लहान मुले का रडतात
आरोग्य

लहान मुले रडतात |लहान मुलांचे रडणे | कारणे व उपाय

Advertisement

लहान मुले का रडतात > रडण्याची कारणे आणि त्यावरील उपाय>> भूक लागणे,झोप येणे किंवा झोपेत घाबरणे ह्या व्यतिरिक्त अनेक अशी कारणे आहेत ज्या मुळे देखील बाळ रडत असते.लहान मुले रडण्याची कारणे काय असतात आणि त्यावरील उपाय काय याची माहिती देणारा हा लेख.

लहान मुले का रडतात | कारणे आणि उपाय

जर वडीलधारी मंडळी कोणी जवळ नसतील आणि लहान बाळ रडायला लागले तर नवख्या आई वडिलांची पुरती दमछाक होत असते.आणि लहान मुलांचे रडणे असे असते की कळत ही नाही बाळ का रडत आहे. बाळाला काय पाहिजे आहे, किंवा बाळाला काय होत आहे हे आपल्याला कळत नसते आणि लहान बाळाला देखील सांगता येत नसते.

अनेकदा मुले ही रात्रीची झोपेतून उठून रडू लागतात त्याचे कारण त्यांना होत असलेला शारीरिक त्रास हेच असेल असे नाही, खाली काही कारणे आणि त्यावरचे उपाय देत आहोत ते पडताळणे गरजेचे आहे.

रूम चे तापमान योग्य नसल्यावर लहान मुले रडतात

कारण:- आपल्या रूम मधील तापमान खूप थंड किंवा खुप गरम जरी असले तरी लहान मुले रात्रीची रडतात.किंवा उन्हाळ्यात मुलांच्या अंगावर जास्त कपडे घातले तर त्यांना गरम होते. तसेच हिवळ्या मध्ये कमी कपडे घातले किंवा अंगावर पांघरले नाही तरी मुलांना थंडी वाजते आणि त्यामुळे मुले रडतात.

Advertisement

उपाय:- रूमचे तापमान संतुलित ठेवा आणि ऋतु नुसार लहान मुलांच्या अंगावर कपडे असावेत.

डायपर किंवा कापड ओले झाल्यावर लहान मुले रडतात

कारण:- कधी कधी लहान बाळाचे रडणे हे डायपर किंवा गुंडाळलेले कापड लघवी केल्यामुळे ओले होते त्यामुळे किंवा डायपर मांडीला अथवा पायाच्या जांघेत कचत असल्यास देखील लहान मुले रडतात.

उपाय:-बाळाने लघवी केल्यामुळे डायपर/कापड ओले झाले असेल तर ते बदलावे. आणि जर तसे काही नसेल तर ते बाळाला व्यवस्थित घातले आहे का ते बघावे.

बाळंस हे देखील मुले रडण्याचे कारण असू शकते

कारण:- अनेक वेळा लहान बाळाच्या डोक्यावर किंवा कानाच्या मागे बाळंस असते त्यामुळे तिथे खपल्या येतात. त्याचा परिणाम म्हणजे बाळाला त्या ठिकाणी खाज सुटत असते पण ते काहीही करू शकत नसल्यामुळे रडत असते.

उपाय:- बाळंस काढू नये असा गैरसमज आपल्या समाज्यात आहे असे काहीही गैरसमज न ठेवता बाळंस वेळोवेळी साफ केले गेले पाहिजे.

संडासची जागा नीट साफ केली नसेल तरी मुलांना त्रास होतो

कारण:- बहुतेक वेळा बाळाची शी साफ करताना नीट साफ न केल्यामुळे देखील त्या जागेवर खाज सुटते आणि लहान मुले रात्रीची रडतात.

Advertisement

उपाय:- बाळाने शी केल्यानंतर ती जागा व्यवस्थित साफ केली पाहिजे.त्यासाठी योग्य असे मऊ कापड वापरावे.

गाईचे दूध लहान मुलांना पचत नाही आणि मुले रडतात

कारण:- बाळाच्या आईला अंगावर दूध कमी येत असेल तर बहुतांश वेळा लहान बाळाला आपण गाईचे दूध देतो.परंतु गाईचे दूध हे पचायला जड असते आणि बाळाला ते पचत नसल्यामुळे लहान मुले रात्रीची रडतात.

उपाय:- अश्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला फॉर्म्युला दूध चालू केले पाहिजे.

घाबरणे- घाबरून देखील बाळ रडू शकते.

कारण:- कधी कधी रात्री झोपेत अचानक बाळ घाबरून रडायला लागते,आणि त्याला वरती उचलून कडेवर घेतले की ते शांत होते आणि खाली ठेवले की परत रडते अश्या वेळी ते घाबरलेले असते.

उपाय:- थोडा वेळ बाळाला मऊ कापडा मध्ये पूर्ण गुंडाळून घेऊन आपल्या छातीशी धरून फिरावे असे केल्यास बाळाला सुरक्षित वाटते.

देवाचे दोरे – लहान मुले रडण्याचे हे एक कारण असू शकते

कारण:- जुन्या लोकांचे ऐकून आपण बाळाच्या हातात,पायात बऱ्याच प्रकारचे दोरे बांधतो.उन्हाळ्या मध्ये अश्या ठिकाणी घाम येऊन खाज सुटू शकते.

Advertisement

उपाय:- असे गंडे दोरे बाळाच्या हातात आणि पायात बांधने शक्यतो टाळावे.

नाक आणि कानात वळवळ झाल्यामुळे पण मुले रडतात.

कारण:- बहुदा आपण लहान बाळाचे नाक आणि कान आपण साफ करायचे विसरतो. त्यामुळे त्याला तिथे वळवळ होत असते आणि खाजवता देखील येत नसल्यामुळे ते रडत असते.

उपाय:- बाळाचे काण आणि नाक हे वेळोवेळी सावकाश त्याला काहीही इजा न होऊ देता साफ केले पाहिजेत.

अंथरून रुतने- लहान मुले या मुळे पण रडतात.

कारण:- बऱ्याच वेळा बाळाला आपण रात्रीचे डायपर घालून तसेच आपल्या शेजारी घेऊन झोपतो पण त्याला खाली काही ना काही रुतते आणि ते त्याला कळत नसल्या मुळे रडत असते.

उपाय:- अश्या वेळी मऊ असे बाळाचे कापड नेहमी बाळाच्या बिछान्या साठी खाली वापरावे.

मालिश चे परिणाम

कारण:- बाळाचे अवयव हे खूप नाजूक असतात आणि त्यांना नाजूक हातानेच मालिश केली पाहिजे बऱ्याच वेळा चांगले रगडून मालिश केली जाते ज्या मुळे त्याला वेदना होतात.

Advertisement

उपाय:- अंघोळ घालताना किंवा अंघोळीच्या आधी हलक्या हाताने बाळाची मालिश करावी.

पोटात गॅस होणे

कारण:- आधी सांगितल्या प्रमाणे बाळाला जर गाईचे दूध दिले तर ते पचायला कठीण असते त्यामुळे पोटात दुखत असल्यामुळे देखील लहान मुले रडतात.

उपाय:- अश्यावेळी हिंग पाण्यात मिसळून बेंबी वर चोळल्यावर बाळाच्या पोटातील गॅस बाहेर पडतो.

दात येताना

कारण:- ५ किंवा ६ महिन्यांच्या पुढे लहान मुलांना दात यायला लागतात,अश्या वेळी त्यांना काहीतरी चावावे असे वाटत असते तर कधी त्याना दात येण्याच्या या प्रक्रिये मध्ये ताप येतो,जुलाब होतात ह्या मुळे देखील लहान मुले रडायला लागतात.

उपाय:- बाळाला डॉक्टरांच्या सल्याने औषध द्यावे.

कीटक चावणे

कारण:- कधी कधी झोपेत लहान मुलांना मच्छर / डास किंवा इतर काही कीटक चावल्या मुळे देखील ते रात्रीचे रडतात.

Advertisement

उपाय:- हे तुम्ही बघायला हवे. तसे काही चावले तर नाहीये ना याची खात्री तुम्ही बाळाचे अंगावरील सर्व कपडे काढून केली पाहिजे.

आईचे केस/लहान धागा/दोरा अडकणे

कारण:- झोपेत मुलांच्या हाताच्या,पायाच्या बोटा मध्ये,किंवा मुलांच्या शरीरावर कोठेही आईचे केस,धागा,दोरा अडकल्यामुळे देखील लहान मुले रात्रीची रडतात.

उपाय:- असे काही बाळाच्या कोणत्याही अवयवाला अडकलेले तर नाही ना हे तुम्ही मुलाच्या अंगावरचे सगळे कपडे काढून व्यवस्थित बघितले पाहिजे.

सर्दी

कारण:- बहुदा सर्दी झाल्यामुळे मुलांचे नाक बंद असते आणि त्यामुळे त्याला आईच्या अंगावर पिता येत नसते,भूक तर लागलेली असते पण दूध पिता येत नसल्यामुळे देखील लहान मुले रडतात.सर्दी मध्ये लहान मुलांचे कान देखील दुखतात.

उपाय:- अश्यावेळी तुम्ही बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेले पाहिजे.काही वेळा लहान बाळाला सर्दी कमी होण्यासाठी व नाक मोकळे होण्यासाठी वाफ देखील दिली जाते.

Advertisement

बाळ रडण्याची इतर काही कारणे

लहान मुले का रडतात याची वरील काही कारणे आहेत आणि त्याचे उपाय.या व्यतिरिक्त एखाद्या गोष्टीचा हट्ट म्हणून देखील लहान मुलांचे रडणे असते.तसेच त्यांना कधी कधी आईने किंवा वडिलांनी कवटाळून घ्यावे,आपल्याला जवळ घ्यावे असे देखील त्यांना वाटत असते त्यामुळे देखील लहान मुले रडतात.

तसेच काही शारीरिक त्रास होत असेल तरी लहान मुले रडतात ज्यावेळी वरील नमूद केलेली सर्व कारणे आणि उपाय कामी येत नाहीत. अश्या प्रसंगी मुलांना डॉक्टर कडे घेऊन जावे.

आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

यांसारख्या इतर माहितीच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर  फाॅलो करा.

Advertisement

Disclaimer: The opinions expressed in the post are the personal views of the author. Any omissions or errors are the author’s and Margdarshak News does not assume any responsibility for them.

1st (1) Android (2) apps (5) Baby Products (10) Books (2) Health (12) Health Related Products (8) Measurement (2) Mechanical Engg (2) Metrology & Quality Control (2) Products (12) udyojak (9) अमिताभ बच्चन (1) उद्योग (9) उपाय (14) कोल्हापूर (1) ग्रामीण (4) छत्रपती (1) ट्रक (3) ट्रोलिंग (1) देश (11) पैसे (2) प्रेरणा (3) फडणवीस (4) फायदा (3) बिजनेस (11) मशीन (16) महाराष्ट्र (4) महाराष्ट्राचे राजकारण (8) मोदी (2) मोबाइल (2) रजिस्टर (3) रेकॉर्ड (2) लहान बाळ (7) वायरल (4) विदेश (2) विद्यापीठ (2) व्यवसाय (11) शरद पवार (2) शेती (3) संधी (1) सण (4) स्वदेशी (2) स्वयंपाक (2) हिंदू (7)

Advertisement
Advertisement

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत