मसाले भात कसा बनवायचा
रेसिपी

मसाले भात कसा बनवायचा / मसाले भात रेसिपी मराठीमध्ये

ऑनलाइन जाहिरात

मसाले भात कसा बनवायचा / मसाले भात रेसिपी मराठी>> मसाले भात हा एक पारंपरिक चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असतो याचे महाराष्ट्रीयन खाण्यामध्ये स्थान आहे. सामान्यपणे जर मसाला भात बनवला तर त्यात कांदा, बटाटा, शेंगदाणे व तिखट टाकून आपण बनवतो. कधीकधी लग्नामध्ये सुद्धा चिकट आणि कसातरी मसाला भात बनवला जातो, खरं पाहता मसाले भात हा पुलाव असून त्याची शिजवण्याची पद्धत महत्वाची असते.

मसाला भात किंवा पुलाव बनवताना बासमती तांदळाचा वापर केला जातो. तसे पाहिले तर लांब सडक बासमती तांदूळच  पुलाव किंवा मसला भात साठी उत्तम समजला जातो. प्रत्येक व्यक्तीची मसाला भात बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते . कोणी नुसत्या भाज्या टाकून मसाला भात बनवतात.

मसाले भात कसा बनवायचा / मसाले भात रेसिपी मराठी – साहित्य व बनवण्याची पद्धत संपूर्ण माहिती

महाराष्ट्रीयन मसाले भात बनवताना त्याच्यामध्ये  पोटॅटो, गाजर , मटर ,कॉलिफ्लॉवर ,फरसबी ,भाज्या टाकल्या जातात. महाराष्ट्रातला गोडा मसाला हा कोणत्या हि पदार्थाला चविष्ट करण्याची क्षमता ठेवतो. गोडा मसाला हा नावाप्रमाणेच सुगंधी ,गोडसर ,चवीचा आणि  सारे स्वीट मसाले म्हणजे दालचिनी ,चक्रीफुल ,नागकेशर यांचा वापर करून हा बनवला जातो. तुपात तळलेले काजू, वरून टाकलेले ओले खोबरे आणि मसाले भातासोबत टमाटर ची चटणी दह्याची किंवा आंबट गोड कढी असं मिळून मसालेभात खाण्याचा आनंद काही औरच आहे. महाराष्ट्रात तर मसाला भात खूप लोकप्रिय आहे. चला तर मग जाणून घेऊयात हा सर्वांच्याच आवडीचा मसाला भात कसा बनवतात.

मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य / मसाला सामग्री                             

मसाले भात बनवण्यासाठी लागणारी मसाला सामग्री

 एक चमचा धने, १ चक्रीफुल  ७ ते ८ लवंग, १  दालचिनी ची स्टिक, नागकेशर, १ चमचा मोहरी,  ,१ चमचा जिरे, ४ ते ५  तेजपत्ता , १/२ हिंग व ३ चमचे गोडा मसाला.

मसाला भात बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य

तेल, बारीक कापलेले कांदे , २ चमचे आले लसून पेस्ट ,हिरवी मिरची,  लाल मिरची पावडर,  हळद , १ छोटा बारीक  फोडी केलेला बटाटा, बारीक कापलेला गाजर , १/२ कप मटार, फुलगोभी,  एक कप  लांब दाण्याचा बासमती तांदूळ, तोंडली १ कप , बारीक कापलेले टोमॅटो, १०-१२ काजू , १. १/४ कप पाणी, मीठ चवीनुसार ,बारीक कापलेला संभार,बारीक कापलेला खोबरे.                           

मसाले भात रेसिपी मराठी / मसाले भात कसा बनवायचा - साहित्य
मसाले भात कसा बनवायचा – साहित्य

मसाले भात कसा बनवायचा / मसाला भात बनवण्याची पद्धत           

  • बासमती तांदूळ ३-४ वेळा स्वच्छ धुऊन ३० मी. ठेवावे . एका पॅन मध्ये तेल गरम केल्यावर त्यात धने, दालचिनी आणि लवंग एकेक करून सुगंध येईपर्यंत भाजून घ्यावे थंड झाल्यावर त्याची बारीक पूड बनून घ्यावी.                                                                       
  • एका कढई मध्ये ४ चमचे तेल गरम करून मग त्यात काजू भाजून घ्यावे, काजू हलके करड्या रंगाचे झाल्यावर एका बाजूला काढून ठेवावे. त्याच तेलामध्ये तमालपत्र ,मोहरी , व हिंग ची फोडणी द्यावी त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यावा. नंतर त्यात आले लसूण ची पेस्ट घालावी आणि चांगले शिजू द्यावे . 
मसाले भात कसा बनवायचा
मसाले भात कसा बनवायचा
  • आता ह्यात हळद, लाल मिरची, गोडा मसाला, आणि सुरुवातीला तयार केलेला बारीक मसाला पावडर आणि चवीनुसार मिठ घालावे हे सगळे मिसळून मंद आचेवर ४ मी परतून घ्यावे.
  • मग ह्यात सर्व भाज्या घालून घ्याव्या फुलकोबी मटार,तोंडली ,बटाट्याच्या फोडी आणि १ कप पाणी घालून मिक्स करून घ्यावे, त्यानंतर झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्यावे.
  • १२ ते १३ मिनिटात भाज्या शिजतात मग त्यात तांदूळ घालावे, थोडे तेल मध्ये तांदूळ परतावे टेस्ट छान येते तळलेले काजू घालावे मंद आचेवर एक उकळी येई  पर्यंत ठेवावे.
  • उकळी आल्यावर त्यात १ चमचा तूप घालून हलक्या हाताने परतून घ्यावे मग मंद आचेवर मसाले भात होऊ द्यावा.
  • १५  मिनिटे मंद आचेवर भात पूर्णपणे शिजतो नंतर गॅस बंद करून त्यात संभार आणि किसलेला नारळ घालावे. जोपर्यंत जेवायला बसत नाही तोपर्यंत झाकून ठेवावा.
  • असा हा महाराष्ट्रीयन मसाला भात दह्याच्या कढी बरोबर खाल्ल्यास अप्रतिम लागतो.           

सारांश – मसाले भात कसा बनवायचा / मसाले भात रेसिपी मराठी  

सुरवातीला मसाले भात बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य काढून घ्यावे आणि मग मसाला भात बनवण्याच्या प्रक्रियेला सुरवात करावी. वरील कृती क्रमाने केल्यास आपल्याला देखील मसाला भात उत्तम रीत्या बनवता येऊ शकतो.चला तर मग वरील मसाले भात रेसिपी मराठी प्रमाणे मसाले भात बनवून बघा आणि आम्हाला आपला अनुभव कमेंट करून जरूर कळवा.

आपल्याला ही मसाले भात कसा बनवायचा / मसाले भात रेसिपी मराठी ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Shruti Pawar
She is an Electronics Engineer having M.E. In Electronics & Telecommunication. She is a web & android developer, social media influencer and core programmer who love to write code, apart from this he loves to write recipe article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *