कांदा प्रक्रिया उद्योग
उद्योगविश्व

कांदा प्रक्रिया उद्योग कसा चालू करावा | सुरुवात | यंत्र | विक्री

ऑनलाइन जाहिरात

कांदा प्रक्रिया उद्योग >> कांदा हा रोजच्या दैनंदिन लागणाऱ्या अन्नपदार्थां पैकी एक असून देखील शेतकऱ्यांचे उत्पादन आणि बाजारभाव याची चांगल्या पद्धतीने सांगड घातली जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्र राज्यात होत असून महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, पुणे, जळगाव, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात अग्रणी आहेत.

कांदा प्रक्रिया उद्योग माहिती / कांदा पाऊडर मशीन
कांदा

कांदा प्रक्रिया उद्योग का करावा ?

कांद्याच्या दरांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चढ उतार पाहायला मिळत असतात त्यामुळे बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी कांदा चाळ करून ठेवतात परंतु ठराविक काळा नंतर हा चाळ करून ठेवलेला कांदा खराब होतो. या परिस्थिती वर मात करण्यासाठी ग्रामीण भागात छोटे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू ह्यायला हवेत.

पावसाळा उपयोगी वस्तु - First Look

ज्या वेळी कांद्याला बाजारभाव हा २ हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी असेल अश्या वेळी सरळ कांदा प्रक्रिया करून पावडर करून निर्यात केल्यास शेतकऱ्यांना होणारा तोटा टाळता येऊ शकतो.

कांद्यावरील प्रक्रिया क्रमाने

कांद्यावर प्रक्रिया करून चकत्या किंवा पावडर बनवता येऊ शकते, ज्याचा वापर इतर खाद्य पदार्थांमध्ये करता येतो. कांदा प्रक्रिया करताना खालील क्रमाने काम होते.

१)कांद्यापासून चकत्या किंवा पावडर बनवण्यासाठी शक्यतो पांढरा कांदा वापरतात. लहान मानेचा कांदा हा प्रक्रिया करण्यासाठी सर्वात चांगला असतो.

२)कांद्याचा टोकाच्या बाजूचा बाजूचा भाग कापून साल काढून साधारण ५ ते १० मि. मी. जाडीच्या चकत्या केल्या जातात.

३)ह्या बनवलेल्या चकत्या मिठाच्या पाण्यात साधारण २ तास भिजवल्या जातात.

४)त्यानंतर अंदाजे ५५ – ६५ अंश तापमानात ड्रायर मध्ये 12 तास ठेवतात.

५)या तयार झालेल्या प्रक्रिया केलेल्या मालाला हवाबंद डब्यात पॅक करतात.

कांदा प्रक्रिया उद्योग करण्यासाठी गरजेची यंत्र सामग्री

१) कांद्याचे बाहेरील आवरण काढण्याचे यंत्र :-

अशा प्रकारच्या Automatic यंत्राचा वापर करून आपण कांद्याच्या बाहेरील आवरण काढण्यास उपयोग करू शकतो. या यंत्राचा वापर करून आपण साधारण ४०-५० किलो कांद्या वरील आवरण प्रतितासाला काढू शकता. एवढी क्षमता असलेली मशीन अंदाजे १५००० रुपयांना मिळू शकते. यापेक्षा अधिक क्षमता असलेल्या मशीन देखील मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.

२)कांद्याच्या मुळ्या कापण्याचे यंत्र :-

कांद्याचे शेंडे तसेच मुळ्या कापण्यासाठी यंत्र बाजारात उपलब्ध आहे याची किंमत सुद्धा क्षमते नुसार १२००० पासून पुढे आहे. काही मशीन ज्या बाजारात आहेत त्यांची क्षमता १०० किलो ताशी आहे. सुरवातीच्या काळात हे काम तुम्ही मशीन न घेता स्वतः देखील करू शकता व तुमची गुंतवणूक वाचवू शकता.

३) मुळ्या कापलेला व बाहेरील आवरण काढलेला कांदा धुण्यासाठी यंत्र :-

या यंत्राचा वापर हा मुळ्या, शेंडे व बाहेरील आवरण काढलेला कांदा धुण्यासाठी केला जातो. या प्रक्रिये मुळे धूळ व अन्य खराब घटक कांद्या पासून वेगळे करता येतात व कांदा स्वच्छ होतो. अशा प्रकारचे यंत्र बाजारात १०हजार रुपयां पासून पुढे क्षमते नुसार आहेत.

४) धुतलेल्या कांद्या कापून चकत्या करण्यासाठी यंत्र :-

या यंत्रा द्वारे कांद्याच्या लहान लहान चकत्या केल्या जातात. अशा प्रकारच्या यंत्रा मध्ये ०.४ मि. मी. पासून ०.८ मि. मी. पर्यंत चकत्या करता येतात. हे यंत्र ऑटोमॅटिक असून बाजारात अशा प्रकारची बरीच यंत्रे तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांची किंमत क्षमते नुसार कमी अधिक असेल.

५) कांदा वाळवण्यासाठी यंत्र :-

या उपकरणा मध्ये चकत्या केलेला कांदा वाळवला जातो तसेच ह्याला डिहायड्रेटर किंवा ड्रायर देखील म्हणतात. या मशीन मध्ये कांद्यातील पाणी काढून टाकले जाते व कांदा पूर्ण पणे वाळवला जातो. या प्रक्रिये साठी तुम्ही सोलर ड्रायर देखील वापरू शकता. परंतु लक्षात असुद्या असा चकत्या केलेला कांदा हा तुम्हाला १० – १२ तास ५५℃ – ६०℃ एवढ्या तापमानाला ठेवायचा आहे त्यामुळे नुसत्या उन्हात तुम्ही ह्या चकत्या वळवल्या तर चालेल असे नाही हे ड्रायर तुम्हाला घ्यावेच लागेल कारण ह्या मध्ये तेवढे तापमान तयार केले जाते जे आपल्या आजूबाजूला कितीही ऊन असले तरी होत नाही.

बाजारात सध्या १२ पासून १९० पर्यंत ट्रे असणारे ड्रायर उपलब्ध आहेत.

कांदा प्रक्रिया उद्योग माहिती / कांदा पाऊडर मशीन

६) गिरणी:-

ड्रायर मध्ये वाळवलेल्या ह्या कांद्याच्या चकत्या गिरणी च्या साहाय्याने पावडर मध्ये रूपांतरित करतात. अशा प्रकारच्या कांद्याची भुकटी करणाऱ्या गिरण्या बाजारात क्षमते नुसार उपलब्ध आहेत. प्रति तासाला ५० किलो क्षमता असलेली मशीन सुरवातीच्या काळात तुम्हाला पुरेशी ठरू शकते ज्याची किंमत बाजारात १५ हजार च्या जवळपास आहे.त्यापेक्षा अधिक क्षमता असलेले ग्राइंडर देखील बाजारात उपलब्ध आहेत.

ही सर्व यंत्र एखादी कंपनी तुम्हाला एकत्रित रीत्या देखील उपलब्ध करून देऊ शकते.किंवा तुम्ही वेगवेगळी देखील घेऊ शकता.

ही बनवलेली कांदा पावडर हवाबंद बाटली मध्ये किंवा प्लास्टिक पिशवी मध्ये भरून तुम्ही निर्यात करू शकता.

कांदा प्रक्रिया उद्योग / कांदा पावडर उद्योग यंत्र सामग्री विक्रेते

खाली दिलेल्या लिंक वर तुम्हाला कांदा प्रक्रिया उद्योगासाठी लागणार्‍या यंत्रां च्या खरेदी विषयी जी पण माहिती हवी असेल ती मिळेल.

  • https://www.yashfoodequipment.in/ginger-onion-garlic-powder-making-machine.html
  • https://dir.indiamart.com/search.mp?ss=ginger-onion-garlic-powder-making-machine
  • https://www.alibaba.com/trade/search?fsb=y&IndexArea=product_en&CatId=&SearchText=ginger-onion-garlic-powder-making-machine

आवश्यक भांडवल

अशा प्रकारचा कांदा प्रक्रिया उद्योग चालू करण्यासाठी कमीतकमी २ लाख पासून ५ लाखा पर्यंत खर्च येऊ शकतो. जो एक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट देखील करु शकतो.

कांदा प्रक्रिया उद्योग व बाजार

आखाती देशांमध्ये कांद्याच्या चकत्या आणि पावडर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्या इंग्लंड, जर्मनी, जपान, आफ्रिका, हॉंगकॉंग यांसारख्या देशांमध्ये अश्या प्रकारच्या चकत्या आणि पावडर केलेल्या कांद्याची निर्यात होते आहे आणि या कांद्याच्या प्रक्रिया केलेल्या पावडर ला चांगला बाजारभाव मिळतो आहे ज्या मुळे परकीय चलन प्राप्तीत देखील वाढ होते.

आता सध्याला आपल्या देशातील उत्पनापेकी केवळ २-५ टक्के मालावर प्रक्रिया होते उर्वरित माल हा विकला जातो किंवा खराब होतो. या वरूनच आपल्याला लक्षात येईल की ह्या कांदा प्रक्रिया उद्योग ला किती वाव आहे.

निर्यात करण्यासाठी सुरवातीच्या काळात एखाद्या ऐजंट ची मदत घ्या आणि हळू हळू तुमच्या पैकी एखादा व्यक्ती निर्यात क्षेत्रातील प्रशिक्षण घेऊन त्यात निपुण करा.

तात्पर्य

हल्लीच्या कांद्याच्या बाजारभावात होणाऱ्या चढ उतारा मुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान अशा प्रकारचा कांदा प्रक्रिया उद्योग चालू करून थोड्या बहुत प्रमाणात नक्कीच कमी करता येऊ शकते.

कांदा पावडर कशी बनवतात

कांदा प्रक्रिया करून त्याची पावडर बनवली जाते, कांदा पावडर बनवताना कांद्यावर पुढील क्रमाने प्रक्रिया केली जाते.
१)कांद्यापासून चकत्या बनवण्यासाठी शक्यतो पांढरा कांदा वापरतात. लहान मानेचा कांदा हा प्रक्रिया करण्यासाठी सर्वात चांगला असतो.
२)कांद्याचा टोकाच्या बाजूचा बाजूचा भाग कापून साल काढून साधारण १० मि. मी. जाडीच्या चकत्या केल्या जातात.
३)ह्या चकत्या मिठाच्या पाण्यात भिजवल्या जातात.
४)त्यानंतर अंदाजे ५५ – ६५ अंश तापमानात ड्रायर मध्ये 12 तास ठेवतात.
५)या तयार झालेल्या प्रक्रिया केलेल्या मालाला हवाबंद डब्यात पॅक करतात.
६)आणि सर्वात शेवटी वाळवलेल्या ह्या कांद्याच्या चकत्या गिरणी च्या साहाय्याने पावडर मध्ये रूपांतरित करतात.

ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

4 Replies to “कांदा प्रक्रिया उद्योग कसा चालू करावा | सुरुवात | यंत्र | विक्री

  1. एकदम ऊत्तम व्यवसाय , मला करायला आवडेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *