घसा खवखवणे घरगुती उपाय >> उन्हाळा झाल्यावर पावसाळा, पावसाळा झाल्यावर हिवाळा आणि हिवळ्या नंतर परत येणारा उन्हाळा या ऋतु बदलाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या शरीराच्या होत असतो, आणि सर्वात आधी बदल जाणवतो तो आपल्या घश्या वर, घसा खवखवणे, घसा दुखणे, सर्दी खोकला व ताप यासारखे आजार होणे सर्वसामान्य आहे.
सर्दी खोकल्या झाल्यावर घसा खवखवण्याचा होणारा त्रास हा खुपच त्रासदायक व वेदना देणारा असतो. घसा खवखवण्यामुळे त्याचा परिणाम आपल्या जेवणावर व पूर्ण दिनक्रमावर होते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कोणत्याही प्रकारचं इफेक्शन होतं तेव्हा आपलं शरीर प्रतिकार शक्तीनुसार त्या वायरस चा प्रतिकार करत असते. परंतु जर तुमची प्रतिकार शक्ती कमी असेल तर काही काळा नंतर त्याचे दुष्परिणाम होताना दिसतात. त्यामुळे वेळीच त्याचावर उपचार करणे गरजेचे आहे.
Table of Contents
घसा खवखवणे घरगुती उपाय व त्यांची अंमलबजावणी
घश्याची खवखव सुरु झाल्यावर तुम्हाला पुढील लक्षणे जाणवू शकतात. घश्याला सूज येणे, घसा दुखणे, कोणताही पदार्थ गिळताना घसा दुखणे किंवा जळजळ होणे, घश्याच्या खवखवीमुळे स्वरयंत्राला सूज येऊन तुमचा आवाज देखील बदलू शकतो, कणकण जाणवणे. जर तुमचाही घसा खवखवत असेल किंवा घसा दुखण्यामुळे तुम्ही हैराण झाला असाल तर पुढील काही उपाय घरच्या घरी कसे करता येतील ते जाणून घ्या.
मीठ गरम पाण्यात टाकून त्याच्या गुळण्या करा (घसा खवखवणे घरगुती उपाय – १)
घसा खवखवू लागल्यास हमखास सांगण्यात येणारा उपाय म्हणजे मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घश्याची खवखव लगेच कमी होते. या गरम पाण्यामुळे घश्याच्या वेदना व सूज दोन्ही कमी होते. कारण या उपायाने बॅक्टेरियांचा नाश होण्यास मदत होते.
गुळण्या करण्यासाठी तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मोठे मीठ घालून त्याने ५ मिनिटे गुळण्या करा व मग चुळ भरा. हा उपाय जर तुम्ही दर दोन ते तीन तासांनी केल्यास घश्याची खवखव होणं थांबेल. व तुम्हाला त्वरित आराम मिळेल.
मध (घसा खवखवणे घरगुती उपाय – २)

घसाच्या कोणत्याही अडचणीवर मध हा एक रामबाण उपाय आहे. प्राचीन काळापासूनच ऋषी मुनी यांनी घसा वरील मधाचे उपाय लिहून ठेवल्याचे आपलयाला आढळते. मध तुम्ही नुसता चहा किंवा कॉफीमध्ये साखरऐवजी टाकून घेऊ शकता किंवा नुसते एक चमचा मध चाखल्याने देखील तुमच्या घश्याची खवखव कमी होईल.
ज्येष्ठमध (घसा खवखवणे घरगुती उपाय – ३)

ज्येष्ठमधाचा वापर अनेक वर्षा पासून घसा खवखवणे व दुखणे यावरील उपाय म्हणून केला जातो. ज्येष्ठमधांच मूळ हे पाण्यात भिजवून घ्यावं या पाण्याने गुळण्या केल्यास तुम्हाला घसा दुखणे व खवखव या त्रासापासून त्वरित आराम मिळेल. गर्भवती महिलांनी व ज्यांच्या लहान बाळाला स्तनपान चालू आहे अशा महिलांनी मात्र हा उपाय करु नये.
मेथी / मेथीच्या बिया (घसा खवखवणे / दुखणे वरील उत्तम उपाय)
सहसा आपण मेथीचा वापर स्वयंपाक घरात भाजी करण्यासाठी करतो, परंतु मेथीचे असे अनेक फायदे आहेत जे आपल्याला माहीत देखील नसतील. अगदी घसा खवखवणे यावरही मेथी गुणकारी आहे.


तुम्ही मेथीचे दाणे किंवा मेथी घातलेलया चहा पिऊ शकता. संशोधनात आढळंल आहे की, मेथी ही घसा दुखीपासून आराम देण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. ही घश्यातील बॅक्टेरियांचा नाश करते व यातील ॲटीफंगल गुणांमुळे सूज व जळजळ कमी होते. पण गर्भवती महिलांनी मात्र याचं सेवण करु नये.कारण मेथी ही उष्ण आहे आणि त्यामुळे त्याचा गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतो.
लसूण (घसा दुखणे थांबवण्यासाठी उत्तम उपाय)
घरगुती उपायांमध्ये लसून पण खूप महत्वाचा आहे. या मध्ये जीवाणुरोधक गुण असतात. लसणा मध्ये ॲलीसीन ऑर्गन सल्फर असते, ज्यामुळे इंफेक्शनची लढण्याची क्षमता मिळते. रिसर्चनुसार, नियमितपणे लसणाचा वापर आपण जेवणात केलयास वायरस किंवा इंफेक्शनमुळे होणार्या सर्दीपासून आपलं संरक्षण होतं.
लसूणचा वापर आपण रोजच्या आहारात केला पाहिजे. तसंच लसूण चा ताजा पाला देखील तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही लसूण तेलात शेकून देखील खाऊ शकता. आहारात लसणाच्या वापराने तुम्हाला घसा खवखवीपासून नक्कीच आराम मिळेल.
नाराळाचं तेल (घसा दुखणे थांबवण्यासाठी उत्तम उपाय)

नारळाच्या तेलात अनेक गुण असतात. त्यामुळे आपल्या दैनदिंन जीवनात अनेक गोष्टीसाठी याचा वापर केला जातो. मग ते जेवण असो वा केसांसाठी असो. ज्यामुळे घश्याची सूज व खवखव कमी होते. त्यामुळे तुम्हाला घश्याची खवखव असलयास नारळाच्या तेलाचा वापर नक्की करा.
घसांची खवखव कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून एक चमचा नारळांच तेल गरम करुन ते एक चमचा सूपमध्ये मिक्स करा. हे तेल तोंडात पूर्णपणे विरघळेपर्यंत तसंच राहू दया मग गिळून टाका. दररोज किमान दोन चमचे नारळाच्या तेलांच सेवन तुम्ही करु शकता.यामुळे तुमचा घसा खवखवणे त्वरित कमी होईल व घश्याला आराम मिळेल.
आले / अद्रक (घसा दुखणे – गुणकारी उपाय)

अनेकदा आपण बाहेरून आल्यावर घसा खवखवणे सुरू होते. हे असे बाहेरील धुळी मुळे किंवा तेलकट खाल्यामुळे होत असते. अशा वेळी तुम्ही आले लहान तुकडा तोंडात दातांखाली थोडावेळ धरल्यास त्वरित आराम जाणवेल. यांखेरीस आपल्याला जर बर्याच दिवसांपासून घसा दुखी किंवा खवखवणे चा त्रास होत असेल तर आपण आल्याचा चहा किंवा हळदीच्या काढयात आले टाकून ते पिल्यास घश्याला आराम मिळतो.
गरम पाण्याची वाफ (घसा दुखी थांबवण्यासाठी उत्तम उपाय)

गरम पाण्याची वाफ घेतल्यास देखील घसा खवखव कमी होते. या प्रकारची वाफ घेण्यासाठी तुम्ही वाफेचे एक लहान मशीन देखील घेऊ शकता किंवा एका लहान पातेल्या मध्ये पाणी गरम करून त्यावर टॉवेल ने तोंड झाकून वाफ घेऊ शकता. असे सलग २ दिवस केल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
मसाला चहा
गवती चहा, लवंग, तुळशीपत्र, आले आणि काळी मिरी यांचं मिश्रण असलेला चहा करून प्यावा. हा चहा शक्यतो गरम असतानाच प्यावा. अशा प्रकारचा चहा सलग २ दिवस पिल्यास आपल्याला घसा खवखवणे किंवा दुखणे या पासून आराम मिळेल.
तात्पर्य
दवाखान्यात गेल्याशिवाय घसाच्या अडचणीसाठी कोणतीही मेडीकल ची गोळी अथवा मेडीकल संदर्भात कोणतेही साहित्य डॉक्टर च्या सल्ला शिवाय घेऊ नये. कारण बाजारात ज्या प्रकारचे मेडीसन उपलब्ध आहे, त्याचा आपल्याला दुरगामी परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
घसा खवखवणे घरगुती उपाय आपण वर पाहिलेच. घसा खवखवण्याचा त्रास हा खूपच वेदनादायक असतो. हा त्रास टाळायचा असलयास आपण कमी खर्चात व कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय घसा बरा करण्यासाठी वरील उपाय आपण करू शकता.
आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.
यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा.
1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) सण (5) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)