बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा तर मनुस्मृती कावा

भाजप मध्ये बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा तर मनुस्मृती कावा असे आता लोक म्हणू लागले आहेत.

बहुजन नेत्यांवर अन्याय>> राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपा मध्ये आलेले मोहिते पाटील. बारामती तुन विधानसभेला अजित पवार यांच्या विरोधात स्वतःचे डिपॉजिट वाचवू न शकलेले गोपीचंद पडळकर याना जेंव्हा विधान परिषदेचे तिकिट मिळते.

तेंव्हा इतके दिवस सत्ता नसताना ज्यांनी भाजपासाठी खस्ता खाल्लेल्या एकनाथ खडसे,विनोद तावडे,पंकजा मुंढे (गोपीनाथ मुंढेनी खाल्लेल्या खस्तांच्या मुळे) आणि चन्द्रशेखर बावनकुळे ह्या नेत्यांच्या मनात निश्चितच वावटळ उठत असेन,पण सांगणार कोणाला.

लोकनेते हे असेच संपवले जात आहेत एकनाथ खडसेंना आधी ५वर्ष पक्ष्याची केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना देखील कशी वागणूक मिळाली आणि नंतर तिकीट नाकारले गेले.

पंकजा मुंढे यांचा झालेला पराभव ,चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांचे नाकारलेले तिकीट.

हे सर्व जण बहुजन समाजाचे नेते आहेत आणि यांना नाकारले गेले हे मनुस्मृती तील त्या घाणेरड्या जातीभेदाच्या प्रवृत्ती मुळेच अशी भावना ह्या नेत्यांच्या मनात असो अगर नसो परंतु कार्यकर्त्यांच्या मनात मात्र तयार झाली आहे आणि तशी कुजबूज आता कार्यकर्ते आपापसात करू लागले आहेत .

ह्या बहुजन नेत्यांना आता विधान परिषदे वेळी पुन्हा एकदा कोणामुळे डावलले गेले हे न कळण्या इतपत तर महाराष्ट्रातील जनता वेडी नाहीये.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बहुजन समाजातील लोकां कडून चहू बाजूने जोरदार टीका होत आहे.

खरच फडणवीस यांनी ५ वर्ष केलेला राज्यकारभार हा मनुस्मृती वरच आधारित होता का ? त्यांची कार्यपद्धती ही तशीच आहे का ? का ती तशी असल्याचे भासवले जात आहे? ह्या प्रश्नाची उत्तरे ही अनाकलनीय आहेत.

बहुजन नेते, फडणवीस आणि प्रतिक्रिया:-

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या शौर्याने,तुकाराम महाराज्यांच्या शिकवलेल्या साहिष्णुतेने आणि असंख्य समाज सुधारकांच्या विचारांने समृद्ध झालेला असा हा महाराष्ट्र आहे.

गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रातील राजकारण हे पुरोगामीत्वाच्या आधारावर चालू होते.जरी हिंदुत्व हा राजकारणाचा मुद्दा असला तरी मनुस्मृती चा आधार घेऊन कधी कोणी राजकारण केले नाही.अगदी ब्राह्मण समाजातील नेतृत्वाने देखील,जसे की शिवसेनेचे मनोहर जोशी असोत किंवा बीजेपी चे प्रमोद महाजन किंवा नितीन गडकरी.

ह्यात खऱ्या अर्थाने बदल घडला तो 2014 साली.महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजप ची सत्ता आली आणि मनुस्मृती ने डोके वर काढले.त्याला कारनीभूत होती राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची (फडणवीस) कार्य पद्धती.

महाराष्ट्रात हे असले राजकारण कधी पाहायला मिळाले नव्हते,विशेष म्हणजे ह्या कार्यपद्धती मुळे स्वपक्षिय भरडले जात आहेत. ह्याची सुद्धा त्या सत्तेसाठी उन्मत्त झालेल्या माणसाला जाणीव राहिली नव्हती.अश्या चर्च्या लोकांमध्ये पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्राने अनेक नेत्यांच द्वंद्व पाहिले मग ते बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असोत,गोपीनाथ मुंढे आणि शरद पवार असो,किंवा मग बाळासाहेब आणि सोनिया गांधी असोत. पण त्यांच्या विरोधा मध्ये देखील एवढी कटुता आणि क्रौर्य कधी नव्हते.

ह्याच फडणवीसांनी सदाभाऊ खोत, महादेव जानकर,विनायक मेटे यां सारखे बहुजन नेते किती पद्धतशीर पणे संपवले.आणि आता त्यांच्या निशाण्यावर स्वपक्षीयच ही ४ नेते मंडळी आहेत.स्वतःला आधी पक्षात कायमचे सेट करून घ्यायचे ह्यांनी ठरवलेले दिसतेय. असे महाराष्ट्रातील जनता आता थेट म्हणू लागली आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी २५जुलै १९२७ लाच रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृती जाळली होती, परंतु अजून देखील त्याच मनुस्मृती ला धरून फडणवीस हे या बहुजन नेत्यांचा द्वेष करत आहेत.

त्यांचे राजकारण संपवू पाहत आहेत. अश्या त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या विरोधकांच्या भावना झाल्या आहेत. त्यातील एका विरोधी कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आम्ही आपल्या समोर खालील फोटो च्या माध्यमातून मांडत आहोत.

बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा तर मनुस्मृती कावा
मनुस्मृती कावा

मनुस्मृती मधील मजकूर:-

ह्या नेत्यांना सतत डावलण्या मागे मनुस्मृती चे जातीभेद करणारे विचार आहेत असे ज्या वेळी सोशल मीडिया मधून टीका होत होती,आणि लोकांमध्ये चर्चा होत होती. त्यावेळी सोशल मीडिया वर वेगाने पसरणारा मनुस्मृती मधला हा मजकूर आढळला. त्याचा ह्या प्रकरणाशी काही संबंध असेलच असे नाही.आणि जर असल्यास तो केवळ योगायोग समजावा.

बहुजन नेत्यांवर झालेला अन्याय हा मनुस्मृती कावा आहे का
मनुस्मृती भाग ११, पंक्ति क्रं. ३१ व ३२

मनुस्मृती भाग ८
मनुस्मृती भाग ८ , पंक्ति क्रं. ४१३ , ४१४ व ४१७

आता मनुस्मृती अस्तित्वात नाही आता लोकशाही आहे, आणि ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेवर चालते. फडणवीस हे घटना मानणारे नेते असून ते असे काही मनात ठेवून वागत नसावे.

ह्या लोकशाही मध्ये जनता ही राजा आहे आणि जनते पेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे आता जनताच ठरवेल ह्या नेत्यांचे भविष्य आणि ह्यांच्या विना फडणवीस यांचे राजकारण.

तात्पर्य :- कार्यकर्ते कोणता विषय कुठे घेऊन जातील आणि कश्या सोबत जोडतील याचा भरोसा नाही.

टीप :- फडणवीस यांच्यावर हे आरोप होत आहेत की, ते मनुस्मृती प्रमाणे ह्या बहुजन नेत्यांना वागणूक देऊ पाहत आहेत. ते तसे करतच आहेत असे आमचे बिलकुल म्हणणे नसून आम्ही तसा दावा ही करू इच्छित नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाआणिटि्वटरवर फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) best (1) Free (1) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) अमिताभ बच्चन (1) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) ग्रामीण (17) ट्रक (4) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) सण (19) स्पीकर (1) स्वदेशी (1) स्वयंपाक (7) हिंदू (19)

Scroll to Top