शेवया मशीन किंमत | शेवया ची मशीन संपूर्ण माहिती | Price …

शेवया मशीन किंमत | शेवया ची मशीन संपूर्ण माहिती >> पूर्वी गावाकडे (ग्रामीण भागात) शेवया बनवायचे म्हंटले की एकच सोर्‍या लागायचा,परंतु आता काळ बदलला तसा शेवया बनवण्यासाठी वेगवेगळ्या मशीन बाजारात आल्या आहेत.

हल्ली बर्‍याच महिला स्वतः घरात शेवया बनवत नाहीत डायरेक्ट विकत आणतात. तर काही अशा देखील महिला आहेत ज्या आपल्या घरातून शेवया बनवून विकण्याचा व्यवसाय करत आहेत किंवा करू इच्छितात अशा महिलां साठी शेवया बनवायची मशीन एक कळीचा मुद्दा असतो. त्याच बरोबर काहींना आपल्या घरीच खाव्या वाटतील तेंव्हा शेवया बनवण्या साठी मशीन घ्यायचे असेल.

तर आम्ही आपल्यासाठी काही उत्कृष्ट शेवया मशीन ची यादी या लेखात देणार आहोत. शेवया मशीन ची माहिती, शेवया मशीन ची किंमत जाणून घेण्या साठी व तुमच्या साठी कोणती मशीन योग्य आहे ह्या साठी हा लेख पूर्ण वाचा.

शेवया मशीन किंमत व शेवया मशीन ची माहिती (Top 10 Best Shevaya Machine Price & Information)

विविध शेवया मशीन बद्दल माहिती जाणून घेताना सुरवातीला आपण पूर्वीच्या पद्धतीनेच शेवया बनवण्या साठी सोर्‍या बघणार आहोत. लेखाच्या लहान शेवया मशीन किंमत या भागा मध्ये तुम्हाला उत्कृष्ट २ प्रकारचे शेवया बनवण्याचे यंत्र दाखवले आहेत. आणि त्यानंतर शेवया बनवण्याच्या सेमी ऑटोमॅटिक किंवा पूर्णतः ऑटोमॅटिक अशा बेस्ट टॉप ८ प्रकारच्या शेवया मशीन आहेत.

लहान शेवया मशीन / शेवया बनवण्याचे यंत्र

Hatimi’s TRIDEV Branded Pure Brass Sev Sancha Machine with Free 6 Different Jali

शेवया मशीन / शेव मशीन :- चांगल्या गुणवत्तेच्या पितळा पासून बनवलेला हा सोर्‍या असून याच्या सोबत तुम्हाला ६ वेगवेगळ्या आकाराच्या जाळ्या मिळतील ज्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या आकाराच्या शेवया तसेच शेव तसेच चकली बनवू शकता. हे उत्पादन दीर्घकाळा साठी वापरण्यास उत्तम असून टिकाऊ आहे.या शेवया मशीन किंमत ९९९ रुपये असून एवढ्या किंमतीत हे एक चांगले उत्पादन आहे.   

HAPPENWELL Stainless Steel Kitchen Press with 15 Interchangeable Blades

शेवया मशीन / शेव मशीन :- उत्कृष्ट डिजाइन असलेले हे शेवया मशीन घरगुती वापरा साठी उत्तम आहे. चांगल्या प्रकारच्या स्टील पासून बनवलेले असल्यामुळे हे जास्त काळ टिकते.दरवेळेला वापरुन झाल्यावर स्वच्छ धुवून ठेवल्या वर हे जास्त दिवस टिकू शकते. शेवया बनवण्या पेक्षा हे शेव आणि चकली बनवण्यासाठी जास्त उपयुक्त आहे.

शेवया कमी प्रमाणात बनवायच्या असल्यास याचा वापर तुम्ही करू शकता. याच्या सोबत तुम्हाला १५ वेगवेगळ्या आकाराच्या जाळ्या मिळतील ज्यांचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेव, चकल्या व शेवया बनवू शकता.या शेवया मशीन किंमत ५४९ रुपये आहे.

मोठ्या शेवया मशीन (८ सेमी ऑटोमॅटिक व पूर्णतः ऑटोमॅटिक शेवया मशीन किंमत)

MorNon Pasta Machine, Stainless Steel Manual Pasta Maker Roller Machines with Adjustable Thickness Settings

शेवया मशीन / पास्ता मशीन :- दुहेरी कटर असलेले हे शेवया / पास्ता मशीन उच्च दर्जाचे हेवी स्टेनलेस स्टील पासून बनवलेले आहे. हे मशीन टिकाऊ असून वापरण्यास सुलभ आणि स्वच्छ करण्यास सोपी आहे.

या मशीन चा वापर करून तुम्ही २ मिमी पर्यंत जाडीच्या आकाराच्या शेवया बनवू शकता.  

या मशीन ला टेबल टॉप क्लॅम्प असल्यामुळे मशीनची स्थिरता वाढवते. या मशीन ला अडकलेले पीठ काढण्यासाठी क्रॅंक हँडल आहे. हे मशीन हाताने शेवया बनवण्याचे काम सुलभ करते. या शेवया मशीन किंमत १४९९ रुपये असून ह्या कॅटेगरीत असलेल्या इतर मशीन पैकी ही मशीन कमी किंमतीत उपलब्ध आहे.  

SUKHAD Stainless Steel Noodle Maker Machine

या मशीन चे डिजाइन आधीच्या मशीन प्रमाणेच असून हे शेवया मशीन उच्च दर्जाचे स्टील पासून बनवलेले असल्यामुळे गंज पकडत नाही.  या मशीन चा वापर करून तुम्ही २ वेगवेगळ्या जाडीच्या शेवया / नूडल्स बनवू शकतात.

मशीन ची साइज : 8. 1 “x 8. 1” x 5. 5 “

या शेवया मशीन सोबत तुम्हाला १ क्रॅंक हँडल व १ पक्कड मिळते.   हे मशीन हाताने शेवया बनवण्याचे काम सुलभ करते. या शेवया मशीन किंमत १५९१ रुपये आहे.

TRAY Stainless Steel Noodles Cutter Roller, Pasta Maker Machine Noodle Making Machine, Vegetable Noodle Maker Machine Tool (3 in 1) (ColorMulti)

हे शेवया मशीन देखील इतर मशीन प्रमाणे शेवया व पास्ता बांवण्यासाठी उपयुक्त आहे. या मशीन मध्ये देखील दोन आकाराच्या शेवया बनवता येऊ शकतात. हे उत्तम प्रतीच्या स्टील पासून बनवलेले असल्यामुळे गंज विरोधक आहे.

शेवया बनवण्यासाठी हे उत्तम मशीन असून याच्या वर ०.५ मिमी ते ३ मिमी मध्ये ७ प्रकारच्या जाडीच्या शेवया तुम्ही घरबसल्या बनवू शकता.याचा वापर करणे सोपे असून याचा आकार लहान असल्यामुळे हे घरात कुठेही ठेवण्यास सुलभ आहे.

एखदया टेबल वर फिक्स करत्या येण्याजोगे हे मशीन असून, घरगुती वापरा साठी हे एक उत्तम मशीन आहे. या शेवया मशीन किंमत १६५० रुपये इतकी आहे.  

EPS Noodle Pasta Maggi & sevai Automatic Machine

या शेवया मशीन चा वापर करून तुम्ही ६ वेगवेगळ्या जाडीच्या शेवया बनवू शकता. ह्या शेवया मशीन मध्ये सर्व काम ऑटोमॅटिक होत असून तुम्हाला काही करण्याची गरज पडत नाही. या मशीन वर तुम्ही शेवया बरोबरच पास्ता व मोमो देखील बनवू शकता. हे एबीएस प्लॅस्टिक पासून बनलेले मशीन असून २२० वोल्टेज वर हे चालत असल्यामुळे घरगुती वापरा साथी हे एक उत्तम उत्पादन आहे.

याची साइज ३०० x २०० x ३०० (मिमी) असल्यामुळे घरात कुठेही तुम्ही ठेवू शकता.  या मशीन ल १ वर्षाची वॉरंटी असून काही अडचण आल्यास ९०३३०४४३२८ या ग्राहक सेवा केंद्राच्या नंबर वर तुम्ही फोन करून कळवू शकता.

या शेवया मशीन किंमत ७२०० रुपये असून हे पूर्णतः ऑटोमॅटिक आहे.शेवया चे पीठ तयार करण्या पासून शेवया तयार करण्या पर्यंत सर्व काम ह्या मशीन मध्ये ऑटोमॅटिक होते.

KENT Noodle and Pasta Maker 150-Watt (White)

केंट कंपनीची ही शेवया बनवायची मशीन देखील पूर्णतः ऑटोमॅटिक असून,या मशीन मध्ये शेवाया चे पीठ तयार करण्या पासून ते शेवया बनवण्या पर्यंत सर्व काम ऑटोमॅटिक होते. या मशीन मध्ये तुम्ही शेवया सोबतच पास्ता देखील बनवू शकता. वापरण्यास सोपे व साफ करण्यास सुलभ असे हे मशीन आकाराने लहान असल्यामुळे ठेवण्यास देखील जास्त जागा लागत नाही.

या मशीन मध्ये देखील तुम्ही वेगवेगळ्या जाडीच्या शेवया बनवू शकता. या शेवया मशीन किंमत ८९०१ रुपये आहे. केंट या नामांकित कंपनी ची ही मशीन असल्यामुळे अनेक लोक शेवया मशीन घेताना ह्या मशीन ल प्राधान्य देतात.ह्या मशीन वर १ वर्षाची वॉरंटी आहे.

Imperia iPasta Manual Pasta Machine Copper

इंपेरिया कंपनी ची ही इलेक्ट्रिक शेवया मशीन असून वापरण्यास सोपी व आकाराने लहान आहे. इतर मशीन च्या तुलनेत ह्या मशीन चा शेवया बनवण्याचा स्पीड जास्त आहे. शेवया बरोबरच पास्ता बनवण्यासाठी देखील ह्या मशीन चा वापर केला जातो.

शेवया बनवण्याचा वेग, उत्कृष्ट डिजाइन आणि लहान आकार ह्या या मशीन च्या खासियत आहेत. या शेवया मशीन ची किंमत इतर मशीन च्या तुलनेने जास्त आहे. किंमत – ८८५० रुपये.

तात्पर्य

वरील १० शेवया यंत्रा पैकी ८ अंशतः किंवा पूर्णतः ऑटोमॅटिक बेस्ट मशीन पैकी आपल्या वापरा नुसार आपल्याला जी मशीन योग्य आहे ती आपण घेऊ शकता. ह्या सर्व मशीन वापरण्यास सोप्या असून दीर्घ काळ टिकाऊ आहेत.

आपल्याला ही माहिती कशी वाटली व आपण वरील पैकी कोणती मशीन घेतली किंवा घेऊ इच्छिता आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top