पोहा उद्योग | पोहे प्रक्रिया उद्योग (poha manufacturing process)

पोहा उद्योग | पोहे प्रक्रिया उद्योग | पोहा मिल उद्योग (poha manufacturing process / poha manufacturing plant / machine) >> हल्ली कोणत्याही विभागातील माणूस असूद्या प्रत्येकाचा आवडीचा नाश्ता म्हणजे पोहे असतोच. आज ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात पोहयापासून तयार करण्यात येणारी कांदा पोहा ही डिश सर्वजण अगदी आवडीने खातात.लग्न ठरवण्याचा कार्यक्रम असो किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी कांदापोहे ही डीश आज सर्व घरात बनविली जाते. हॉटेल मध्येही कांदे पोहे हे अनेकांचे आवडते खाद्य आहे. पोहे पचण्यास हलके असल्याने अगदी लहानापासून मोठयापर्यंत सर्वजण हया डिशचा आनंदाने आस्वाद घेतात. खूप कमी वेळेत कांदापोहे ही डीश तयार होत असल्याने न्याहारीत यास खूपच मागणी आहे. स्नॅक्स प्रकारात पोहयापासून चिवडा, लाडू इ. सारखे अनेक पदार्थ बनवितात.

असे हे सर्वांच्या आवडीचे असे लोकप्रिय पोहे बनतात कसे असा प्रश्न आपल्यातील सर्वांनाच कधी न कधी पडतोच. तर हे पोहे प्रक्रिया करून बनवलेले असतात आणि पोहे प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण तसेच शहरी तरुण देखील अगदी सहजतेने सुरू करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात पोहा उद्योग विषयी सर्व माहिती.

Table of Contents

पोहा उद्योग | पोहे प्रक्रिया उद्योग | पोहा मिल उद्योग (poha manufacturing process / poha manufacturing plant / poha making machine)

भारतीय अन्नपदार्थात पोहयाला एक महत्वाचे स्थान आहे. साळीपासून पोहयांची निर्मिती केली जाते, हा एक महाराष्ट्र राज्यातील पांरपारीक व्यवसाय असून,पुर्वीच्या काळी ग्रामीण भागातील काही कुटूंबे घरगुती पातळीवर पोहयांची निर्मिती करीत असत. त्यांच्या आजूबाजूचे शेतकरीही सदर कुटूंबाकडे साळ नेउन पोहे तयार करून घेत पण आज चित्र बदलले आहे.

पोहा उद्योग - poha manufacturing raw material - साळ
साळ

धावपळीच्या या यांत्रिक युगात भात पोहा गिरणीवर अथवा पोहा निर्मिती करणाया कुटूंबाकडे नेउन मुरमूरे तयार करून घेण्या इतपत वेळ कुणाकडेच नाही. परिणामी आज सर्वत्र पोहा विकत घेणेच पसंद केले जाते. शहरी भागात तर वेळेअभावी पोहे आणि त्यापासून बनविले जाणारे इतर पदार्थही घेण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. झपाटयाने वाढत चाललेली लोकसंख्या, बदललेली जीवनशैली आणि खाद्यसंस्कृती यांचा विचार करता तसेच उपोरोक्त परिस्थिती लक्षात घेता भविष्यात पोहा निर्मिती आणि विक्री व्यवसायास भरपूर वाव असल्याचे लक्षात येते.

पोहा उद्योग – पोहा निर्मितीच्या पद्धती (Ways of poha manufacturing process)

पोहे निर्मितीच्या प्रामुख्याने २ पद्धती आहे एक म्हणजे पारंपारिक पद्धत व दुसरी आहे ती आधुनिक पद्धत

पोहा निर्मितीची पारंपारिक पद्धत (poha manufacturing old method)

  • चांगली पोसलेली व स्वच्छ केलेली साळ रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे साळीतील पाण्याचे प्रमाण ३० प्रतिशत वाढते.
  • भिजलेल्या साळीतील पाणी काढून टाकून ओली साळ चुलनावर ठेवलेल्या कढईत व गरम केलेल्या वाळूत सतत हलवून १-२ किलोच्या प्रमाणात भाजली जाते.
  • पुढे भाजलेल्या साळीतील वाळू चाळून वेगळी केली जाते.
  • भाजलेली साळ उखळामध्ये टाकून किंवा कडा असलेल्या रनरचा उपयोग करून टरफले काढली जातात तसेच साळीवर दाब पडल्याने पोहे तयार होतात. परंतू या प्रक्रियेत पोह्याचे प्रमाण खुपच कमी म्हणजे घेतलेल्या साळीच्या ६०-६५ प्रतीशत मिळते.

पोहा निर्मितीची आधुनिक पद्धत (poha manufacturing new method)

पारंपरिक पद्धती मध्ये संशोधन करून म्हैसूरच्या सी.एफ.टी. आर. आय. या संस्थेने पोहे निर्मितीची नविन पद्धत शोधली आहे. या पद्धतीने पोहयाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते तसेच खर्चही कमी येतो. सुधारीत पद्धतीमध्ये मीलींग प्रक्रिया आणि पोहे तयार करण्याची पद्धत वेगवेगळी करून, हया पद्धती सलग वापरल्या जातात. त्यामुळे पोहयाचे उत्पादन ७५ प्रतीशत पर्यंत वाढले जाते. या पद्धतीमध्ये साळ गरम पाण्यात भिजविणे, वाळू मध्ये भाजणे, टरफले काढणे, हवेच्या झोतात वेगळी करणे, पॉलीश करणे, चाळणे वाळविणे इ. सर्व क्रिया सलग केल्या जातात.

पोहा उद्योगासाठी उपलब्ध बाजारपेठ (poha manufacturing business market)

बाजारपेठ
बाजारपेठ

कोणताही उद्योग सुरू करताना,तयार केलेली वस्तु विक्रीसाठी बाजारपेठ कोणती अथवा ग्राहकवर्ग कोण आहे हे पहाणे अत्यंत महत्त्वाचे असते. शहरी तसेच ग्रामीण भागात पोहयाचा खप हा मोठया प्रमाणावर होतो.पोहयाचा घरगुती पातळीवर जास्त खप आहे, त्यामुळे किराणा मालाची दुकाने ही पोहा विक्रीची मुख्य ठिकाणे आहेत. लाडु, चिवडा इ. तयार करण्यासाठी पोहयांना हॉटेल्स, बेकरी, मिठाईची दुकाने इ. कडून मागणी असू शकते. शॉपींग मॉल, सुपर मार्केट या ठिकाणी सुद्धा पोहा विक्री चांगल्या प्रमाणात होते. याशिवाय आठवडा बाजार, मार्केट, जत्रा, महोत्सव, प्रदर्शन हया ठिकाणी पोहयाची थोडया फार प्रमाणात विक्री होते.

पोहा उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ (poha manufacturing business – manpower required)

पोहे निर्मिती प्रकल्पा साठी जास्त मनुष्यबळ आवश्यक नाही. आपण जर सुरवातीला छोट्या स्वरुपात हा बिजनेस सुरू केला तर आपण अगदी ३ ते ४ कामगारांवर देखील तुमचा प्रोजेक्ट उत्तम रित्या चालवू शकता.साधारण पणे एक कुशल कामगार आणि एक किंवा दोन अकुशल कामगार मदतनीस म्हणून व एक विक्रेता असे एकूण ४ कामगार देखील हा पोहे निर्मितीचा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने सुरू ठेऊ शकतात. महिला देखील या व्यवसाय उत्तमरीत्या करू शकतात. 

पोहा उद्योगासाठी आवश्यक कच्चामाल (poha manufacturing business raw material)

पोहा निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून साळ वापरावी.साळ खरेदी करताना चांगली पोसलेली व स्वच्छ केलेली साळ निवडावी.साळ चांगली वाळलेली असावी. शिवाय ती चांगल्या पद्धतीने साठविलेली असावी.साळीवर जास्त प्रमाणात रसायनाचा वापर केलेला नसावा.

पोहा व्यवसायाची जागा आणि इमारत (poha manufacturing plant location & building)

उदयोगासाठी जागेची निवड करताना त्याठिकाणी वाहतूक, पाणी, वीज इत्यादी ची उपलब्धता असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याच बरोबर जागेची निवड करताना जेथे कच्चा माल सहज आणि मोठया प्रमाणात उपलब्ध होईल आणि शिल्लक राहणा-या टाकावू मालाचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होईल अशा ठिकाणी करावी.

पोहे निर्मिती प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी किमान १००० स्के. फुट जागेची आवश्यकता असते. इमारत बांधकामाचे नियोजन करताना स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही बाजूंचा विचार करावा. ज्यामुळे भविष्यात गुणवत्तापुर्ण आणि आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती करणे शक्य होईल.

पोहा उद्योग आवश्यक मशिनरी (poha manufacturing machines)

मशिनरी खरेदी करताना आपल्याला हा प्रक्रिया उद्योग छोट्या स्वरुपात सुरू करायचा आहे की मोठ्या स्वरुपात हे ठरवणे गरजेचे आहे आणि मग त्या नुसार आवश्यक मशिनरी घ्यावी.छोट्या स्वरुपात व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारण पणे रोस्टर,भट्टी,वजन काटा, पोहयाचे यंत्र,चाळण्या यांसारख्या साहित्याची गरज पडते. तर आपल्याला जर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर ग्रेडर,रोस्टर,डीस्टोनर,फ्लेकर मिल,पोहा मिल,ग्रेडिंग मशीन,पॅकेजिंग मशीन यांसारख्या मशिनरींची आवश्यकता असते.

पोहा उद्योग व मुरमुरे उद्योग आवश्यक मशिनरी (poha & murmure manufacturing machines)
पोहा व मुरमुरे उद्योग मशिनरी (poha & murmure manufacturing machines)

पोहा उद्योग Ebook (poha manufacturing Ebook)

वरील माहिती ही पोहा उद्योगाची आपल्याला ओळख करून देण्यापर्यंत योग्य आहे. परंतु आपल्याला जर या पोहा उद्योगा विषयी अधिक विस्तृत स्वरुपात माहिती हवी असेल जसे की मशिनरी खरेदी कुठून करावी,पोहा उद्योग संपूर्ण अर्थकारण, पोहा उद्योगासाठी कर्ज व सबसिडी घेण्यासाठी शासकीय योजना कोणत्या आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आमचे पोहा व मुरमुरे प्रक्रिया उद्योग हे Ebook डाऊनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. Ebook डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “पोहा – Ebook” बटन वर क्लिक करा.

poha/murmure manufacturing process

सारांश – पोहा प्रक्रिया उद्योग

पोहा उद्योगा विषयी माहिती आपल्याला देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न या लेखा मध्ये करण्यात आलेला आहे. आपल्याला जर पोहा निर्मिती उद्योग करायचा असेल व अधिक माहिती हवी असल्यास आपण वर दिलेले Ebook डाऊनलोड करू शकता.हा उद्योग सुरू करण्यापूर्वी पोहा उद्योग सुरू असलेल्या प्लांट ला आपण एकदा अवश्य भेट द्यावी.तुम्हाला तुमच्या भावी उद्योगासाठी शुभेच्छा.


पोहे निर्मिती उद्योग कसा सुरू करावा ?

पोहे निर्मिती उद्योग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हा व्यवसाय कसा चालतो या बद्दल सर्व माहिती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही आधी पोहे निर्मिती करणार्‍या प्लांट ला भेट द्यावी तसेच वरील लेखामध्ये दिलेल्या कच्चा माल व मशीनरी बद्दल सर्व माहिती करून घ्यावी. त्यासाठी तुम्ही आमचे पोहा व मुरमुरे प्रक्रिया उद्योग eBook वाचा त्याने तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यास नक्कीच मदत होईल.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top