नवरात्र उत्सव मराठी माहिती / उपासना / कथा / विविध भागातील उत्सव

नवरात्र उत्सव मराठी माहिती / उपासना / प्रचलित कथा / प्रसाद / विविध भागातील उत्सव / देवीची शक्ति पीठे >> नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस चालणारा हिंदू धर्मातील देवीचा उत्सव. तसे पाहायला गेले तर आपल्या हिंदू धर्मात सर्वच उत्सव विविध प्रकारे साजरे केले जातात पण नवरात्र हा उत्सव आपल्या समाजात इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो ते पाहून थक्क व्हायला होते.

हिंदू वर्षा प्रमाणे श्रावण महिना सुरू झाला की सुरू होतात ते विविध सण आणि गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे. या दरम्यान मध्ये येणारा पित्र पंधरवडा त्या तयारीत कधी संपतो समजत देखील नाही. जागो जागी चौका चौकात देवीच्या स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. आपल्या कडे गणपती प्रमाणे नवरात्र उत्सव साजरा करणारी अनेक मंडळे जरी नसली तरी जी काही ठराविक मंडळे आहेत, ती नवरात्र उत्सव अगदी धुमधडाक्यात करत असतात.

नवरात्र (नवरात्री) उत्सव माहिती – घटस्थापना व इतर सर्व माहिती (Navratra Utsav Marathi Mahiti)

नवरात्र उत्सव आपल्या विविध भागात कशा पद्धतीने साजरा केला जातो त्या पद्धती कोणत्या व नवरात्र उत्सव साजरा करण्या मागे काय शास्त्र आहे त्याची माहिती आपण या लेखा मध्ये बघणार आहोत.

नवरात्र (नवरात्री) उत्सव मराठी माहिती – घटस्थापना कशी करावी

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजे एका मडक्यामध्ये धान्य पेरले जाते त्यावर अखंड नंदादीप लावला जातो. रोज फुलांची माळ व सकाळ संध्याकाळी आरती केली जाते. सार्वजनिक उत्सवातही हे सारे केले जाते. घटस्थापना करण्याची प्रत्येक घराची पद्धत निराळी असते, कोणाकडे उठता बसता सवाषण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाषण जेवू घातले जाते. तर कुणाकडे कुमारिकेची भोजनं घातली जातात. नवमीच्या दिवशी होमहवन असतो.

घटस्थापना कशी करावी / घटस्थापना माहिती / नवरात्री घटस्थापना माहिती (navratri ghatsthapana information in marathi)
घटस्थापना कशी करावी / घटस्थापना माहिती / नवरात्री घटस्थापना माहिती

पुरणाचा स्वयंपाक असतो बरेच जण नऊ दिवस उपवास करत असतात. तर कुणी फक्त धान्य फराळ करतात. एकुण च काय तर नवरात्राचे नऊ दिवस धावपळी चेच आसतात. काही घरां मध्ये व सार्वजनिक मंडळा मध्ये देवीचा गोंधळ ही घातला जातो, आणि त्या गोंधळा साठी गोंधळी बोलावले जातात.

नवरात्र उत्सव मराठी माहिती - नवरात्र उत्सव माहिती
नवरात्र उत्सव मराठी माहिती

नवरात्र (नवरात्री) उत्सव – अख्यायिका / प्रचलित कथा, प्रसाद, जोगवा व इतर माहिती

अख्यायिका / प्रचलित कथा

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते .वाघावर आरुढ झालेली हातात तलवार व खडग ही शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजिली जाते. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संशयिता नमस्तये नमस्तये नमो नम असेच म्हटले जाते.

प्रसाद

नवरात्र उत्सवात देवीची आरती झाल्यावर शेवटी खिरापत ओळखण्याची मजा काही वेगळीच. दररोज वेगळी खिरापत कुणीतरी डबा वाजवून दाखवे म्हणजे आवाजांनी ओळखण्याचा प्रयत्न करता येई. प्रत्येक घरी वेगळा पदार्थ असतो. काही ठिकाणी पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन अशात चढत्या क्रमाने खिरापती असतात. ही खिरापत खाण्याच्या चढा ओढीत लहान मुलांना वेगळीच मजा असते. दसर्‍याच्या दिवशी तर त्यात श्रीखंड बासुंदी जेलेबी किंवा चिवडा साखरभात आणी सामोसे यांसारख्या पदार्थांची भर पडत असे.

नवरात्र उत्सव देवीची आरती / नवरात्री गाणी व जोगवा

पहिल्या दिवशी ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडुन दे, करीन तुझी सेव‍ा, या गाण्यांनी  सुरूवात होई.क्रमा क्रमाने बाकीची गाणी येत. अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून घटस्थापना ती करूनी ही आरती देखील ऐकण्यास अतिशय मधुर वाटते. त्याच बरोबर उदो बोला उदो बोलो अंबाबाई माऊलीचा हो आंनदे गर्जती काय वर्णू महिमा ही देखील अतिशय प्रसिद्ध व छान आरती आहे. ही देखील सर्वत्र म्हंटली जाते.

नवरात्री मध्ये जोगवा ही मागितला जातो. जोगव्याची अनेक गाणी आहेत, पण अनेक भागात प्रचलित असे जोगवा मागताना चे बोल खालील प्रमाणे:-

आईचा तुळजा देवही तुळजा

देवाच्या भगती गोंधुळ घालिती.

अशा सद्गुणांचा निसंग होण्याचा विकल्प काम क्रोध सोडून देण्याचा आणि जन्ममरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा बायका मागता .या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक भरलेला आहे. मात्र तो समजावून घेवून जोगवा मागितल्यास मनशांती नक्कीच मिळते.

विविध भागात नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या विविध पद्धती

 विदर्भात भुलाबाई  हा प्रकार बघायला मिळतो. भाद्रपद पौर्णिमेला शंकर पार्वतीच्या मूर्ती बसून त्याच्यासमोर शाळकरी मुली टिपर्‍यां च्या तालावर गाणी म्हणतात. शाळेतून आल्या आल्या हातात टिपऱ्या घेऊन मैत्रिणीच्या घरोघर जाण्याची त्यांची लगबग गमतीची असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी टिपूर चांदण्यात भूलाबाई मखरात बसवून आरास मांडुन पूजा केली जाते. साधारण १० ते १५ वर्षांपूर्वी विदर्भात हे घडत असे पण हल्ली शाळांच्या वेळा व क्लासेस यातून मुलींना वेळ मिळेनासा झाला.

घटस्थापना कशी करावी / घटस्थापना माहिती / नवरात्री घटस्थापना माहिती (navratri ghatsthapana information in marathi)
घटस्थापना कशी करावी / घटस्थापना माहिती / नवरात्री घटस्थापना माहिती

हल्ली फक्त कोजागरीच्या दिवशीच भुलाबाई मांडल्या जातात. भूलाबाई हे देवी चेच रुप असुन तिला गौराई म्हणतात आणि ती माहेरवाशीण असते, यातील गाण्याची सुरुवात ” पहिली माझी पूजा बाई  देवा देव बाई अशी होती नंतर पहिल्या मासेचा गरवा कधी येशील सरवा सरता सरता कारागरी नंदनगाव च्या तीरावरी आंबे बहुत पिकले भूलाबाई राणीचे डोहाळे ” अशी नऊ महिन्याचे नऊ फळे  पिकतात आणि शेवटी तिचे डोहाळे “तिला नेहुनी घाला पलंगावरी तेथे शंकर बसले शंकर आमचे मेहुणे, दीड दिवसाचे पाहुणे ” अशी सांगता केली जाते.

नवरात्रीत गुजराती महिला गरबा नृत्य करतात. सजून – धजून त्या गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरा पर्यंत त्यांची नाच गाणी सुरु आसतात. मंदिरांमध्ये गरबा खेळाल‍ा जातो पूजेचा एक भाग म्हणून केला जाणारा गरबा हळू-हळू व्यावसायिक रूप घेऊ लागला. हल्ली हजारांची तिकिटे लावून विशेष सेलिब्रिटीज बोलावून गरबा खेळला जातो. त्यामध्ये बरेच गैरप्रकारही होतात. उत्सवाचे पावित्र्य त्यामुळे उध्वस्थ होते. तरुणांचा जोश मान्य पण त्यातून निर्माण होणारे गैरप्रकार थांबले पाहिजेत. सण उत्सवां मधील शुद्ध पवित्र भावना जपली पाहिजे.

नवरात्री उत्सव व देवीची शक्ती पीठे

असे म्हंटले आहे परशूरामाची जननी म्हणजे रेणुकामाता  माहूरगडवासिनी. देवीच्या साडेतीन पीठापैकी एक कोल्हापुरची अंबाबाई दुसरी तुळजाभवानी तिसरी रेणुका माता ही तीन पूर्ण पीठे आणि नाशिक जवळ वणींचे सप्तशृंगी हे अर्धपीठ मानले जाते. या सर्व ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात.

तिथे दर्शनाला जाण्यासाठी भक्तांची धडपड असते. पण ते शक्य झाले नाही तर निदान गावातल्या देवीचा दर्शनाला तर आवर्जून जातात. काही भगिनी दररोज दर्शन घेतात. अलीकडे घरी नंदा दीप लावणे शक्य होत नाही म्हणून मंदिरां मध्ये पैसे देण्याची पद्धत  रूढ होत आहे. नागपूर च्या जवळील कोराडी च्या मंदिरात असे हजारो दीप लावले जातात.

सारांश – नवरात्र उत्सव मराठी माहिती

देवीच्या विविध रूपांची आराधना करताना मना मध्ये भक्ती – भाव उभारून आला पाहिजे. अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करण्याचा भावने तून देवीच्या चरणी लीन व्हावे .केवळ नऊ दिवसांचा उपवास  केले म्हणजे झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्या पासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रात होणे अपेक्षित आहे . ज्या शक्तीचे सामर्थ्याचे दर्शन देवीने दिले तशी शक्ती सामर्थ्य आपल्या ठाणी निर्माण व्हावे ,याचसाठी हा उत्सव आहे तो त्याच पवित्र भावनेतून साजरा व्हावा.

ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तसेच आपल्या काही सूचना असल्यास कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top