पाठांतर कसे करावे / पाठांतर कसे लक्षात ठेवावे
शिक्षण

पाठांतर कसे करावे / पाठांतर कसे लक्षात ठेवावे – सर्व माहिती

पाठांतर कसे करावे / पाठांतर कसे लक्षात ठेवावे (pathantar kase karave)>> एखाद्या विषयाचा अभ्यास करताना काही उत्तरांचे पाठांतर करणे किती महत्वाचे असते हे विद्यार्थी दशेमध्ये आपण सर्वच जण अनुभवतो.मात्र काही जणांच्या बाबतीत पाठांतर करणे ही फारच मोठी अडचण असते.अशा सर्वांसाठी पाठांतर सोपे करण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ रीचर्ड फेनमन यांनी एक उत्कृष्ट पर्याय दिला आहे,त्यांनी सांगितले की एखादा विषय हा तुम्ही मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केलात म्हणजे त्या टॉपिक मधील कन्सेप्ट तुम्ही समजून घेतलीत की तो टॉपिक समजण्यास आणि ती माहिती दीर्घ काळ लक्षात राहण्यास ही मदत होते.

पाठांतर करताना खलील ९ गोष्टीं महत्वाच्या आहेत

उत्तराचे पाठांतर करण्या पूर्वीचे वाचन

पाठांतर करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रथम ज्या धड्या वरील प्रश्नांचे उत्तर तुम्ही पाठांतर करणार आहात,तो धडा आधी पूर्ण वाचून घ्यावा,समजून घ्यावा.आणि त्या नंतर प्रश्नांची उत्तरे पाठांतराला सुरवात करावी.ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही पाठ करत आहात ते साधारण ३ ते ४ वेळा वाचावे.असे केल्याने ते उत्तर पाठ च झालेले असते.

पाठांतर कसे करावे – वाचलेले आठवण्याचा प्रयत्न करा

आता तुम्ही हे ४ वेळा वाचलेले,पुस्तक बंद करून आठवण्याचा प्रयत्न करावा किंवा सरळ वहिवर लिहून काढावे.वाहिवर लिहल्यास तुमचे केलेलं पाठांतर कायम स्वरूपी लक्षात राहील आणि त्याच बरोबर तुमच्या नोट्स देखील तयार होतील.

टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करा

वर दिल्या प्रमाणे पाठांतर करण्यापेक्षा तुम्ही क्लास मध्येच तो विषय व्यवस्थित समजून घ्या किंवा घरी अभ्यास करताना तो टॉपिक पूर्ण पणे समजून घ्या जेणे करून तुम्हाला ती पाठांतर करायची आवश्यकता भासणार नाही.कारण पाठांतर जर केले तर अनेक वेळेस तुम्हाला पहिल्या २ ओळी आठवतात मधले काय ते आठवत नाही आणि शेवटचे आठवते, असा गोंधळ उडतो.हा होणारा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही तो टॉपिक समजून घेण्यावर भर दिला पाहिजे.

पाठांतर कसे करावे – यासाठी अभ्यासातील उत्सुकता महत्वाची

अभ्यासात मन लागण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे उत्सुकता,करण जर अभ्यासाला बसण्याची तुमची इच्छा च होत नसेल तर कोणताही उपाय करून के फायदा होणार नाही. म्हणून सर्वात आधी तुम्हाला मन ताजेतवाने ठेवायला आले पाहिजे,आणि अभ्यास केल्यावर काय होणार आहे याचा positive विचार केला पाहिजे.आणि शक्यतो अभ्यासाला / पाठांतर करायला बसताना तुमचे मन आणि शरीर दोन्ही ही फ्रेश असले पाहिजे.तुम्ही अभ्यासाला बसत ती जागा स्वच्छ ठेवा आणि बसतानाच टेबल व खुर्ची घेऊन बसा जेणे करून तुम्हाला आळस येणार नाही आणि केलेला अभ्यास लक्षात देखील राहील.

अभ्यासातील नियमितता

सुरवातीला तुमचे पाठांतर कमी होईल,पण एकदा का त्याची सवय लागली की तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठांतर करू शकाल.कोणतीही गोष्ट तुम्ही नियमित पणे केलीत तर काही दिवसांनी तुम्हाला त्याची सवय होते,आणि तुम्ही त्या गोष्टीत पारंगत होतात.तसेच पाठांतराचे आहे,फक्त देर आहे ती तुम्ही सुरवात करण्याची.

परत परत वाचणे

एखादा टॉपिक जर समजत नसेल तर तो पुन्हा पुन्हा वाचून काढा,त्यातील बारकावे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि एकाग्रतेने वाचन करा.वाचताना तुमचे पूर्ण लक्ष हे टॉपिक समजून घेण्याकडे असले पाहिजे.जेणे करून तुम्हाला तो टॉपिक उत्तमरीत्या समजेल आणि तुम्ही तो चांगल्या पद्धतीने परीक्षेत लिहू शकाल.

पाठांतर केलेले लिहून काढणे

जर एखादा टॉपिक परत परत वाचून देखील तुम्हाला शंका असेल की तुम्हाला परीक्षेत ते व्यवस्थित लिहता येईल का नाही,तर तुम्ही वाचन केलेले लिहून काढन्याचा सराव करावा.लिहून काढल्याने तुमच्या अगदी लक्षात येईल की तुंही कुठे चुकताय आणि तुम्हाला कुठे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.तसेच त्या विषयाच्या तुमच्या हाताने लिहलेल्या नोट्स देखील तयार होतील ज्या तुम्ही परीक्षेच्या आधी वाचू शकता.

पाठांतर कसे करावे हे समजण्यासाठी अभ्यासात एकाग्रता पाहिजे

पाठांतर कसे करावे - एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान देखील करू शकता
पाठांतर कसे करावे – एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान देखील करू शकता

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या मनाची एकाग्रता.कोणतीही गोष्ट पूर्ण एकाग्रतेने केल्यास त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळतात.चांगल्या पद्धतीने अभ्यास किंवा पाठांतर करण्यासाठी तुम्हाला मन शांत ठेवून एकाग्रतेने वाचन करणे गरजेचे आहे.मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही ध्यान आणि योगा यांसारख्या गोष्टी देखील करू शकता.अभ्यासाला बसण्या पूर्वी साधारण १० मिनिटे कोणताही विचार डोक्यात येऊ देऊ नका आणि डोळे बंद करून शांत ध्यान करा मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.आणि शांतपणे श्वास आत घ्या आणि हळू हळू बाहेर सोडा असे करत असताना तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.अभ्यासा आधी १० मिनिटे हे केल्याने तुम्हाला पाठांतर करताना मॅन एकाग्र ठेवण्यास मदत होईल.

प्रेरणा

प्रेरणा

अभ्यास असो वा इतर कोणतेही कार्य,त्याला उत्कृष्ट पद्धतीने करायचे असेल तर तुम्हाला कोणाची ना कोणाची प्रेरणा असावी लागते.आणि एकदा का तुम्ही सेल्फ मोटिव्हेट झालात की मग पाठांतर कसे करावे हे तुम्हाला सांगण्याची गरज देखील नाही.तुम्हाला तुमच्या मनातून प्रेरणा मिळाली पाहिजे आणि तुम्ही एखादे स्वप्न बघू शकता.जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उत्तम अभ्यास करावा लागेल.

सारांश – पाठांतर कसे करावे ( pathantar kase karave )

वरील ९ गोष्टींची अंमलबजावणी तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात केल्यास तुम्हाला पाठांतर कसे करावे किंवा केलेले पाठांतर लक्षात कसे ठेवावे याचे अचूक उत्तर मिळेल.

आपल्याला अर्ज कसा लिहावा ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

One Reply to “पाठांतर कसे करावे / पाठांतर कसे लक्षात ठेवावे – सर्व माहिती

  1. Thank you तुम्ही खूप छान लेख लिहिलात तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *