Maharashtra Din 2020
माहिती

महाराष्ट्र दिन 2022 : इतिहास व काही मनोरंजक गोष्टी

महाराष्ट्र दिन 2022 / महाराष्ट्र दिन माहिती मराठी :- “मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा” महाराष्ट्र म्हणजे काय? तुकाराम महाराज,बहीण बाईं सारख्या संतांची शिकवलेली सहिष्णुता म्हणजे महाराष्ट्र, समाज सुधारकांच्या विचारांवर चालणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र, साहित्तिकांच्या साहित्याने समृद्ध झालेला असा हा पुरोगामी महाराष्ट्र.

महाराष्ट्र दिन 2022:-

१मे म्हणजे महाराष्ट्र दिन, १०५ हुतात्म्यांच्या बलिदाना नंतर १मे १९६०रोजी संयुत महाराष्ट्र स्थापन झाला.व यशवंत राव चव्हाण या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.त्यापूर्वी १मे हा दिवस १८११ साला पासून कामगार दिन म्हणून साजरा केला जात असे.
परंतु १९६० नंतर याच दिवशी महाराष्ट्र दिन देखील साजरा केला जातो आहे संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात कामगारांच्या अनमोल अश्या सक्रिय सहभागामुळेच हा लढा यशस्वी झाला त्यामुळे याच दिवशी कामगार दिन व महाराष्ट्र दिन मोठ्या उत्सहात साजरे केले जातात.

महाराष्ट्र दिन >>महाराष्ट्राच्या निर्मितीचा इतिहास :-

भारत १९४७ ला स्वतंत्र झालेला असताना सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.त्याचे झाले असे की,२१नोव्हेंबर १९५५रोजी संयुक्त महाराष्ट्रासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यावर तत्कालीन सरकार ने अमानुष लाठीचार्ज व गोळीबार केला.त्यात हजारो जण जखमी झाले व १०५ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

त्यानंतर मात्र हे आंदोलन अधिक तीव्र होत गेले. या आंदोलनात आचार्य अत्रे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे,शाहीर अमर शेख, केशवराव जेधे, बाळासाहेब ठाकरे या सारख्या अनेक मात्तबर लोकांनी आपआपल्या पद्धतीने सरकारच्या संयुक्त महाराष्ट्र विरोधी धोरणांवर विरोध नोंदविला.

अखेरीस तत्कालीन नेहरू सरकार च्या संयुक्त महाराष्ट्र विषयीच्या दुटप्पी धोरणाला वैतागून केंद्रीय अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जनतेच्या जोरदार अश्या या आंदोलना मुळे व तत्कालीन राजकीय परिस्थिती मुळे अखेरीस २१एप्रिल १९६० ला लोकसभेत संयुक्त महाराष्ट्राला मान्यता मिळाली. आणि १मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करून तेंव्हाचे बॉम्बे म्हणजेच आत्ताची मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र दिन>>महाराष्ट्राच्या अभिमानास्पद गोष्टी:-

क्षेत्र आणि काळ कोणताही असो महाराष्ट्र नेहमीच इतर राज्यांच्या कित्तेक पटीने पूढेच राहिला आहे.देशाचा खर्चाचा गाडा ओढणारे राज्य अशी महाराष्ट्राची छबी आहे.म्हणूनच “महाराष्ट्र जगला तर देश जगेल” असे म्हणतात.
उद्योग क्षेत्र,साहित्य,क्रीडा असो वा शिक्षण क्षेत्र महाराष्ट्र नेहमीच देशात नंबर १वर राहिला आहे.

महाराष्ट्र दिन
maharashtra din 2022

महाराष्ट्राच्या ५ अभिमानास्पद व्यक्ती:-

१)फक्त भारत देश्यालाच नाही तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज्यांचा जन्म याच भूमीतील.

२)देशाला समानतेचा संदेश देणारे शाहू महाराज आणि फुले या महाराष्ट्रातच निर्माण झाले.

३)जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे संविधान लिहणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्रातीलच.

४)पहिला चित्रपट निर्माण करणारे दादासाहेब फाळके इथलेच.

५)जगाला आपल्या खेळाने वेड लावणारा सचिन तेंडुलकर याच मराठी मातीतला.

जग देश आणि महाराष्ट्र:-

१)महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ सुमारे ३०७७१३ चौ.किमी. इतके आहे आणि हे क्षेत्रफळ युरोप मधल्याअनेक देशां पेक्षा जास्त आहे.

२)कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या दवळवळणावर आधारित असतो आणि आपल्या देशातील सर्वात पहिली रेल्वे ही महाराष्ट्रात १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे येथे धावली.

३)देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि याचं महाराष्ट्रात देशातील अनेक महत्त्वाच्या वित्तीय संस्था आहेत. जसे की NSE(National Stock Exchange),BSE(Bombay Stock Exchange),RBI,SEBI यांची कार्यालये महाराष्ट्रात आहेत.

४)परदेशातून येणारी सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होते कारण महाराष्ट्र हा औदयोगिक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे.

५)देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे सुनियोजित शहर आपल्या महाराष्ट्रात आहे,आणि ते म्हणजे नवी मुंबई. मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता ७०च्या दशकातच नवी मुंबई हे शहर वसवले गेले व हे शहर विकसित करत असताना सर्व नियोजन बद्ध रीतीने करण्यात आले.

असा हा माझा महाराष्ट्र पाहिल्यावर एकच म्हणावेसे वाटते “नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी” अशी ही माझ्या महाराष्ट्राची महती.

हा लेख आपल्याला आवडल्यास कंमेंट जरूर करा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

2 Replies to “महाराष्ट्र दिन 2022 : इतिहास व काही मनोरंजक गोष्टी

  1. Tumhi maharashtrabaddal ani marathi manasabaddal lek liha aaj aplya mumbaichi ani ekandarit maharashtach mahatav kami karaicha dav desto ahe kahi mahatvvache office kiva company tumhi ya sandarbat likhan karav evdic vinati
    Jai maharashta

    Sandip Kalantre
    Kolhapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *