मुरमुरे कसे बनवतात | मुरमुरे (Murmure ) प्रक्रिया उद्योग माहिती

मुरमुरे कसे बनवतात | मुरमुरे प्रक्रिया उद्योग | मुरमुरे कसे बनवायचे | Murmure >> मुरमुरेंची निर्मिती तांदुळा पासून केली जाते. राज्यातील काही भागात त्यास चुरमूरे असेही म्हणतात. भेळ, भडंग, लाडू चिवडा इ. खाद्यपदार्थ तयार करणेसाठी मुरमुरेंना मोठया प्रमाणावर वापर होतो. शिवाय तिर्थस्थानी मंदिरामध्ये प्रसाद तयार करणेसाठी अथवा तुलसी विवाहासारख्या कार्यक्रमात प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यासाठी मुरमुरे वापरले जातात. शिवाय आज लोक फक्त मुरमुरे खाण्यासाठीही वापरण्याचे प्रमाण वाढत आहे.

Table of Contents

मुरमुरे कसे बनवतात | मुरमुरे कसे बनवायचे संपूर्ण माहिती (How to manufacture murmure)

फार पूर्वी ग्रामीण भागातील काही कुटूंबे घरगुती पातळीवर मुरमुरे निर्माण करीत होते. आजूबाजूचे शेतकरीही सदरच्या व्यक्तीकडून तांदूळ देउन मुरमूरे तयार करून घेत पण आज चित्र बदलल आहे. धावपळीच्या या आधुनिक यूगात भात मुरमुरे युनिटवर नेउन मुरमुरे तयार करून घेण्याइतपत वेळ नाही परिणामी सर्वत्र तयार मुरमुरे विकत घेणेच आज पसंद केले जात आहे.

मुरमुरे कसे बनवतात
मुरमुरे कसे बनवतात

शहरी भागात तर वेळेअभावी चुरमूरे मुरमुरे आणि त्यापासून बनविले जाणारे इतर पदार्थही विकत घेण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. झपाटयाने वाढत चाललेली आजची लोकसंख्या आणि बदलती खाद्य संस्कृती विचारात घेता तसेच वरील परिस्थितीचा विचार करता मुरमुरे निर्मिती आणि विक्री उद्योगास भरपूर वाव असल्याचे दिसते. भातापासून मुरमुरे तयार करणे हा एक तांत्रिक उद्योग असल्याने आज फक्त हे तंत्र माहिती असणारे लोकच हा व्यवसाय करतात.चला तर मग जाणून घेऊयात मुरमुरे कसे बनवतात.

मुरमुरे कसे बनवतात – मुरमुरे निर्मितीच्या पद्धती (Ways of murmure manufacturing process)

मुरमुरे तयार करण्यासाठी भात गिरणीतून तयार झालेला तांदूळ ताबडतोब वाळू बरोबर गरम केला जातो. असा तांदुळ लगेचच फुगतो व मोठा होतो, परंतु उकडा तांदुळ जर वाळू बरोबर गरम केला तर जास्त लांबतो यामुळेच मुरमुरे तयार करण्याच्या प्रक्रियेत कच्चा तांदुळापेक्षा उकडा तांदुळच जास्त प्रमाणात वापरला जातो. मुरमुरे निर्मितीच्या प्रामुख्याने २ पद्धती आहे एक म्हणजे पारंपारिक पद्धत व दुसरी आहे ती प्रगत पद्धत.

मुरमुरे कसे बनवतात – पांरपारिक पद्धत

घरच्या घरी मुरमुरे बनविण्याच्या पद्धतीत भात गरम पाण्यात २४ तास भिजवितात नंतर पाणी काढुन टाकून तो भात कढयांमधून वाळू बरोबर भाजतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या भट्टया व कढया वापरतात. यामधून कोरडा उकडा भात मिळतो. हा भात नंतर सुर्याच्या उष्णतेने वाळविला जातो. वाळविलेला भात नंतर हलर गिरणीतून भरडला जातो या प्रक्रियेत कोंडा, तुस व तांदुळ मिळतो. तुस याच भट्टयासाठी इंधन म्हणून वापरतात तर तांदूळाचा ओलावा कमी करण्यासाठी तो कढई द्वारे तापविला जातो. हा तांदूळ नंतर मिठाच्या द्रावणाबरोबर मिसळविला जातो. मिठाच्या द्रावणासह असणारा तांदूळ पुन्हा एकदा भट्टीवर कढईतून जास्त प्रमाणाच्या आचेवर काही सेकंद भाजला जातो. याचवेळी त्यापासून मुरमुरे तयार होतात.

मुरमुरे कसे बनवतात
मुरमुरे कसे बनवायचे

मुरमुरे कसे बनवतात – प्रगत पद्धत

प्रगत पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीत थोडाफार बदल करून मुरमुरे बनवितात. यामध्ये प्रामुख्याने दोन तीन बाबींचा विचार केला आहे. एक म्हणजे उकडा भात की ज्यामध्ये तांदूळ फुगीर व लांबट होतो आणि दुसरे म्हणजे मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत एकसंधता आणणे. तिसरी अंत्यत महत्वाची बाब म्हणजे जुन्या पद्धतीत वापरण्यात येणा-या कढया व भट्टया ऐवजी यंत्राद्वारे मुरमुरे तयार करतात. उकडा भात बनविण्याच्या पद्धतीपैकी (वाफेद्वारे, कोरडी गरम हवा व दाबाद्वारे) कोरडी गरम हवेद्वारे केले जाणारे उकडीकरण मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत अंत्यत चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे. जितके उकडीकरण चांगले तितके पफींग चांगले असे म्हणता येईल.

मुरमुरे बनविण्याच्या आधुनिक पद्धतीमध्ये प्रथम भात  (साळ) स्वच्छ धुतला जातो, किंवा बायसल्फाईट द्रावणात टाकून धूतला जातो. मात्र या प्रक्रीयेत भात पाण्यात अथवा बायसल्फाईट द्रावणात भिजत न ठेवता फक्त काही काळच ठेवून ते द्रावण काढून टाकले जाते.

यानंतर हा भात (साळ) एका भांडयात घेवून त्यावर २ ते २.५ किलो प्रति चौरस सें.मी. दाब या प्रमाणात वाफ सोडून १५ मिनिटानंतर हा भात वाळवणी यंत्राद्वारे अथवा उन्हात वाळवला जातो. १२ ते १३ टक्के ओलाव्याला आल्यानंतर हलर गिरणीतून भरडला जातो. या प्रक्रियेत आपणास उकडा भात मिळतो की जो मुरमुरे बनविण्याच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त लांबट व फुगीर बनतो.

असा भात साधारणपणे मुळ भातापेक्षा १० ते १२ टक्के लांबतो. नंतर हा तांदूळ जून्या पद्धतीप्रमाणेच प्रक्रिया करून मुरमुरे बनविण्यासाठी वापरला जातो. आधूनिक पद्धतीद्वारे मिळणारा तांदूळ ही थोडासा तांबूस रंगाचा असतो त्यामुळे मुरमुरेही तांबुस रंगाचे बनतात. तांबुस रंग नको असल्यास (साळ) २ टक्के सोडीयम बाय सल्फाईटच्या द्रावणबरोबर धुवून घेण्याची पद्धत आहे.

महत्वाची माहिती:

 • मुरमुरे तयार करण्यासाठी घेतलेल्या हलर यंत्राचा वापर घरघंटी म्हणुन आटा चक्कीसाठी सुद्धा करू शकतो.
 • या उद्योगासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना आवश्यक आहे.
 • उद्योगासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता गरजेची आहे.
 • मुरमुरे प्रक्रियेत तयार होणारे भुस / कोंडा विक्री करून जास्तीचे उत्पादन मिळवू शकते.

मुरमुरे उद्योगासाठी उपलब्ध बाजारपेठ (murmure manufacturing business market)

बाजारपेठ
बाजारपेठ

कोणताही प्रक्रिया / उद्योग उभारणीसाठी बाजारपेठ/ग्राहकही महत्त्वाची बाब असते. मुरमूरेसाठी किरकोळ दुकाने, भेळ सेंटर, फरसाण मार्ट, बेकरी, हॉटेल्स, मिठाईची दुकाने मॉल यांना मुरमुरे घाउक पद्धतीने विकता येतील याशिवाय आठवडा बाजार, मार्केट, जत्रा, तिर्थक्षेत्र, पर्यटनाच्या ठिकाणी मुरमुरेची विक्री शक्य आहे.

मुरमुरे उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ (murmure manufacturing business – manpower required)

साधारणतः १ क्वींटल/ दिन मुरमुरे उत्पादन करण्याची क्षमता असलेले मुरमुरे यूनीट सुरू करण्यासाठी, १ कुशल १ मदतनीस, १ विक्रेता अशी एकूण ३ कामगारंची आवश्यकता असते. साधारणतः वर्षातील ३०० दिवस सदरचा उद्योग चालेल असे अपेक्षित असल्याने सदर मनुष्यबळाची उपलब्धता ही कायमस्वरूपी राहील याची काळजी घ्यावी लागेल.

मुरमुरे उद्योगासाठी आवश्यक कच्चामाल (murmure manufacturing business raw material)

मुरमूरे निर्मितीसाठी कच्चा माल साळ खरेदी करताना खालील बाबी ध्यानात ठेवाव्यातः

 • चांगली पोसलेली व स्वच्छ साळ निवडावी
 • काढणीनंतर साळीची हाताळणी योग्य पद्धतीने केलेली असावी
 • साळीवर जास्त प्रमाणात रसायनाचा वापर केलेला नसावा
 • साळीची योग्य पॅकिंग होउन त्याची वाहतुकी दरम्यान जास्त हेळसांड झालेली नसावी
 • साळ चांगली वाळलेली असावी. शिवाय ती चांगल्या पद्धतीने साठविलेली असावी
 • साळीची खरेदी साधारणतः मालाची आवक जास्त असताना करावी जेणेकरून कमी किंमतीत उत्तम प्रतीची साळ मिळेल.

मुरमुरे व्यवसायाची जागा आणि इमारत (murmure manufacturing plant location & building)

उदयोगासाठी जागेची निवड करताना त्याठिकाणी वाहतूक, पाणी, वीज इ.ची उपलब्धता असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. याच बरोबर जागेची निवड जेथे कच्चा माल सहज आणि मोठया प्रमाणात होईल आणि शिल्लक राहणा-या टाकावू मालाची विल्हेवाट लावणे शक्य होईल अशा ठिकाणी करावी यामुळे उत्पादन निर्मिती सातत्याने चालू राहू शकेल आणि टाकावू मालामुळे इतराना त्रास ही होणार नाही.

सदर जागा ही रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून उत्पादित मालाची ने आण करण्याच्या दृष्टिने सुलभता येईल.प्रक्रीया उद्योगाच्या जागेवर पाण्याची मुबलक सुविधा असली पाहिजे कारण आपला प्रक्रिया उद्योगाचा पाणी हा अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे उद्योगाअंतर्गत कार्य करणा-या मजुरांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा असली पाहिजे.उद्योग उभारणी करीत असतांना मशीनरीज साठी विज लागते तर विज सुद्धा प्रक्रिया उद्योगाच्या जागेवर उपलब्ध असली पाहिजे.

मुरमुरे कसे बनवतातमुरमुरे उद्योग आवश्यक मशिनरी (murmure manufacturing machines)

खालील यंत्रसामुग्री व इतर साहीत्य सदरचा उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पोहा उद्योग व मुरमुरे उद्योग आवश्यक मशिनरी (poha & murmure manufacturing machines)
पोहा व मुरमुरे उद्योग मशिनरी (poha & murmure manufacturing machines)
 • मोठया आकाराच्या कढया – २ नग,
 • हलर यंत्र
 • टोपल्या
 • सुपे
 • बादल्या
 • उलथणी
 • लोखंडी झारी / चाळणी
 • अॅल्यूमीनीयचे मोठे टोप

मुरमुरे उद्योग Ebook (murmure manufacturing Ebook)मुरमुरे कसे बनवतात

वरील माहिती ही मुरमुरे उद्योगाची आपल्याला ओळख करून देण्यापर्यंत योग्य आहे. परंतु आपल्याला जर या मुरमुरे उद्योगा विषयी अधिक विस्तृत स्वरुपात माहिती हवी असेल जसे की मशिनरी खरेदी कुठून करावी,पोहा उद्योग संपूर्ण अर्थकारण, मुरमुरे उद्योगासाठी कर्ज व सबसिडी घेण्यासाठी शासकीय योजना कोणत्या आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आमचे पोहा व मुरमुरे प्रक्रिया उद्योग हे Ebook डाऊनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. Ebook डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “मुरमुरे – Ebook” बटन वर क्लिक करा.

poha/murmure manufacturing process

सारांश – मुरमुरे प्रक्रिया उद्योग

मुरमुरे उद्योगा विषयी माहिती आपल्याला देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न या लेखा मध्ये करण्यात आलेला आहे. आपल्याला जर मुरमुरे निर्मिती उद्योग करायचा असेल व अधिक माहिती हवी असल्यास आपण वर दिलेले Ebook डाऊनलोड करू शकता.हा उद्योग सुरू करण्यापूर्वी मुरमुरे उद्योग सुरू असलेल्या प्लांट ला आपण एकदा अवश्य भेट द्यावी.तुम्हाला तुमच्या भावी उद्योगासाठी शुभेच्छा.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्या कडे अधिक काही माहिती असल्यास अवश्य कमेंट करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

3 thoughts on “मुरमुरे कसे बनवतात | मुरमुरे (Murmure ) प्रक्रिया उद्योग माहिती”

 1. BHIKAN MAHAMAD PINJARI

  नमस्कार सर
  आपण दिलेली मुरमुरे व पोहा उद्योगची माहिती उत्कृष्ट व परिपूर्ण दिलेली आहे. म्हणून सर्वप्रथम तुमचे धन्यवाद..
  मी महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातून चोपडा या तालुक्यात राहतो. मला हा मुरमुरे व पोहा उद्योग करावासा वाटतो. परंतु मुरमुरे व पोहा उद्योगासाठी कोणत्या प्रकारचा तांदूळ लागतो व तो तांदूळ कुठे उपलब्ध होईल याबाबतीत माहिती हवी कृपया आपणास विनंती की सदरील माहिती द्यावी .
  भिकन पिंजारी
  ७०२०६०३७११

 2. ramesh dongarkar

  नमस्कार साहेब
  माझे नाव रमेश डोंगरकर राहणार मु खिनागिनी पोस्त भू ता. राजापूर जिला रत्नागिरी आपण असे सांगू इच्छितो कि, कुरमुरे प्रकिया उद्योग चालू करायचा आहे तरी आपण मार्गदर्शन करावे machine कुठे मिळते प्रशिक्षण कुठे करावे माझा मोब. ७६६६११६३०७
  याच्यावर कळवावे हि नम्र विनंती

Comments are closed.

Scroll to Top