मराठी भाषा दिन माहिती | निर्मिती व संवर्धन | मराठी गौरव दिन

मराठी भाषा दिन माहिती / मराठी भाषा गौरव दिन माहिती (marathi bhasha din mahiti) >>

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंत, जात, एक जाणतो मराठी

एवढया जगात माय मानतो मराठी

मराठी भाषा दिन माहिती (marathi bhasha din mahiti)

मराठी भाषा दिन माहिती या लेखाच्या सुरवातीला आपण मराठी भाषा निर्मिती व संवर्धन या विषयी माहिती बघणार आहोत. त्यानंतर मराठी भाषा दिन का साजरा केला जातो आणि लेखाच्या शेवटी मराठी भाषा दिन साजरा करण्याची पद्धत या विषयी माहिती बघणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊयात मराठी भाषा दिन माहिती विशेष.

मराठी भाषा निर्मिती व संवर्धन / मराठी भाषा इतिहास (मराठी भाषा माहिती)

मराठी भाषा ही ९व्या शतकापासून प्रचलित आहे व तिची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे.महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे मराठी बोलणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसरी व जगातील पंधरावी भाषा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मराठी संस्कृतीचे आणि  मराठी भाषेचे रक्षण केले. आपल्या या मराठी मातीत अनेक संत होउन गेले. संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून स्त्रोत्र, श्लोक लिहीले आणि लोकांना चांगला संदेश दिला अशा संतानी सुदधा मराठी भाषेचा ठसा लोकांवर उमटवला.

 एवढेच नव्हे तर अनेक प्रसिदध कलाकार या मराठी मातीतच घडले. गानसाम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, नाना पाटेकर, माधूरी दिक्षित तसेच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. समाजसेवक आण्णा हजारे, समाजसुधारक बाबा आमटे तसेच उत्तम मराठी लेखक, नाटककार पु.ल. देशपांडे यांसारखी अनेक रत्ने मराठी मातीतच घडली.

आपल्या मराठी संस्कृतीच्या वारसा खूप मोठा आहे आपल्या या मराठी मातीत मराठी चित्रपट, नाटक, काव्य, कविता इत्यादींचा फार मोठा वाटा आहे अशाच अनेक गोष्टींमुळे आजपर्यंत आपण हा मराठी वारसा जपत आलेलो आहेात.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.तरच मराठी भाषा दिन साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल.

मराठी भाषा दिन का साजरा केला जातो

27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने ‘मराठी भाषा दिन ‘साजरा केला जातो.

जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी प्रकारचे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. तसेच दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकूट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कांदब-या अशा अनेक साहित्यांनी कुुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा राजभाषा दिन, गौरव दिन अशा अनेक नावाने साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान अवर्णनीय आहे त्यांनी त्यांच्या साहित्याची सुरवात कवितेपासून केली. पुढे कथा, कांदब-या,ललित वाड्ःमयातील नावाजलेली साहित्य रचना यांच्या लिखानातून अवतरत गेली

मराठी भाषा दिवस साजरा करण्याची पद्धत

भविष्यातील पिढीने हा मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणून  मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सूरू झाली. 27 फेब्रुवारी या दिवशी केवळ महाराष्ट्रात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना मराठी गायन, वादन, वत्कृत्व स्पर्धा, मराठी निबंध स्पर्धा , शास्त्रीय संगीत यांचे आयोजन केले जाते नाटकांचे आयोजन करून मराठी भाषेला एक दिशा दिली जाते

ज्या  मायबोलीत आपण जन्मलो आणि ज्या मायबोलीने आपल्याला घडविले त्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे.आणि त्यासाठीच मराठी भाषा गौरव दिवस हा आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे.

“माझा मराठीची बोलू कौतुके ।
परि अमृतातेही पैजासी जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके । मिळविन ।”
असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षा जास्त आहे.

सारांश – मराठी भाषा दिन माहिती

मराठी बोलणारा माणूस नोकरी, व्यवसाय, उच्च शिक्षण या निमित्ताने जगाच्या कानाकोप-यात गेलेला आहे तिथे जाउन हिंदी -इंग्रजी सारख्या इतर भाषा अवगत करून मराठी भाषेला विसरत आहे. मायबोलीचा त्याग करून लोक इंग्रजी भाषेचा अवलंब करत आहेत. इंग्रजी ही काळाची गरज आहे. नक्कीच, याबददल दुमत नाही पण त्यासाठी मराठी भाषेला विसरणे हे योग्य नाही.

आजच्या नवीन पिढीला महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास,आपले साहित्य वाचायला प्रवृत्त केले पाहिजे.आपण सर्वांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.ही सुरवात आपल्या घरापासून करायला हवी.अशा गोष्टींमुळेच मराठी दिन साजरा केल्याचे खरे सार्थक होईल.

मराठी भाषा दिन कधी असतो / मराठी भाषा दिन केव्हा असतो

दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने ‘मराठी भाषा दिन ‘साजरा केला जातो.

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) Rainy Season (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (18) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (7) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (18) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top