लवंग चे फायदे
आरोग्य

लवंग चे फायदे मराठी / लवंग चे घरगुती उपयोग

लवंग चे फायदे मराठी / लवंग उपयोग / लवंग खाण्याचे फायदे / Benifits of lavang in marathi >> लवंग आपल्या प्रतेकाच्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे, आहारात बरेच पदार्थ हे लवंग शिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आसतेच केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात लवंगची मागणी आहे. लवंग संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात पण लवंग केवळ खाद्य पदार्थाला स्वाद आणण्यासाठी वापरले जात नाही तर तिचे काही औषधी गुण देखील आहेत.                        

लवंग चे फायदे मराठी / लवंग उपयोग / लवंग खाण्याचे फायदे >>

आकाराने लहान पण औषधी गुण असलेली अशी ही लवंग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तेच लवंग चे फायदे आपण या लेखामध्ये बघनार आहोत.      

लवंग चे औषधी गुणधर्म असलेले फायदे / लवंग खाण्याचे फायदे :-

  • सर्वसाधारणपणे आरोग्याच्या समस्यांवर लवंगेचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. याचे परिणाम देखील प्रकर्षाने आणि जलद गतीने दिसून येतात. लवंग ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.                                                    
  • दात दुखत असतील तर लवंग फायदेशीर ठरते. लवंग मधील ऑइल दातांच्या दुःखण्यामध्ये दुखणे थांबवण्यासाठी लाभदायक आहे. 
  • तोंडाशी संबंधित इतर आजारांवर देखील लवंग गुणकारी आहे.                                         
  • घश्यातील खवखव दूर करण्यासाठी देखील लवंग वापरण्यात येते.                                           
  • अनेक आजारांवर जसे सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सरसारख्या गंभीर आजार पर्यंत लवंग चा वापर केला जातो  
  • मच्छर पळवण्यासाठी पण लवंग चा वापर केला जातो.                                                           
  •  लवंग मध्ये बॅक्टरियल गुण असतात म्हणून लवंग चे उपयोग टूथपेस्ट माऊथ वॉश आणि क्रीम बनवण्यात केला जातो.                    
  • लवंग तेल खूप गुणकारी असते पण हे लवंग तेल सरळ त्वचेवर न लावता इतर कोणत्याही तेलात मध्ये मिक्स करून लावावे .
  • सायनस सारख्या आजारामध्ये देखील आराम मिळवण्यासाठी लवंग फायदेशीर असते. ज्या लोकांना सायनसचा त्रास असतो त्यांनी तीन चार चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घ्यावे. ज्यामुळे इन्फेक्शन कमी होईल आणि श्वास घेताना होणारा त्रास कमी होईल.
  • पोटाच्या आजारावर देखील लवंग गुणकारी ठरते. लवंग मध्ये असलेल्या गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते दोन लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात उकळले व हे मिश्रण थंड झाल्यावर प्याले व दिवसातून तीनदा घेतल्याने पोटात होणार्‍या गॅस ची समस्या दूर होण्यास मदत होईल अशा प्रकारे पोटाच्या गॅस जळजळी सारख्या समस्यांवर लवंग गुणकारी ठरते.
  • गर्भावस्थेमध्ये पण लवंग फायदेशीर असते. जर का उलटी मळमळ वाटत असली आणि लवंग चघळली तर आराम पडतो. कधीकधी गर्भावस्थेमध्ये स्त्रियांना सकाळी पुष्कळ वेळा मळमळल्या सारखं वाटतं त्यावेळी जर का लवंग खाल्ली तर आराम पडतो .     
लवंग चे फायदे
लवंग – लवंग खाण्याचे फायदे

 चिकित्सा पद्धतीमध्ये लवंग चा वापर :-

  • लवंगचा उपयोग आयुर्वेदिक नव्हे तर सगळ्याच चिकित्सा पद्धतीमध्ये होतो. जसे -होमिओपॅथी ऍलोपॅथि आणि आयुर्वेद.  
  • लवंग मध्ये काय कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, सोडिअम आणि हायड्रोक्‍लोरिक ऍसिड असते. लवंग मध्ये विटामिन ई आणि सी फायबर देखील असते.                                                      
  • लवंग प्राकृतिक वेदनाशामक आहे.                              
  • डॉक्टर दातामध्ये दुखणे झाले तर लवंगाचे तेल लावण्यास प्राथमिकता देतात आणि त्वरित आराम  मिळतो.                               
  • हाडांच्या दुखण्यावर लवंग चा वापर केला जातो. ह्यात प्लेरोनॉल्ड अधिक असते.                                              
  • हाडाच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा मध्ये लवंगाचे तेल वापरण्यावर प्राथमिक भर देतात.
  • श्वासा संबंधी त्रासामध्ये लवंग चा सुगंध घेण्याचा सल्ला दिला जातो व लवंग चा सुगंध खुप उग्र असल्यामुळे तो घेतल्याने दमा, सर्दी, सायनस आदी समस्यांवर लगेच आराम मिळतो .       
  • लवंग तेल एक उत्तम अँटी सेप्टीक आहे. त्यामुळे फंगल इन्फेक्शन, जळल्यावर, इजा किंवा त्वचेशी संबंधित समस्या समस्यांवर लवंग चा वापर केला जातो .        
  •  कॅन्सर रोगांवर पण लवंग चा उपयोग केला जातो.                                                                              
  • लवंग मुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्त शुद्ध होते
  • लवंग खाल्याने पोटातील कृमींचा नाश होतो.
  • लवंग ही फुफ्फुस चा कॅन्सर व त्वचेचा कॅन्सर थांबवण्यात मदत करते.
  • तसेच लवंग चा वापर मलेरिया, हागवण या सारख्या आजारावर उपचारा दरम्यान देखील केला जातो.
  • जर का डायबिटीज चा रोगी ने रोज लवंग चे सेवन केले तर ग्लुकोजचे प्रमाण कमी होते .

सारांश – लवंग चे फायदे/ lavang che fayade

अश्या प्रकारे लवंग आपल्या रोजच्या आणि आणि चिकित्सा प्रणाली मध्ये देखील उपयोगी आहे. म्हणून लवंग चा वापर आपण नेहमी करायला पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढून आपण तंदुरुस्त राहू शकता.

(टीप :- कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्याच बरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Android (3) apps (6) Baby Products (10) Health (20) Health Related Products (10) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) QC (1) udyojak (10) अभ्यास संबंधित (4) उद्योग (13) उपाय (17) कोल्हापूर (1) खेळ (4) ग्रामीण (17) छत्रपती (1) ट्रक (4) ट्रोलिंग (1) देश (20) पैसे (6) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (18) मशीन (18) महाराष्ट्र (21) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (3) योजना (1) रजिस्टर (6) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (4) विद्यापीठ (3) व्यवसाय (17) शरद पवार (2) शेती (5) संधी (1) सण (19) स्वयंपाक (7) हिंदू (19)

First Look Team
First Look Team is a web developers team, social media influencer and also blogger who love to write a technology-related & informative article and share via social media.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *