेवर तवा गरम करायला ठेवा,तवा तापल्या नंतर त्यावर थोडेसे तेल सोडा आणि ते संपूर्ण तव्यावर पसरवा. त्यानंतर थापलेले थालीपीठ कापडासहित उचलून तव्यावर पलटी करा आणि अलगद पणे कापड काढून घ्या.

थालीपीठ थापताना तुम्ही त्यावर जे छिद्र केले होते त्या छिद्रांमध्ये तेल सोडा.साधारण २ मिनिटे खरपूस असे भाजून घ्यावे आणि मग उलथण्याच्या साहाय्याने ते पलटून तव्यावर टाकावे आता थालीपीठाची दुसरी बाजू देखील साधारण २ मिनिटे खरपूस अशी भाजून घ्यावी. झाले तर मग तुमचे चविष्ट आणि खरपूस असे थालीपीठ तयार.

असे हे पौष्टिक थालीपीठ तुम्ही तूप लावून लोणचे आणि धया सोबत सर्व्ह करू शकता.

ही थालीपीठ रेसिपी (thalipeeth recipe in marathi) ची माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Shruti Pawar
She is an Electronics Engineer having M.E. In Electronics & Telecommunication. She is a web & android developer, social media influencer and core programmer who love to write code, apart from this he loves to write recipe article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *