पैसे टिकून राहण्यासाठी उपाय कोणते केले पाहिजेत

पैसे टिकून राहण्यासाठी उपाय / घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय / हातात पैसे टिकत नाहीत >> ‘’आमदनी अठठनी खर्चा रूपया’’ अशी अवस्था आज आधुनिक काळात मानवाची झाली आहे. अमर्यादित गरज आणि मर्यादित साधने यांची जुळवा जुळव करताना मानव कुठेतरी अपयशी होताना दिसत आहे. घरात पैसे टिकून राहत नाही ही सर्वसामान्य माणसाची खूप मोठी समस्या बनली आहे.पैसा ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात सध्या जास्तच मान दिला जातो. उच्च – निच असा भेदभाव करणे तसे चुकीचेच पण तरी देखील अशा पैश्या वाल्या लोकांना उच्च समजले जाते.

पैसे टिकून राहण्यासाठी उपाय / घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय व त्यांची अंमलबजावणी

         पैसे कमवण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो. खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकावा. घरात तिजोरी ठेवण्याची जागा फार महत्वाची आहे. तुम्ही कोणत्या जागी तिजोरी ठेवता यावर फार काही निर्भर आहे. तिजोरी योग्य जागी ठेवल्यास धनाची वाढ होऊ शकते. घराच्या उत्तरेकडील भागाला कुबेराच स्थान मानंल जातं. म्हणूनच तिजोरी ठेवण्यासाठी खोली ही उत्तरेकडील असावी. जर कपाटात धन ठेवायचे असेल तर ते मधल्या किंवा वरच्या कप्पात ठेवावे.

पैसे टिकून राहण्यासाठी उपाय – घरात पैसा टिकून राहण्यासाठी तिजोरी व तिजोरीची खोली कशी असावी

  • तिजोरी ठेवलेली खोली चौरस किंवा आयताकृती असावी. त्याचसोबत तिजोरीच्या समोर कसलाही फोटो लावलेला नसावा. त्याच्या आजूबाजूच्या भींतीवर हवे तर तुम्ही फोटो लावू शकता.
  • तिजोरी असलेल्या खोलीला एकच प्रवेश व्दार असांव, हे प्रवेशव्दार खासकरून उत्तर किंवा पूर्व दिशेने असणं केव्हाही उत्तम.‍ दक्षिण दिशेला कोणतंही  प्रवेशव्दार नसावं. याची काळाजी घेण मात्र फार जरूरी आहे.
पैसे टिकून राहण्यासाठी उपाय / घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय / हातात पैसे टिकत नाहीत
पैसे टिकून राहण्यासाठी उपाय / हातात पैसे टिकत नाहीत – तिजोरीची जागा
  • तिजोरी असणा-या खोलींच्या प्रवेशव्दारावर कमाळात विराजमान असणारी आणि सफेद हत्तींकडून अभीषेक होत असणा-या लक्ष्मीचा फोटो असावा. यामुळे घरात संपत्तीची नेहमी वाढ होत राहील.
  • तिजोरीत कोणत्याही प्रकारचे अत्तर किंवा इतर कोणतीही गोष्ट ठेवू नये. त्याचप्रमाणे तिजोरीच्या वर कपडे, फाईल्स किंवा इतर  कोणतीही वस्तू ठेवू नये. तिजोरीच्या आत लाल रंगाचा कपडा ठेवणे शुभ मानले जाते.
  • तिजोरीखालील जमीन ही समांतर असावी. ही जमीन खडबडीत असल्यास दगड किंवा इतर काही गोष्ट ठेवून ती सरळ करावी.
  •  तिजोरी असणा-या खोलीचा रंग फिकट पिवळा असावा. तिजोरी ठेवण्याच्या खोलीला लाल, हिरवा, निळा रंग देऊ नये. तिजोरी त्या खोलीत स्थापन करण्याचा दिवस सोमवार, बुधवार किंवा गुरूवार असावा.

पैसे टिकून राहण्यासाठी / घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय – काही दैनंदिन सवयी मध्ये करावयाचे बदल

  • संध्याकाळी केर काढू नये – अनेकांना सवय असते सध्याकाळी केर काढायचा किंवा दारात केस विचारायची. मात्र अस ‍अजिबात करू नये. त्यांन घरातील  लक्ष्मी नाराज होते  व घरावर दरिद्री येण्याची शक्यता असते.
पैसे टिकून राहण्यासाठी उपाय / घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय / हातात पैसे टिकत नाहीत
घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय / हातात पैसे टिकत नाहीत – संध्याकाळी केर काढू नये
  • अत्तराचा वापर करू नये.
  • बुधवारी कुणाला पैसे देऊ नये – अनेक गावात बुधवारी बाजार भरतो किंवा आपण अनेक महत्वाची व्यापाराची कामं बुधवारी करतो. तर बुधवारी कोणाला पैसे देऊ नका. बुधवारी दिलेला पैसा बुडतो असे समजले जाते.

तात्पर्य

वरील दिलेले पैसे टिकून राहण्यासाठी उपाय हे प्रत्येकाच्या मानणे न मानणे या वर अवलंबून आहेत, काहींना या अंधश्रद्धा वाटतील पण ज्या लोकांचा या गोष्टींवर विश्वास आहे अशा प्रत्येकाने अशा प्रकारे वरील दिलेले घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय करून आपले कष्टाने कमावलेले धन टिकवून ठेवू शकता.     

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

               

Scroll to Top