चहा मशीन
माहिती

चहा मशीन | टी मशीन |ऑटोमॅटिक चहा बनवायचे मशीन किंमत व संपूर्ण माहिती

चहा मशीन | टी मशीन | चहा बनवायची मशीन | chaha machine price >> चहा हा सर्वांचा आवडीचा असतो ज्या मुळे आलेला थकवा दूर होतो. ऑफिस सारख्या ठिकाणी तर ठराविक वेळे नंतर चहा हा गरजेचाच असतो. कामामध्ये सातत्य टिकवून ठेवण्या साठी व लोकांना आपल्या कामावर लक्ष टिकवून ठेवण्यासाठी अनेक ऑफिस मध्ये चहा मशीन ह्या बसवलेल्या असतात किंवा अनेक जण आपल्या ऑफिस मध्ये अशा प्रकारचे मशीन बसवण्यास इच्छुक असतात.

आम्ही आपल्यासाठी अशाच काही चहा मशीन बद्दल माहिती ह्या लेखात देत आहोत. चहा वेंडिंग मशीन कोणती घ्यावी ? कोणती चहा वेंडिंग मशीन उत्तम आहे. वेंडिंग मशीन ची किंमत किती आहे. अशा प्रकारची संपूर्ण माहिती ह्या लेखात आपल्याला मिळेल.

चहा मशीन | बेस्ट टॉप 9 चहा वेंडिंग मशीन ( Best Top 9 Tea Vending Machine)

Morphy Richards 1.5-Litre (1850+350) Watt Tea Maker – ₹ 3,000

या टी मेकर ची टिकाऊ स्टेनलेस स्टील बॉडी असून या उत्पादनावर 2 वर्षे वॉरंटी आहे. याला २३० वोल्ट वोल्टेज लागते. याच्या सोबत तुम्हाला सूचना पुस्तिका,ग्राहक सेवा यादी व वॉरंटी कार्ड मिळेल. हे मशीन बनवणार्‍या कंपनी चा कस्टमर केयर नंबर : 18001035963.   

Cafe Desire Coffee and Tea Vending Machine – ₹ 15,900

हे चहा मशीन बर्‍याच ऑफिस च्या वापरकर्त्यांसाठी अनुकूल असून प्रथम दर्शनी हे दिसायला देखील उत्कृष्ट मशीन आहे. या मशीनचे विक्रेते मशीन च्या सर्विस विषयी ची ऑनलाइन सेवा फ्री मध्ये देतात.

जर आपल्याला काही कालावधी नंतर या मशीन च कोणता एखादा भाग बदली करावयाचा असेल तर कंपनी तो कुरिअरद्वारे पाठवते. त्याच बरोबर जर आपल्याला ऑफलाइन सेवा हवी असेल तर त्यासाठी येण्याजाण्याचा खर्च म्हणून कंपनी Rs 2500/- चार्ज आकारते.      

COFTEA Tea and Coffee Vending Machine – ₹ 14,000

स्टील आणि प्लॅस्टिक पासून बनवलेली ही चहा मशीन घरच्या आणि ऑफिस च्या वापरा साठी चांगला पर्याय असू शकते. या मशीन चे आकारमान साधारण १.५ फूट असून ही वेंडिंग मशीन ग्रे आणि ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध आहे.

ATLANTIS 2 Lane Tea and Coffee Vending Machine – ₹ 12,500

२ लेन असलेले हे एक चांगले वेंडिंग मशीन आहे. कमी किंमतीत २ लेन चे मशीन ह्या सारखे कदाचित च दुसरे असेल. या चहा मशीन ची मेटल बॉडी असून ही एक टिकाऊ मशीन आहे

या टी वेंडिंग मशीन ची खासियत म्हणजे चुंबकीय सीलिंग दरवाजा आणि हलके वजन. त्याच बरोबर या मशीन मध्ये पाण्याची पातळी मोजण्यासाठी सेन्सर दिलेला आहे. ह्या टी मशीन चा कप ठेवण्याचा काऊंटर हा मायक्रोप्रोसेसर द्वारा कंट्रोल केलेला आहे.

पाण्यासाठी स्टेनलेस स्टील चा टॅंक देण्यात आलेला आहे व या वेंडिंग मशीन मध्ये दूध व प्रीमिक्स पाऊडर चे प्रमाण अॅडजस्ट करता येते. टी वेंडिंग मशीन च्या कॅटेगरी मध्ये एव्हड्या किंमतीत हे एक चांगले उत्पादन आहे.

California Metal Vending Machine (2 Option) – ₹ 15,500

दोन पर्याय असलेले हे काळ्या रंगातील टी मशीन तुम्ही ऑफिस साठी वापरू शकता. या वेंडिंग मशीन सोबत तुम्हाला १ वर्षाची वॉरंटी मिळते.

Brewer Mate Coffee and Tea Vending Machine – ₹ 18,500

टी वेंडिंग मशीन कॅटेगरी मध्ये हे एक उत्कृष्ट उत्पादन म्हणता येईल. काळ्या रंगातील हे मशीन असून एबीएस प्लॅस्टिक पासून बनवलेले हे टी मशीन आहे.

२२० वोल्टेज वर हे काम करते व या मशीन ची साइज २५ सेमी x ३२ सेमी x ६० सेमी इतकी आहे. हे मशीन सर्व साधारण पणे एका मिनिटाला ८ कप चहा वितरण करू शकते. हे मशीन वापरताना नेहमी फिल्टर केलेलं पाणी वापरावे.

California Metal Vending Machine with (3 Option) – ₹ 19,000

तीन पर्याय असलेले हे टी वेंडिंग मशीन आकाराने लहान असून वजनाने देखील हलके आहे. या मशीन मध्ये तुम्ही प्रीमिक्स आणि पाण्याचे प्रमाण अॅडजस्ट करू शकता. एका मिनिटात ५ ते ६ कप चहा वितरण करण्याची या मशीन ची क्षमता आहे.  

Cafe DESIRE I DRINK SUCCESS Coffee & Tea Vending Machine – 4 Lane – ₹ 24,600

४ लेन असलेले हे एक उत्कृष्ट चहा मशीन असून या मशीन सोबत तुम्हाला १ किलो प्रीमिक्स पाऊडर देखील मिळते. वापरण्यास सोपे व या कंपनी तर्फे हे वेंडिंग मशीन सर्वात विश्वासार्ह उत्पादन आहे.

तुम्हाला या मशीन च्या इंस्टॉलेशन आणि सर्विस साठी ऑनलाइन सपोर्ट कंपनी देते. व जर तुम्हाला ऑफलाइन सपोर्ट हवा असेल तर प्रत्येक भेटी मागे २५०० रुपये कंपनी आकारते. त्याच बरोबर तुम्हाला भविष्यात एखादा स्पेअरपार्ट लागल्यास कंपनी तो कुरिअर द्वारे पाठवते.       

Atlantis (4 Option) Hot Beverage Vending Machine – ₹ 16,500

कमी किंमतीत ४ लेन असलेले हे मशीन या कॅटेगरी मध्ये सर्वात योग्य आहे. या मशीन ला २४ वोल्ट डीसी मोटर असून हे एक पूर्ण प्रोग्राम केलेले व पासवर्ड ने सुरक्षित असे मशीन आहे.

याला चुंबकीय दरवाजे असल्यामुळे झुरळे वगैरे सारखे कीटक आत जात नाहीत. पाण्याच्या पातळीच्या निर्देशासाठी या टी मशीन मध्ये बजर सह फ्लोट वाल्व देण्यात आलेला आहे. हे चहा वेंडिंग मशीन वापरण्यास सोपे आहे. एवढ्या कमी किंमतीत हे एक उत्कृष्ट उत्पादन आहे.     

सारांश – चहा बनवायची मशीन किंमत

तुमच्या वापरा नुसार, तुम्ही वापरणार असणार्‍या लोकांच्या समूहाला धरून कोणती मशीन उपयुक्त आहे ती चहा मशीन वरील 9 बेस्ट चहा वेंडिंग मशीन पैकी तुम्ही निवडू शकता. ह्या सर्व 9 मशीन वापरण्यास उत्कृष्ट असून ह्यांची कंपनी सर्विस देखील चांगली आहे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

One Reply to “चहा मशीन | टी मशीन |ऑटोमॅटिक चहा बनवायचे मशीन किंमत व संपूर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *